आपल्या घरातील वयोवृद्धासाठी देशातील सर्व तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा पहा कसे जाता येईल ते

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार ही आपल्या घरातील वयोवृद्धासाठी संपूर्ण देशातील तीर्थस्थळे मोफत फिरवणार आहेत. त्या साठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ (Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024) ही सुरू करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ अंतर्गत राज्य सरकार जनतेला देवदर्शन घडवणार असून पात्र व्यक्तींचा प्रवासाचे, राहण्याचे आणि भोजनाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. केवळ राज्यातीलच नव्हे; तर परराज्यातील तीर्थस्थळांना ही भेट देता येईल. या संदर्भातील योजनेची अलीकडेच घोषणा करण्यात आली होती. आता योजनेचे शासकीय परिपत्रक ही काढण्यात आले असून, यात योजनेच्या अटी, शर्ती, नियम, वय आदींची माहिती देण्यात आली आहे.

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजनेत राज्यातील एकुन 66 व भारतातील एकुण 73 तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राजस्तरीय समिति; तर जिल्हास्तरीय समिति ही संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे, ही समिति अर्जाची छाननी करून पात्र व्यक्तींची निवड प्रक्रिया पूर्ण करणार आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील मोठ्या तीर्थ यंत्रांना जाऊन मनशांति तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मियांमधील जेष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 या योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रानं पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. तसेच प्रवास खर्चासाठी कमाल प्रतीव्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादि बाबींचा समावेश असेल. लाभार्थी वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार असावे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष साठ वरील जेष्ठ नागरिक असावा. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत. सदर योजनेअंतर्गत तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय. आर. सि. टि. सि. (IRCTC) समकक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे.

तसेच, प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हयासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जाच्या उपलब्धतेनुसार लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे.

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यासाठी काय पात्रता आवश्यक?

  • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक.
  • वय वर्ष 60 आणि त्यावरील जेष्ठ नागरिक.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं

अर्ज कसा करावा…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे (Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024) अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतु सुविधा केंद्रावर ऑनलाइन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रकिया विहित केलेली आहे.

  1. पात्र जेष्ठ नागरीकास या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.
  2. ज्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतु केंद्रात उपलब्ध असेल.
  3. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  4. अर्जदाराने स्वत: उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्याचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
  5. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
  6. स्वत:चे आधार कार्ड
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ साठी अपात्र कोण ठरणार?

  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये.
  • कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. दरम्यान, 2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेसाठी पात्र ठरतील.
  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
  • ज्याच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
  • अर्जासोबत, जेष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनं पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ति शरीरीकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुनं नसावं)
  • सदर योजनेच्या Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 पात्रता आणि अपात्रता निक्षकांमद्धे सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन कार्यवाही करण्यात येईल.

लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत (Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024) प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली. जाईल.

  1. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल. ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आधीभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल.
  2. निवडलेला प्रवासी प्रवासाला न् गेल्यास. प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल.
  3. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल.
  4. फक्त निवडलेली व्यक्ति तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो/ती त्यांच्यासोबत इटर् कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही.
  5. जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.

प्रवासादरम्यान लाभार्थ्यांना अटी-शर्तीचं पालन करावं लागणार

  • प्रवाशांना कोणत्याही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेहण्यास प्रतिबंध राहील.
  • राज्याची/देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे.
  • प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी/व्यवस्थापक यांच्या सुचनांचे पालन करतील. वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्रक घेतले जाईल.
  • प्रवाशांना विभागाच्या विहित प्रणालीमध्ये सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोणताही प्रवासी इतर प्रवाशांची गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही. साधारणपणे, ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील. विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!