Nagpur Blast
Nagpur Blast: नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर मध्ये स्फोटक (Nagpur Blast) तयार करणाऱ्या एका कंपनीमध्ये भीषण अपघात झाला आहे. चामुंडा एक्सप्लोसिव्ह या स्फोटके तयार कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटत आतापर्यंत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात चार महिला आणि एक पुरुषाचा संवेश असल्याची माहिती पुढे आली आहे. तर इतर 5 कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत. तर त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृतही हाती आले आहे. हा स्पोट इतका भीषण होता की लगेच या कंपनीमध्ये आग लागली त्यानंतर उपस्थितांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने हे प्रयत्न अपयशी ठरलेत.
नागपूर शहरातील धामणा या परिसरात ही चामुंडा एक्सप्लोसिव्ह स्फोटके तयार करणारी कंपनी असून कंपनीमध्ये स्फोटक तयार केली जातात. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आलीआहे. मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली, हे अद्याप कळू शकलेले नाही.

संपूर्ण देशाला उत्सवासाठी, आनंद साजरा करण्यासाठी फाटके पुरविणाऱ्या तमिळनाडू ‘शिवकाशी’ तुन नित्यानेमाणे अपघाताच्या बातम्या येतात. शोभेची दारू हातळताना, फटाके टायर करताना स्फोट होऊन मंजूर थार झाल्याच्या त्या बातम्या चार-दोन दिवस चर्चेत राहतात. नंतर सगळे विसरून जातात. असेच काहीसे प्रकार महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात घडू लागले आहेत. आणि ते ‘शिवकाशी’ पेक्षा गंभीर आहेत.
कारण, फटाक्यावर बंदी, पर्यावरणपूरक फटाके आदि कारणांनी अपघातांवर आळा घळण्याआधीच शिवकाशीच्या फटाका उद्योगावर अवकळा आली आहे. नागपूरचे तसे नाही. या शहराच्या अवतीभोवती करखान्यांमध्ये हाताळली जाणारी स्फोटके, तिथे वापरला जाणारा दारुगोळा शोभेचा नाही तर अगदी लष्करात किंवा खानीमध्ये वापरला जाणारा, असून, तो तिथे काम करणाऱ्या गोरगरीब मंजुरांसाठी जीवघेणा ठरत आहे.
स्फोटात 5 जणांचा जागीच मृत्यू, 5 गंभीर जखमी
नागपूर शरतील धामणा या परिसरात ही चामुंडा एक्सप्लोसिव्ह स्फोटके टायर करणारी ही कंपनी आहे. आज 13 जुनच्या दुपारच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट झाला त्यावेळी या कंपनीमध्ये 10 ते 12 कामगार काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा (Nagpur Blast) स्फोट इतका भीषण होता, की यात पाच कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. तर इतर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर मृतकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.
अग्निशमन पथकाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न
स्फोटात जखमी झालेल्या जखमींना नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली असून कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या नातेवाइकांनी कंपनीत परिसरात एकाच गर्दी केली आहे. आद्यप कंपनीच्या आतमध्ये कुणालाही सोडवण्यात आलेले नाही. सध्या अग्निशमन पथकाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटक असल्याने इतर कुणालाही परिसरात जाऊ दिल्या जात नाही आहे. सध्या घटनास्थळी पोलिस आणि संबंधित प्रशासन दाखल झाले असून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात काहीसा तणावाची परिस्थिति निर्माण झाली आहे.
Nagpur Blast: 250 रुपये मजुरीसाठी गमावले प्राण
प्रांजली आणि प्रणाली या मोदरे कुटुंबातल्या दोन मुली. प्रणाली यांच लग्न झालं आहे. अविवाहित असलेली प्रांजली आई-वडिलांचा आधार होती. मोदरेंच्या घरात एकही एकर शेती नाही. आज मंजूरीनं गेल नाहीतर उद्या खाणार काय अशी हलाखीची परिस्थिति आहे. प्रांजली आणि प्रणाली यांचे वडील किसन मोदरे एका स्टील कंपनीत मंजूरी करतात. पण त्याचीही प्रकृती ठीक नसल्यामुळे अलीकडे ते घरीच रहायचे. आई एकटी शेतमाजुरी करायची. घरात आईला हातभार होईल म्हणून प्रांजली गेल्या दीड वर्षापासून चामुंडी एक्सप्लोसिव्ह या कंपनीत 250 रुपये मंजूरीनं जायची.
