नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या जळगाव जिल्ह्यातिल पर्यटकांची, बस नदीत कोसळून भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू

Nepal Bus Accident

Nepal Bus Accident: नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने 19 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 16 जणांवर उपचार चालू आहे. मृतांमध्ये काही जण जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात नसर्यागडी अंबूखैरनी जवळ घडला. भाविक पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.

बसमध्ये एकूण 40 जण होते अशी माहिती मिळाली आहे. त्यापैकी बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील आहेत. उपमुख्यमंत्री याबाबत सचिवांशी चर्चा केल्याची माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांशी सरकारचा समन्वय आहे. त्यांच्या मदतीनं मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. असं फडणवीस म्हणाले. याबाबत महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजित 41 पर्यटक हे नेपाळमध्ये दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी गेले होते. त्यांची बस नदीमध्ये कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर आहे.

पोलिस दलाचे पथक अपघातस्थळी पोहोचले असून ते बचावकार्य करत आहेत. नेपाळ पोलिस दल आणि नेपाळ लष्कराकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारने देखील घटनेची दखल घेत उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना घटनास्थळी पाठले पाठवले आहे. उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हंटले की, मिडिया रिपोर्टस् आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11.30 वाजता चालक आणि एका सहाय्यकासह महाराष्ट्रातील सुमारे 41 प्रवाशांना घेऊन जाणारी बस मार्सयांगडी नदीत कोसळली.

Nepal Bus Accident
Nepal Bus Accident

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दूतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकाऱ्याशी सातत्याने संपर्कात आहेत. एका प्रांत आई पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत. असेही फडणवीसांनी ट्विटर द्वारे दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रणगाव, पिंपळगाव, तळवेल या गावातले सर्व भाविक होते. घटनेची माहिती मिळताच गावात अतिशय शोकाकुल वातावरण आहे. गावातील भाविक हे 16 ऑगस्टपासून अयोध्या नेपाळ काठमांडू देवदर्शनासाठी गेले होते. 16 ते 28 ऑगस्ट पर्यंत असा यांचा प्रवास होतो. एकूण दोन लक्झरी बस नेपाळला गेल्या होत्या. गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून नातेवाइकांनी टाहो फोडला आहे.

Nepal Bus Accident: आम्ही तिथल्या यंत्रणाच्या संपर्कात- अनिल पाटील

नेपाळमधील अपघातबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मला तासाभरापूर्वी ही घटना समजली आहे. मी संबंधित गावाचे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. उत्तर प्रदेशच्या नेत्यांसोबतही यासंदर्भात चर्चा केली. नेपाळमधील काठमांडूला सर्व भाविक जात असताना बसला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 41 भाविक बसमध्ये होते. त्यातील 14 जण ठार झाले आहेत. नेपाळच्या लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आताच सर्व गोष्टी जाहीर करणं शक्य नाही. पण आम्ही तिथल्या सर्व यंत्रणासोबत आम्ही संपर्कात आहोत.

Nepal Bus Accident

Nepal Bus Accident: मृतांचे पार्थिव लवकरच महाराष्ट्रात आणणार- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने तत्काळ नेपाळी दूतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत. असेही फडणवीसांनी ट्विटर द्वारे दिली आहे.

Nepal Bus Accident: बचावकार्यात अडचणी?

घटणस्थळा वरुण समोर आलेल्या फोटो आणि व्हीडिओ, मसर्यांगदी किनाऱ्यावर अपघातग्रस्त बसचे अवशेष दिसत आहेत. अंबूखेरानी पोलिस स्थानकाचे प्रमुख शिव थापा यांनी, बस एका विचित्र जागी कोसळली त्यामुळे बचावकार्य करणं कठीण आहे, असं म्हटलं आहे. नेपाळच्या गृह मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख भीष्म कुमार भुसाल यांनी बचावकार्यासाठी एका मेडिकल टीमबरोबर हेलिकॉप्टर नेण्यात आलं आहे. अशी माहिती दिली.

Nepal Bus Accident

Nepal Bus Accident: हेल्पलाइन क्रमांक

या बस अपघातानंतर काठमांडू येथील भारतीय दूतावासाने आपत्कालीन मदत हेल्पलाइन क्रमण जारी केला आहे. भारतीय दूतावासाने सांगितले की, पोखराहून काठमांडूला जाणारी एक बस आज मसर्यांगदी नदीत, 150 मीटर खाली कोसळली, त्यात सुमारे 43 लोक होते. भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने मदत आणि बचाव कार्य पाहत आहे. भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन मदत क्रमांक +977-9851107021 हा आहे. तनाहूचे मुख्य जिल्हा अधिकारी जनार्दन गौतम घटनास्थळी असून त्यांनी 12 गंभीर जखमींना लष्कराच्या हेलिकॉप्टरनं काठमांडूला उपचारासाठी हलवल्याची माहिती दिली आहे.

गेल्या महिन्यातही नेपाळमधून बस अपघाताच्या दोन बातम्या समोर आल्या होत्या. चिटवनच्या सिमलताल येथे भूस्खलनामुळे दोन प्रवासी बस त्रिशूली नदीत कोसळल्या होत्या. त्यात डझनभर लोकांचा मृत्यू झाला.

Nepal Bus Accident: अपघातात 19 जणांचा मृत्यू

अपघातानंतर मदत आणि बचाव कार्यात 19 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 16 जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. तसेच. त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोखरा येथील माझेरि रिसॉर्टमध्ये थांबलेल्या महाराष्ट्रातील भाविकांनी घेऊन ही बस काठमांडुकडे रवाना झाली होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेले सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!