Nepal News: नेपाळमध्ये महापूर आता पर्यंत 200 जणांचा मृत्यू, 26 जण बेपत्ता!

Nepal Flood

Nepal Flood: नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पुर आणि भुस्खलनाची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात पुराचं पानी शिरलं आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 200 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 42 जन बेपत्ता आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर काठमांडूचि मुख्य नदी बागमती धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. परिस्थिति पाहता प्रशासनाने तीन दिवस सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवली आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती नेपाळच्या गृहमंत्रालयानं व्यक्त केलीय. पुर, भूस्खलन आणि विजा पडल्यानं अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती नेपाळच्या गृहमंत्रालयानं दिली. अनेक ठिकाणचे रस्ते आणि पुलही वाहून गेले आहेत.

नेपाळचे लष्कर दल, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिस मदत आणि बचावकार्यात गुंतले आहेत. मुसळधार पावसामुळे नेपाळच्या (Nepal Flood) अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे बंद आहेत. अनेक महामार्ग, राजधानी काठमांडूला जोडणारे अनेक रस्तेही पावसामुळे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडचणी येत आहेत. मंगळवारपर्यंत रस्ते पुन्हा सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न करत असल्याचं गृहमंत्रालयाचे प्रवक्ते ऋषिराम तिवारी यांनी सांगितले. देशात पुरामुळे झालेल्या घटनांमध्ये 111 जन जखमी झाले आहेत. पोखरेल म्हणाले की, सर्व सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. लष्कराने देशभरात अडकलेल्या 162 लोकांना एअरलिफ्ट केले आहे. याशिवाय लष्कर, पोलिस आणि सशस्त्र पोळी दलाच्या जवानांनी बाधित भागातून 4,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. लोकांना अन्नधान्यसह सर्व आवश्यक मदत साहित्य वाटप करण्यात आले आहे.

भूस्खलन आणि पानी साचल्याने राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत होत आहेत. त्यामुळे शेकडो लोक येथे अडकून पडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग खुले करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय काठमांडूला इतर जिल्ह्यांशी जोडणारा मुख्य भूमार्ग असलेल्या त्रिभुवन महामार्गावर वाहतूक पुन्हा झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे नेपाळमध्ये किमान 322 घरे आणि 16 पूलांच नुकसान झालं आहे. शनिवारी काठमांडूच्या सीमेला लागून असलेल्या धाडिंग जिल्ह्यात भूस्खलनामुळे बसमधील किमान 19 जणांचा मृत्यू झाला. मकवानपुर येथील ‘ऑल इंडिया नेपाळ असोसिएशन‘ संचालित प्रशिक्षण केंद्रात भूस्खलनाच्या घटनेत सहा फुटबॉल खेळाडूंना आपला जीव गमवावा लागला आणि इतर पुराच्या पाण्यात वाहून गेले.

Nepal Flood

याबाबत नेपाळ पोलिसांचे उप प्रवक्ते वरिष्ट अधीक्षक बीश्वो अधिकारी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शोध आणि (Nepal Flood) बचावकार्य सातत्याने सुरू आहे धाडिंगजवळील झापलेखोला येथे दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड हटवून रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नेपाळच्या विविध भागांमध्ये दरड कोसळून महामार्ग बंद झाल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. तेथे अडकून पडलेल्या प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्कराच्या देशातील सुरक्षा दलाच्या सर्व तुकड्यांना बचावकार्यात मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्राकडून जिल्हास्तरीय प्रशासणालाही सूचना देण्यात आल्या आहेत.

झापले नदीत भूस्खलन झाल्यामुळे काठमांडूमधून प्रवेश आणि बाहेर पडणे बंद करण्यात आले आहे. गेल्या 40-45 वर्षात काठमांडू खोऱ्यात इतका विनाशकारी पुर त्यांनी पहिला नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. आपत्ती जोखीम कमी व्यवस्थापन प्राधिकरणाने 77 पैकी 56 जिल्ह्यांसाठी इशारा जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे आपत्तीचा धोका जास्त आहे.

Nepal Flood: मातीच्या ढिगाऱ्याखालील वाहनांतून काढले 35 मृतदेह

अधिकाऱ्यांनी सांगितले की, काठमांडूमधील चंद्रगिरी नगरपालिका आणि धाडिंगच्या सीमेवरील झापलेखोला इथं भूस्खलनानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या वाहनांमधून 21 मृतदेह बाहेर काढण्यात आले. सशस्त्र पोलिस दलाचे सह प्रवक्ते शैलेन्द्र थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणाहून 14 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. आता पर्यंत इथून एकुन 35 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अजूनही शोध आणि बचावकार्य सुरू आहे. परंतु ढिगाऱ्याखाली किती वाहनं आहेत. याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचंही थापा यांनी सांगितलं. ढिगारा हटवण्याचं काम सुरू असून या कार्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक दिवस लागू शकतात, असंही त्यांनी सांगितलं. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 200 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 42 जन बेपत्ता आहेत.

Nepal Flood

पुर परिस्थिति पाहता प्रशासनाने तीन दिवस सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवली आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती नेपाळच्या गृहमंत्रालयानं व्यक्त केलीय.

Nepal Flood: आतापर्यंत नेपाळ मध्ये किती नुकसान

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पुरात अडकलेल्या 3600 हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. काठमांडू घाटातील तीन जिल्ह्यांमधून जवळपास 2000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागातील लोकांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसला. सततच्या पावसामुळं 300 हून अधिक घरं आणि 16 पूलाचं नुकसान झालं आहे. पाचथर आणि सिंधुपाल चौक या ठिकाणचे दोन पूल पुरात वाहून गेल्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं यासह चार कॉँक्रिट पूल, तीन सस्पेंशन पूल आणि 7 विविध प्रकारचे पुलही वाहून गेल्याची माहिती आहे.

रविवारी सकाळी नेपाळ पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारी नुसार काठमांडू खोऱ्यातील पाच तर कोसी प्रांतातील सहा ठिकाणचे महामार्ग पूर्णपणे बंद आहेत. सकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बागमती प्रांतात 25 ठिकाणचे रस्ते पूर्णपणे बंद आहेत. याशिवाय गडकी प्रांतातील तीन लुंबीनीमध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे. पुर व भूस्खलनाने अनेक ठिकाणचे मार्ग प्रभावित झाले आहेत. हे मार्ग सुरळीत करण्यावर आमचा भर असल्याची माहिती गृह मंत्रालयाचे प्रवक्ते ऋषि राम तिवारी यांनी माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की शनिवारी काठमांडू सीमेलगतच्या धाडिंग जिल्ह्यात भूस्खनामुळे बस गाडली गेल्याने कमीत कमी 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

Nepal Flood

भूस्खलन आणि पानी साचल्याने राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत होत आहेत. त्यामुळे शेकडो लोक येथे अडकून पडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग खुले करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय काठमांडूला इतर जिल्ह्यांशी जोडणारा मुख्य भूमार्ग असलेल्या त्रिभुवन महामार्गावर वाहतूक पुन्हा झाली आहे. याबाबत वैज्ञानिकांनी सांगितलं की, हवामान बदलामुळे संपूर्ण आशियात पावसामुळे मोठे बदल पहायला मिळत आहेत. मात्र शहरामधील अनियोजित बांधकामामुळे पुरपरीस्थिति उद्धवल्याचं सांगितलं जात आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!