Oppo Reno 12 5G
Oppo Reno 12 5G: Oppoनी आज जाहीर केले आहे की ते 12 जुलै 2024 रोजी भारतात Oppo Reno 12 5G सिरिज लॉन्च करणार आहे, ज्यामध्ये Reno 12 5G आणि Reno 12 Pro 5G हे दोन व्हेरीएंट घेऊन येत आहेत. कंपनी सांगत आहे की, Reno 12 सिरिज ही शक्तिशाली Ai फीचर्स, मजबूत टिकाउपणा आणि उत्कृष्ट डिझाइनसह यूजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. ही सिरिज भारतापूर्वी जागतिक बाजारपेठेत सादर केली आहे.
प्रसिद्ध कंपनी Oppo India ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच Twitter पोस्ट वर Oppo Reno 12 5G सिरीजच्या लॉन्च पुष्टी करण्यात आली आहे. हा फोन भारतात 12 जुलै रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाईल. Oppo Reno 12 5G सिरीजचा लॉन्च इव्हेंट कंपनीच्या सोशल मिडिया अकाऊंट वर LIVE पाहता येईल.
Oppo Reno 12 5G आणि Oppo Reno 12 Pro 5G फोन भारतापूर्वीच जागतिक बाजारपेठेत लॉन्च झाला आहे. त्यानुसार, फोनच्या या सिरीजमद्धे 6.7 इंच लांबीचा कर्व इन्फीनिटी व्ह्यू FHD+AMOLED स्क्रीन आहे दोन्ही फोनच डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज आहेत. उत्तम परफॉर्मन्ससाठी हे दोन्ही फोन Media Tek Dimensity 7300 प्रोसेसर ने सुसज्ज्य आहेत. एवढेच बाही तर, या स्मार्टफोनमध्ये Media Tek APU 655 चिप देखील उपलब्ध आहे. ही चिप अनेक AIक्लियर फेस, AI राइटर, AIरेकॉर्डिंग समरी आणि AI इरेजर 2.0 इ. फीचर्स असतील. Oppo Reno 12 5G मध्ये सनसेट गोल्ड आणि स्पेस ब्राऊन कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. तर Reno 12 5G मध्ये Sunset Peach, Matte Brown आणि Astro Silver कलर ऑप्शन्स मिळतील.
Reno 12 सिरिज किंमत
Oppo Reno 12 सिरिज फ्लिपकार्ट, Oppo इंडिया ऑनलाइन स्टोअर आणि ऑफलाइन स्टोअर्स लॉन्च झाल्यानंतर उपलब्ध होईल. पुढील आठवड्यात स्मार्टफोनच्या लॉचिंगच्या वेळी किंमतीची माहिती कळेल.
Oppo Reno 12 5G आणि Reno 12 Pro 5G चे स्पेसिफिकेशन
Oppo Reno 12 Pro 5G मध्ये कॉर्निग गोरील्ला ग्लास व्हिक्टस 2 सह कर्व्ड इनफिनिट व्यु डिस्प्ले आहे आणि Reno 12 5G मध्ये गोरील्ला ग्लास 7i आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 43॰ व्काड-माइक्रो कर्वसह 6.7 इंच FHD+ फ्लेक्जिबल AMOLED डिस्प्ले, 120 Hz रिफ्रेश रेट, 93.5% स्क्रीन टू बॉडी रेसहो आणि 1.69 मिमी साइड बेझलस आहेत. 10 बीट पॅनेल 1.07 अब्ज रंग प्रदर्शित करतात. जे 1200 nits पर्यंत उच्च HDR ब्राइटनेस सह तेजस्वी प्रकाशतही उत्कृष्ट व्हिजिबिलिटी प्रदान करतात. दोन्ही स्मार्टफोन पडण्यासाठी आणि धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी स्पंच प्रेरित ऑल राऊंड अर्मर प्रोटेक्शनने सुसज्ज्य आहेत.
हाय पॉवर एलॉय फ्रेमवर्क एक मजबूत आणि गंज प्रतिरोधक बिल्ड प्रधान करते जे एरोस्पेस् क्वालिटी स्टँडर्ड पूर्ण करते. दोन्ही स्मार्टफोन्स स्पीकर्स, USB-C पोर्ट तसेच धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP65 रेटिंगसह सीम कार्ड ट्रे सारख्या घटकांनी सुसज्ज आहेत. Oppo Reno 12 Pro 5G ची SGS द्वारे प्रीमियम परफॉर्मन्स 5 स्टार मल्टी सीन सिक्युरिटी साठी चाचणी केली जाते जी इतर वैशिष्टयांसह पानी आणि शॉक प्रतिरोधकतेला कव्हर करते. Reno 12 मध्ये डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी कमी नीळा प्रकाश आणि फ्लिकर फ्रि स्क्रीन यासह एसजीएस परफॉर्मन्स 5 स्टार मल्टीसीन परफॉर्मन्सची फीचर्स आहेत.
फोटोग्राफीसाठी Reno 12 Pro 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50 MP Sony LYT 600 प्राथमिक कॅमेरा प्रदान केला जाईल. यासह, सेटअप 8 MP Sony IMX 355 अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 50 MP टेलिफोटो सेन्सर समाविष्ट असेल. ज्याला 2Xऑप्टिकल झुम मिळेल.
Category | Specification |
---|---|
General | Android v14 |
In Display Fingerprint Sensor | |
Display | 6.7 inch, FHD+AMOLED Sensor |
1080 x 2412 Pixels | |
394 ppi | |
120 Hz Refresh Rate, 360 Hz Touch Sampling Rate | |
Punch Hole Display | |
Camera | Reno 12- 50 Mp + 50 MP + 2 MP Reno 12 Pro- 50 Mp + 8 MP + 2 MP |
4K @ 30 fps UHD Video Recording | |
32 MP Front Camera | |
Technical | Media Tek Dimensity 7300 |
2.8 GHz, Octa Core Processor | |
8 GB RAM + 8 GB Virtual RAM | |
128/256 GB inbuilt Memory | |
Dedicated Memory Card Slot, up to 1 TB | |
Connectivity | 4G, 5G, VoLTE |
Bluetooth v5.3, Wi-Fi | |
USB-C v2.0 | |
IR Blaster | |
Battery | 5000 mAh Battery, 67 W SUPERVOOC Charging |
Oppo Reno 12 5G इतर फीचर्स
- Oppo Reno 12 5G मध्ये 6.7 इंच चा मोठा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 1080 x 2412 px रेजोल्युशन आणि 394 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप कर्व डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 1300 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
- Oppo च्या या फोन मध्ये 5000 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 80 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 15 मिनिट चा टाइम लागेल.
- Oppo Reno 12 Pro च्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेल प्रायमरी Sony LYT 600 कॅमेरा, 2x पोर्टेट झुमसह 50 मेगापिक्सेल टेलिफोटो Samsung JN5 कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल IMX 355 अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे.
- सेल्फी कॅमेरा हा 32 मेगापिक्सेल GC32E2 कॅमेरा देण्यात आला आहे.
- फोनची स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे देखील वाढवता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, डयूअल सिम स्लॉट, ऑडिओ जॅक, स्पीकर ग्रील, ब्लुटुथ आणि USB टाइप C पोर्ट सारखे फीचर्स आहेत.
- Oppo Reno 12 5G मध्ये सनसेट गोल्ड आणि स्पेस ब्राऊन कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. तर Reno 12 5G मध्ये Sunset Peach, Matte Brown आणि Astro Silver कलर ऑप्शन्स मिळतील.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!