यंदाची नागपंचमी आहे खास.. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अशी करा नागदेवताची पूजा, जाणून घ्या शुभ महूर्त आणि महत्व

Nag Panchami 2024

Nag Panchami 2024: श्रावण महिन्यातला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला सण नागपंचमी. श्रावण महिना सुरू झाला की, अनेकांना वेध लागतात ते सण- उत्सवाचे श्रावणी सोमवार, श्रावणी मंगळवार अर्थात मंगळागौरी आणि त्यानंतर येणारा मुख्य सण नागपंचमी. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जातो. यंदा नागपंचमी 9 ऑगस्टला शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. या काळात शिव-पार्वतीसह नागदेवताची पूजा केली जाते. यंदा नागपंचमीला सिद्ध आणि साध्य असे दोन योग तयार होत आहे. त्यामुळे हा दिवस अनेक राशींसाठी शुभ ठरेल.

पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नागपंचमी सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने सर्प दोषांपासून मुक्ती मिळते. नागपंचमी हा दिवस नाग प्रजातीचे रक्षण करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस आशा अनेक गोष्टी आहेत. जे करू नयेत असे म्हंटले जाते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया.

Nag Panchami 2024
Nag Panchami 2024

पौराणिक कथेनुसार, महाभारत काळात राजा जनमेजयाने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सापांना मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर सापांच्या रक्षणासाठी आस्तिक ऋषींनी श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी यज्ञ केला. तेव्हापासून ही तिथी नगदेवतेच्या पूजेसाठी खास मानली जाते. त्यानुसार यंदाच्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी आली आहे. साप शेतकऱ्यांचे मित्र आहेत. हजारो किलो धान्यांची नासाडी करणाऱ्या उंदरांना ते फस्त करतात, म्हणूनच हिंदू संस्कृतीत नागपंचमी हा सण त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून साजरा केला जातो.

Nag Panchami 2024: नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त?

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. यंदा पंचमी तिथी ही 9 ऑगस्टला दुपारी 12 वाजून 36 मिनिटांनी सुरू होईल तर 10 ऑगस्टला पहाटे 3 वाजून 14 मिनिटांनी संपेल. नागपंचमीच्या दिवशी दुपारी 01 वाजून 46 मिनिटांपर्यंत सिद्धी योग राहील. त्यानंतर साध्ययोग सुरू होईल. नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्यासाठी 2 तस 40 मिनिटांचा मुहूर्त सर्वोत्तम मानला गेला आहे. नागपंचमीला पूजेची शुभ वेळ ही सकाळी 5 वाजून 46 मिनिटांपासून ते 8 वाजून 26 मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर उत्तम वेळ ही दुपारी 12 वाजून 26 मिनिटे ते 2 वाजून 5 मिनिटांपर्यंत असणार आहे.

नागपंचमीला कोणत्या गोष्टी करण्यास आहे मनाई?

नागपंचमीच्या दिवशी (Nag Panchami 2024) नागांची पूजा करून त्यांचे रक्षण करण्याची जनजागृती केली जाते. शिवाय या दिवशी सापाला त्रास होईल असे कोणतेच काम करू नये. जसे की,

  • नागपंचमीच्या दिवशी सापांना कोणताही त्रास देऊ नका, त्यांचा शारीरिक छळ होईल असे कुठलेच कृत्य करू नका आणि सापांच्या प्रतिमेचे पूजा करून जीवंत सापांचे रक्षण करेल अशी शपथ घ्या.
  • नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाक करण्यासाठी तवा आणि लोखंडी कढई चुलीवर किंवा गॅसवर ठेवू नका कारण असे केल्याने सर्पदेवतेला त्रास होतो, असे मानले जाते.
  • नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाला किंवा नागदेवाला तांब्याच्या भांड्यात दूध अर्पण करू नये. पाण्याखाली तांब्याचे भांडे आणि दुधासाठी पितळाचे भांडे वापरावे.
  • सुई, चाकू, करवत यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो.
  • या दिवशी जीवंत सापाला दूध देऊ नका. दूध हे सापांसाठी विषासारखे असू शकते, म्हणून त्याच्या मूर्तीवरच दूध अर्पण करावे.
  • कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करण्यास या दिवशी मनाई आहे. म्हणजे जमिनीची खुरपणी करणे, शेतातील गवत उपटणे, नांगरणी करणे या गोष्टी टाळाव्यात, असे म्हणतात की, असे केल्याने जमिनीच्या आतील सापांच्या बिळाला धक्का लागू शकतो.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. MHTimes24 या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

