मोबाइल चोराला मोबाइलमध्ये सापडले प्रायव्हेट व्हिडिओ; केली लाखोंची मागणी, त्याच्या पत्नीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Mumbai Crime

Mumbai Crime: मोबाईलचे जेवढे फायदे आहे, तेवढेच तोटे आहे. त्याच मोबाइल मध्ये तुम्ही आपले प्रायव्हेट व्हिडिओ काढत जाऊ नका! कारण त्यामुळे तुमच्या जिवावर बेतू शकते. असाच काहीसा प्रकार मुंबई (Mumbai Crime) मधील गोरेगाव परिसरात घडला आहे. मोबाइल चोरल्यानंतर त्यातील खासगी चित्रफीत समाज मध्यमांवर सर्वदूर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी 25 वर्षीय तक्रारिवरून वनराई पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. CCTV वरुण आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे. तक्रारदार विवाहित असून तो कुटुंबियांसह विरार येथे राहतो. गेल्या 4 वर्षापासून खाद्यपदार्थ वितरणाचे काम तो करतो.

अंधेरी पश्चिम येथे 3 जुलैला खाद्यपदार्थाचे वितरण करण्यासाठी तो आला होता. त्यावेळी त्याचा मोबाइल दुचाकीवर लावला होता. तो अनोळखी व्यक्तीने चोरला. या प्रकरणी तक्रारदाराने अंधेरी येथील आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर 26 जुलैला तकारघरी असताना त्यांना एक अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपले नव अहमद खान उर्फ नूर खान असल्याचे सांगितले. त्याला तक्रारदाराचा चोरी झालेल्या मोबाइल मधील मेमरी कार्ड मिळाले असून त्यात तक्रारदार व पत्नीची खासगी ध्वनिचित्रफीत असल्याचे त्याने सांगितले. एक लाख रुपयांची मागणी केली. एक लाख रुपये न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

Mumbai Crime
Mumbai Crime

त्यानंतर आरोप खान तक्रारदाराला वाकोला पोलिस ठाण्यात शेजारी असलेल्या स्वागत बार बाहेर भेटण्यासाठी बोलावले. तक्रारदर तेथे गेले असता आरोपी तेथे आला. त्याने मोबाइलवर त्यांचे व पत्नीची ध्वनिचित्रफीत दाखवली. त्या चित्रफितीसाठी आपल्याला दुसरीकडून दोन लाख रुपये मिळत असल्याचे आरोपी सांगितले. त्याच्या धमकीला घाबरून तक्रारदाराने त्याला पैसे देण्यास होकार दिला. तसेच 10 दिवसांची मुदत मागून घेतली. पण तक्रारदाराने या प्रकरणी वनराई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 307 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. CCTV च्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे. अजय यांच्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा विरोधात (Mumbai Crime) गुन्हा दाखल केला. भाद वि 308 (2)अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी कसून चुकशी करण्यात येत आहे. अज्ञात आरोपीचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. बारमधील CCTV फुटेज तपासण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Crime: नेमकं प्रकरण काय आहे, पोलिसांनी दिली माहिती?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हे गोरेगाव पूर्व येथे पत्नीसोबत राहतात. ते मागील पाच महिन्यांपासून फूड डिलिव्हरी ॲपवर काम करत आहेत. 3 जुलै रोजी ते अंधेरी पूर्व येथे फूड डिलिव्हरी देण्यासाठी जात होते, त्याचवेळी दुचाकीवर मोबाइल स्टँडवर असलेला मोबाइल चोरीला गेला. त्यानंतर 26 जुलै रोजी अजय यांना एक फोन आला अँ खंडणीची मागणी केली. अहमद खान उर्फ नूर खान अशी फोन करणाऱ्या व्यक्तिचं नाव होतं.

आरोपीने अजय यांच्याकडे फोनमधील मेमरी कार्ड असल्याचे सांगितले, ज्यात त्याचे आणि त्याच्या पत्नीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ असल्याचेही सांगण्यात आले. ते ते नष्ट करण्यासाठी रु. 1 लाख रुपयांची मगणी केली. रक्कम न् दिल्यास फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली.

Mumbai Crime

Mumbai Crime: मेमरी कार्डमधील व्हिडिओ हाती लागले

तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की, 26 जुलै रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास त्याला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यामध्ये अहमद खान असं नव त्याने सांगितलं. मोबाइलच्या मेमरी कार्डमध्ये त्याला काही प्रायव्हेट व्हिडिओ सापडले. त्यामध्ये त्याच्या पत्नीचेही व्हिडिओ असल्याचं त्याने सांगितले. त्यानंतर कॉलरने अजय झा यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली आणि असे न् केल्यास. तो व्हिडिओ सोशल मिडियावर टाकू अशी धमकी दिली.

दहा दिवसांचा वेळ दिला

हा व्हिडिओ कुठेही पोस्ट केला जाईल अशी भीती फिर्यादीला होती. त्यामुळे आरोपीकडे पैसे जमा करण्यासाठी 10 दिवसांचा वेळ मागितला आणि आरोपीनेही तसा वेळ दिला. पण त्यामुळे एवढी रक्कम जमा करणे अवघड होते. त्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. अजय झा यांच्या तक्रारीच्या आधारे बनराई पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल केला नि अंधेरीतील ओशिवरा येथून एका संशयिताला ताब्यात घेतले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी हाच मोबाइल चोर होता का याचा शोध घेत आहेत.

Mumbai Crime: एक लाख रुपयांची मागणी

फिर्यादीचा आरोप आहे की, तेव्हा पासून त्याला अनेक कॉल येत आहेत. परंतु 30 जुलै आरोपीने त्याच्याशी संपर्क साधला आणि सांताक्रूझ येथील रेटरो रेस्टॉरंटमध्ये भेटण्यास सांगितले. जेव्हा तो त्याला भेटला तेव्हा त्याने मोबाइलमधील पत्नीचा खाजगी व्हिडिओ दाखवला. तसेच हा व्हिडिओ त्याने एका मित्रालाही फॉरवर्ड केल्याची माहिती त्याने दिली. हा व्हिडिओ हवा असेल तर एक लाख रुपये दे अशी मागणी आरोपीने फिर्यादीकडे केली. तसे न केल्यास तो व्हिडीओ दोन लाख रुपयांना विकण्याची धमकी दिली.

पोलिसांकडून आरोपिचा शोध-

अजय यांच्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा विरोधात गुन्हा दाखल केला. भाद वि 308 (2)अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी कसून चुकशी करण्यात येत आहे. अज्ञात आरोपीचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. बारमधील CCTV फुटेज तपासण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपींचा दूसरा फोन अन्..

अजय यांना 30 जुलै रोजी दूसरा फोन आला आणि संताक्रुझ पूर्व येथील वाकोला येथील बारमध्ये त्यांची भेट घेतली. आरोपी आणि अजय यांची भेट झाली. आरोपीने फोटो आणि व्हिडिओ मित्राला फॉरवर्ड केल्याचं त्यांना दिसलं. आरोपी खान यानं सांगितले की एक लाख रुपये दिले नाही तर खासगी व्हिडिओ आणि फोटो दोन लाख रुपयांना विकणार अन् ऑनलाइन पोस्टही करेल. खानची धमकी ऐकुन अजय घाबरले, त्याची एक लाख रुपये देण्याच कबूल केले. पण रोख रक्कम उभी करण्यासाठी दहा दिवसाचा वेळ मागीतल्याचं तक्रारीत सांगितले.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!