Mirzapur Season 3 Bonas Episode
Mirzapur Season 3 Bonas Episode: मिर्जापुर सीझन 3 मागच्याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला, पण हा प्रेक्षकांना आवडलेला नाही. कारण ज्या मुन्ना त्रिपाठी ने पाठीमागचे सीझन 2 गाजवले होते. त्याचा अंत हा सीझन 2 मध्ये गुड्डू भैय्या यांनी त्याच्या भावाचा बदला घेताना मुन्ना याला संपवले होते. अनेकांनी रिलीजच्या दिवशी मिर्जापुर सीझन 3 ट्रोल करण्यात सुरवात केली. खरंतर बुद्धिबळाचा खेळ, शहकाटशाह यांचं राजकारण आणि गुड्डू तसंच शरद यांच्यातला संघर्ष पाहण्यास मजा आली. हा सीझन खूप डोकं लावून बनवण्यात आला आहे. शेवटच्या 20 मिनिटांतला ट्विस्टही आवडला. तरीही मुन्ना नसल्याने सीझन ‘कुछ जमा नही’ ‘असं अनेकांना वाटलं. मात्र हाच मुन्ना त्रिपाठी कमबॅक करू शकतो अशी चिन्ह आहेत. कारण आहे मिर्जापुरच्या बोनस एपिसोडचा प्रोमो.
बुद्धिबळाचा खेळ कीती रंजक असतो हे आपल्याला माहीत आहेच. उंट, हत्ती, घोडे, वजीर, राजा प्यादी सगळ्यांच्याच आपल्या आपल्या चाली असतात. राजा आणि वजीर हे दोघ सोडले तर इतर कुणाच्याही बळी जाण्याला तितकंस महत्व राहत नाही. तरीही रंगतदार होतो. मिर्जापुर चा सीझन 3 पाहताना हा बुद्धिबळाचा रंजक खेळत आठवत राहतो. शह-काटशाह आणि शेवटी कमालीचा ट्विस्ट या तंत्राने मिर्जापुर रंगवलं आहे.
त्यामुळेच मिर्जापुरही प्रेक्षक म्हणून पकड पहिल्या भागापासूनच घेत. सुरुवात ते शेवट आणि दिलेली ट्रीटमेंट यांचा परिणाम मनात रुंजी घालत राहतो, चांगली कलाकृती पाहिल्याचं समाधान देतो यात शंका नाही. या सीझनला पाच पैकी साडेचार स्टार!
Mirzapur Season 3 Bonas Episode: मुन्ना त्रिपाठीचं काय झालं आहे?
Mirzapur चा सीझन 2 संपतानाच गुड्डू पंडितने मुन्ना त्रिपाठीला थार केलं आहे. गोलू आणि गुड्डू मुन्ना जिथे पोहचतात. त्यानंतर कालीन भैय्या वरही गोळ्या झाडतात. मात्र कालीन भैय्या शरद तिथून कसाबसा घेऊन निसटतो. आता तिसऱ्या सीझनमध्ये मुन्नाच्या मृत देहावर माधुरी अंत्य संस्कार करताना दाखवली आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. खरंतर दिव्येदु शर्मा हा मुन्ना त्रिपाठी हे पात्र जगला आहे. कारण दुसऱ्या कुणाला अशी भूमिका करता आली नसती. प्रसंगी विनोदी, प्रचंड क्रूर, प्रचंड क्रूर, प्रचंड हपापलेला असा मुन्ना त्रिपाठी दिव्येदुने लीलया रंगवला आहे. तिसऱ्या सीझनमध्ये त्याची झलकही नाही. मात्र नव्या प्रोमोने प्रेक्षकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
मिर्जापुरमध्ये कलाकारांची फौज
मिर्जापुरमध्ये पंकज त्रिपाठी (कालीन भैय्या), आली फैजल (गुड्डू पंडित), श्वेता त्रिपाठी (गोलू), रसिका दुग्गल (बिना त्रिपाठी), विजय वर्मा (भरत त्यागी), ईशा तलवार (माधुरी यादव) अशी कलाकारांची फौज आहे. सीझन थ्री मध्ये रक्तपात, शिवीगाळ हे सगळं तर आहेच. शिवाय बुद्धिबळातील डावाप्रमाणे शह आणि काटशह यांची फोडणीही दिली आहे. रंगतदार आणि तितकाच मसालेदार असा हा सीझन झाला आहे. तरीही अनेक प्रेक्षकांना हा आवडला नाही कारण यात मुन्ना त्रिपाठी नाही.