तिला येत्या बुधवारी लग्नासाठी मुलगा बघायला येणार होता. सगळ्यांनी प्रांजलीच्या लग्नाचे स्वप्न रंगवल होत. पण, गुरवारी (13 जून) सकाळी ती घरातून कंपनीत गेली ती कायमचीच. प्रांजलिप्रमानेच धामणा गावातल्या 19 ते 30 वयोगटातल्या पाच तरुणी स्फोटकाच्या कंपनीत कामाला जायच्या. तीच स्फोटक त्यांच्या जिवावर बेततील असं विचारही त्यांनी स्वप्नात केला नव्हता. टेक झालं आणि घराचा आधार असलेल्या तरुणीचा भीषण स्फोटात झाला. या स्फोटाचे हादरे गावातल्या मनामनांना बसले असून कोणी आक्रोश करत होते, तर कोणाच्या मनात कंपनीबद्दल चीड, दोष दिसत होता.
Nagpur Blast: स्फोट कसा झाला? अधिकाऱ्यांनी काय कारण सांगितलं?
- आम्ही स्फोट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 14 जूनला नगपूरवरून धामणा लिंगा या गावात पोहोचले. गावात महामार्गाशेजारी अख्ख गाव एकत्र झालं होत. याच गावाला लागून चामुंडी एक्सप्लोसिव्ह ही कंपनी आहे जिथ गुरुवारी (13 जून) ला स्फोट झाला होता.
- ही कंपनी 37 वर्षापासून या गावाशेजारी आहे. गावापासून कंपनीपर्यंत जवळपास दोनशे पोलिस तैनात होते. त्यामुळे परिसराला छावणीच स्वरूप आल होत. आम्ही सुरुवातीला स्फोट झाला त्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत गेलो. या कंपनीला तीन गेट आहेत. तर जवळपास तीन युनिटमध्ये तिथे काम चालत.
- तिथं एक्सप्लोसिव्ह डिपार्टमेंट, सुरक्षा विभाग, कामगार आयुक्त असे सगळे सरकारी अधिकारी आपआपसात तपास करत होते. स्फोटामुळे सगळ छिन्नविच्छिन्न झालं होत. पण, हे कशामुळे घडल? नेमक कारण काय? यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या स्फोटाच्या ठिकाणी भेट दिली.
- यावेळी एक्सप्लोसिव्ह डिपार्टमेंटचे अधिकारी अनुज कुमार यांनी स्फोटाच कारण सविस्तर समजावून सांगितल. त्यानुसार, ज्या प्लॉटमध्ये स्पोट झाला तिथ फटाक्याच्या वाती पॅकिंगचं काम चालायच. त्यामध्ये दारुगोळा असल्याने या ठिकाणी नियमानुसार इलेक्ट्रिक बॅटरी किंवा पेट घेणाऱ्या कुठल्याही वस्तु ठेवता येत नाही.
- पण या खोलीत इन्व्ह्टरची बॅटरी ठेवलेली होती. दुसर म्हणजे फटाक्याची वाट प्लॅस्टिकमध्ये सीलबंद करताना पॅकिंग मशीनचा वापर केला जातो. पॅकिंग करताना चुकून मशीन फटाक्याच्या वाटीवर बसली आणि त्यातून स्पार्क झाला असावा. त्याच खोलीत दारुगोळा असलेल्या फटाक्याच्या वतींचा साठा ठेवला होता. हा साठा, इन्व्ह्टरची बॅटरीयामुळे आग जास्त भडकली, अस अनुज कुमार यांनी त्यावेळी सांगितल.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!