MPSC Students Protest Pune
MPSC Students Protest Pune: पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आयबीपीएस परीक्षा आणि MPSC ची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अ दोन्ही परीक्षाएकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची (MPSC Students Protest Pune) अडचण झाली आहे. या पैकी एक परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला यश आलं असून एमपीएससीची 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा 25 ऑगस्टला आयोजित केली होती. या परीक्षेत कृषि सेवेतील पदांचा समावेश करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे.
या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवार पासून पुणे शहरात आंदोलन करण्यात सुरुवात केली आहे. या आंदोलनाला आता विरोधी पक्ष नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे, तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंती केली असून आज महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे. तर या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. पुण्यातील नवीपेठेतिल शास्त्री रोडवर विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाल्याने या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मोठ्या संख्येने विद्यार्थी घटनास्थळी दाखल झाल्यामुळे अलका चौकातून दांडेकर पूलाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. एलबीएस रोड देखील बंद ठेवण्यात आला आहे. आपल्या मागण्यावरती विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. परिसरातील बॅरिकेट्स काढून विद्यार्थी एकत्र जमा झाले आहेत.

या आंदोलनाचे राजकीय पडसाद देखील उमटत आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला या विषयी तोडगा काढण्याबाबत विनंती केली असून आज महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला. आता शरद पवार यांनी देखील एक्सवर पोस्ट करत लवकरच तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र शासनाने लोकसेवा आयोगाला कृषिच्या 258 पदांचा समावेश करावा अशी अधिकृतपणे विनंती केली आहे. तसेच आयबीपीएस परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी असल्याने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली.
MPSC Students Protest Pune: परीक्षा पुढे ढकलली; मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम
एमपीएससीच्या गुरुवारीच्या बैठकीत 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, असे ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली. मात्र, लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेत कृषि विभागाच्या 258 जागांचा देखील समावेश करावा. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.
MPSC Students Protest Pune: मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
पुण्यामध्ये मंगळवार पासून एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच होतं. बुधवारी रात्री पुण्यातील रस्त्यांवर उतरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर आज सकाळपासून त्यांनी रस्ता आडवून धरला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजेच एमपीएससी मार्फत 25 ऑगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये कृषि विभागातील 258 पदांचा समावेश करण्यासाठी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. याच मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी पुण्यात मंगळवारी रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. बुधवारी रात्रभर हे आंदोलन सुरू होते. याच पाश्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीमध्ये एमपीएससी कृषि आणि आयबीपीएस विषयावर चर्चा झाली.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व भाजपा आमदार अभिमन्यु पवार बैठकीस उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने लोकसेवा आयोगाला कृषिच्या 258 पदांचा समावेश करावा अशी अधिकृतपणे विनंती केली आहे. तसेच आयबीपीएस परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी असल्याने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली. कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.
MPSC Students Protest Pune: पोलिस आणि आंदोलकांची बाचाबाची!
आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थी आंदोलक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. आंदोलक विद्यार्थ्यानी मोठी गर्दी केल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आंदोलक विद्यार्थी सहकार्य करत नसल्याने पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जतही घातली. दरम्यान, MPSC कृषि व IBPS विषयात आताच बैठक झाली. मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या बैठकीस उपस्थित होते.
तसेच IBPS परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी असल्याने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. लवकरच निर्णय अपेक्षित आहे. यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोगाची बैठक पार पडली.
MPSC च्या भोंगळ कारभाराचे कायमचे रडगाणे
आधीच दोन वेळा एमपीएससीने राज्यसेवा परीक्षा पुसहे ढकलली आहे. आता तिसऱ्यांदा परीक्षेची तारीख जाहीर करताना त्या दिवशी इतर कोणत्या परीक्षा नियोजित आहेत की नाही हे पाहण्याची तसदीही घेतल्याचे दियास्त नाही. या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या अनेक संघटनांनी आवाज उठवला, अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मिडियावरून प्रश्न मांडला. पण एमपीएससी असो वा राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे ढुंकुनही पाहायला तयार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
MPSC Students Protest Pune: भाजप नेते अभिमन्यु पवार यांची प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. एमपीएससीने जी तारीख काढली त्या दिवशी दुसरी परीक्षा आहे का पहायला हवं होतं. पण, विद्यार्थी करत असलेली मागणी रास्त आहे. मात्र, यामध्ये राजकारण होताना दिसत आहे. याआधी देखील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढे ढकलेली आहे. असं त्यांनी म्हंटलं आहे.
आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी अनेकदा आंदोलने करतात. आयोगतील लोकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे, राज्य आयोगाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. केंद्राच्या आणि राज्याच्या परीक्षा एकाच वेळी होतात. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं धंगेकरांनी म्हंटलं आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!