Nag Panchami 2024: नागपंचमी पूजा विधी

  1. नागपंचमीच्या दिवशी 8 नागांची पूजा केली जाते. त्यात वासुकी, ऐरावता, मनिभद्र, कालिया, धनंजय, तक्षक, कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र, त्यांची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात.
  2. या दिवशी घरच्या भिंतीवर किंवा पाटावर नागदेवताचे चित्र काढावे. तसेच मातीच्या नागांची पूजा आपण करू शकतो.
  3. नाग देवताला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी. नागदेवतांच्या मंत्राचे पठन करावे.
Nag Panchami 2024

नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय शिकवते?

आपले भारतीय सण आणि संस्कृतीमधून सर्वांवर प्रेम करायला शिकवले जाते. केवळ माणूस नव्हे तर प्राण्यांवर ही जीव लावण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी काही सण साजरे केले जातात. जसे की हिंदू धर्मात गाईची पूजा केली जाते. वटसावित्रीला वडाची, तर बैल पोळाला बैलाची पूजा करण्याची परंपरा आहे. त्याच प्रमाणे नागपंचमीला नागाचे पूजन केले जाते. नागपंचमी साजरी करण्याची एक विशिष्ट धार्मिक कथा आहे. पण त्या बरोबर एक वेगळा दृष्टीकॉन देखील या सणाच्या बाबतीत आहे. तसं पहिलं तर नाग हा रानावनात वारुळात राहणारा प्राणी आहे, पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो. अशावेळी त्याला न् हटकता, आणि मारता, त्याच्या अतिथि देवो भव प्रमाणे पूजन करायचे या उद्देशाने देखील हा सण साजरा करण्याची परंपरा रुजू झाली असावी असा देखील अंदाज वर्तवला जातो.

नागांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेताची राखण करतात. उंदीर, घुस इ. शेतात येऊ डेट नाही. हे सुद्धा त्यांचे एक प्रकारचे उपकारच आहे. त्यामुळे नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणून देखील संबोधले जाते. थोडक्यात काय तर, विषारी सर्पालाही चांगुलपणा पहावयास नागपंचमी शिकवते.

Nag Panchami 2024: नागपंचमीला महाराष्ट्रात कोणता खास पदार्थ केला जातो?

श्रावणातिल पहिला सण नागपंचमी (Nag Panchami 2024) हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. कानोळे ही महाराष्ट्राची एक अस्सल, पारंपरिक पाककृती आहे. ही एक नागपंचमी स्पेशल रेसिपी. महाराष्ट्रात नागपंचमीच्या दिवशी कापणी न् करणे, भजने किंवा कढई न् वापरणे अशी परंपरा लोक पाळतात. अशात ही रेसिपी वेगळी आहे, पण सहज करता येते. ही रेसिपी तुम्ही घरी करून पाहू शकता. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या सापांचे आभार मानण्यासाठी ही उत्सव साजरा केला जातो. या दिवशी नागांची पूजा केली जाते आणि खीर हा नैवेद्याचा मुख्य पदार्थ आहे. कानोळे हे गव्हाचं पीठ, गुल आणि तेल घालून तयार केलं जातं, हे पीठ लाटून सर्व त्रिकोणी आकाराचे कानोळे कुकरमध्ये वाफवून घेतले जाते.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!