NPS Vatsalya: आपल्या लहान मुलांसाठी आणली सरकारने, पेन्शन योजना जाणून घ्या

NPS Vatsalya Scheme 2024

NPS Vatsalya Scheme 2024: लोकसभा निवडणुकीनंतरचा अर्थसंकल्प सदर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य योजनेची घोषणा केली होती तर आता याच घोषणेची अंमलबजावणी करत अर्थमंत्री बुधवारी 18 सप्टेंबर रोजी ही योजना सुरू करणार आहेत. NPS वात्सल्य पेन्शन योजनेत गुंतवणूक करून पालक त्यांच्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शकतात. NPS वात्सल्य योजना सबस्क्राइब करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केले जाईल. याशिवाय योजनेशी संबंधित तपशील जाहीर केले जातील आणि या योजनेत सामील होणाऱ्या अल्पवयीन ग्राहकांना अर्थमंत्री कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक सुपूर्द करतील.

NPS वात्सल्य योजनेची सदस्यता घेण्यासाठी त्याचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केले जाईल. याशिवाय योजनेशी संबंधित इतर माहितीही दिली जाणार आहे.

NPS Vatsalya Scheme 2024
NPS Vatsalya Scheme 2024

NPS Vatsalya Scheme 2024: NPS वात्सल्य योजना काय आहे?

NPS वात्सल्य योजने अंतर्गत आई वडिलांना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्याची संधी मिळणार आहे. पालक आपल्या मुलांसाठी या योजनेच्या खात्यात बचत करून आपल्या मुलांसाठी भविष्यात मोठा आर्थिक निधी तयार करू शकणार आहेत. या योजनेत फ्लेक्जिबल कंट्ररीब्यूशन आणि गुंतवणुकीची संधी पालकांना दिली जाणार आहे. मुल 18 वर्षाचं झाल्यावर वात्सल्य खात्यात जमा झालेली रक्कम आपोआप सर्वसाधारण NPS खात्यात हस्तांतरित केली जाते. याशिवाय अल्पवयीन मुलांना 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर ही योजना बिगर NPS योजनामध्ये देखील रूपांतरित केली जाऊ शकते.

वात्सल्य योजना ही सध्या 18 ते 60 वयोगटासाठी सुरू असलेल्या NPS योजणेचाच एक भाग आहे. ही योजना निवृत्तीच्या काळात आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक समजली जाते. या योजनेत सहभागी गुंतवणूकदारांचे पैसे पारंपरिक पेन्शन योजणांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं गुंतवले जातात. शेअर मार्केट आणि रोखे यांसारख्या बाजाराशी संबंधित साधनांमध्ये या गुंतवणुकीचं विभाजन केलं जातं. त्यामुळे अन्य फिक्स इन्कम पर्यायांच्या तुलनेत ही योजना उच्च परतावा मिळवून देण्यास सक्षम आहे. त्यातून सेवानिवृत्तीच्या बचतीत भरीव वाढ होते.

NPS Vatsalya Scheme 2024
NPS Vatsalya Scheme 2024

ही योजना तुलनेनं खूपच लवचिक आहे. जोखीम घेण्याची आपली क्षमता आणि आर्थिक उदिष्टनुसार गुंतवणूक पर्याय निवडता येतो. त्यात बदल करण्याच स्वातंत्र्य देखील आपल्याला मिळतं. शिवाय ही हस्तातरणीय योजना आहे. नोकरी बदलामुळं आपल्या NPS खात्यावर कोणताही परिणाम होत नाही. पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पेन्शन खात्यात गुंतवणूक करून बचत करू शकतील जेणेकरून त्यांच्यासाठी दीर्घकाळासाठी मोठा निधी तयार करता येईल. NPS वात्सल्य लवचिक योगदान आणि गुंतवणूक पर्याय ऑफर करते. पालकांना मुलांच्या नावावर वार्षिक रु. 1000 गुंतवणूक करू शकतील जेणेकरून सर्व आर्थिक पाश्वभूमी असलेल्या कुटुंबांना ते उपलब्ध होऊ शकेल.

या NPS पेन्शन योजनांचा फायदा तुम्ही घेऊ शकता

  • SBI पेन्शन फंड
  • LIC पेन्शन फंड
  • UTI सेवानिवृत्ती उपाय
  • HDFC पेन्शन व्यवस्थापन कंपनी
  • ICICI प्रूडेन्शीयल पेन्शन फंड व्यवस्थापन
  • कोटक महिंद्रा पेन्शन फंड
  • आदित्य बिर्ला सनलाइफ पेन्शन व्यवस्थापन
  • TATA पेन्शन व्यवस्थापन
  • मॅक्स् लाइफ पेन्शन फंड व्यवस्थापन
  • AXIS पेन्शन फंड व्यवस्थापन

या योजनांच्या माध्यमातून पालक आपल्या मुलांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याबरोबरच मुलांना बचतिचे व गुंतवणुकीचे महत्वही पटवून देऊ शकतात. या निमित्ताने अर्थमंत्री NPS वात्सल्यमध्ये स्वत:ची नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठ सुरू करतील. त्याचबरोबर अल्पवयीन ग्राहकांना परमनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर (PRAN) कार्ड देखील दिले जातील.

NPS Vatsalya Scheme 2024
NPS Vatsalya Scheme 2024

देशभरात 75 ठिकाणी कार्यक्रम आयोजित

NPS वात्सल्य योजनेची सुरुवात दिल्लीतून केली जाईल. मात्र योजनेच्या लोकार्पणासाठी देशभरात साधारण 75 ठिकाणी वेगवेगळ्या कार्यकर्माचे आयोजन केले जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसेच अन्य माध्यमातून या कार्यक्रमासाठी देशभरातील लोक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमस्थळी अल्पवयीन सबस्क्राइबर्सना पीआरएएन मेंबरशिप दिली जाणार आहे.

NPS Vatsalya Scheme 2024: तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित होणार

NPS वात्सल्य योजना मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, जी भारताच्या पेन्शन प्रणालीतील एक महत्वाचे पाऊल ठरेल. NPS वात्सल्य योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत राबवली जाईल. तसेच वित्त मंत्रालयाने म्हंटले आहे की, NPS वात्सल्य लॉन्च करणे सरकारच्या सर्वांसाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सर्वांसाठी सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्याची वचनबद्धता दर्शवते. ही योजना भारताच्या भावी पिढ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित आणि स्वतंत्र बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!