Mirzapur Season 3 Bonas Episode: काय आहे प्रोमोमध्ये?
बोनस एपिसोडच्या प्रोमोत गुड्डू अर्थात अली फजल खास त्यांच्या संवाद शैलीत सांगतो आत्ता प्राइम व्हिडिओजच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तिथून डिलिट केलेल्या सिनचा गुंता सोडवून आलो आहे. “नजर रखना बोनस एपिसोडपर, देखोगे तो भौकाल मच जाएगा और एक बहुतही चर्चित लौंडाभी है, हम ही उसे मौत के घाट उतारे थे, अर्थात डिलिट मारे थे, बहुत जलवा है साले का, वापस आना चाह रहा ही, देखीए मिर्जापुर 3 का बोनस एपिसोड आ रहा है इज महीने,” असं गुड्डू त्याच्या खास अंदाजात सांगतो.
गुड्डू आणि गोलूने या सीझन मध्ये मुन्नाला संपवलं आहे. आता तो परत येणार असेल तर तिसऱ्या सीझनच्या बोनस एपिसोडमध्ये काय असणार? हा एपिसोड कीती वेळाचा असणार? मुन्नाचं कमबॅक होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अर्थात या प्रश्नाची उत्तर सीझन 3 चा नवा एपिसोड आल्यावर कळू शकणार आहेत.
Mirzapur Season 3 Bonas Episode: उत्तम संवाद आणि जबरदस्त दिग्दर्शन
दिग्दर्शनाच्या बाबतीतही मिर्जापुर 3 सरस आहेच. गुरुमित सिंग या दिग्दर्शकानेच या सिरिजचे आधीचे दोन भाग दिग्दर्शित केले आहेत. तसंच इनसाइड एज ही सिरिजही त्याची आहे. मात्र गुरुमितने या सिरिजला दिलेला देशी तडका अगदी परफेक्ट बसला आहे. पहिल्या सीझनपेक्षा दूसरा किंवा तिसरा सीझन काही फार ग्रेट नसतो असं साधारण मानलं जातं. मात्र मिर्जापुर 3 हा सीझन पहिल्या दोन पेक्षा सरस आहे. याचं श्रेय अर्थातच गुरुमितला आणि सिरिजच्या लेखकांना जातं. मिर्जापुर में पावर हमेशा गद्दी की रही है और मुकाबला दावेदारोका , खेल आजभी वही है बस मोहरे बदल गये है. हे शरदच्या तोंडी असणार वाक्य किंवा व्हायलन्स हमार यूएसपी है, हे गुड्डूच्या तोंडी असणारं वाक्य स्वभाव दाखवतात आता अजून पुढे काय घडणार? हे पाहण्यास भाग पाडतात.
Mirzapur Season 3 Bonas Episode: आली फजल आणि पंकज त्रिपाठीचं खास कौतुक
अली फजल, पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, अंजुम शर्मा, इशा तलवार रसिका दुग्गल या सगळ्यांनीच आपल्या आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. मंत्रर भाव खाऊन गेले आहेत दोन कलाकार. एक पंकज त्रिपाठी आणि दूसरा गुड्डू. पंकज त्रिपाठीची भूमिका पाहून सुरुवातीला प्रेक्षक म्हणून आपल्याला असं वाटतं की. याने ही भूमिका का स्वीकारली असावी? पण नंतर जो ट्विस्ट आहे. त्यावरून कळतं की पंकज त्रिपाठीसारखा हरहुन्नरी कलाकार भूमिका निवडताना चूक करणार नाही. तेवढाच गुड्डूच्या भूमिकेशी अली फजल समरस झाला आहे. एका प्रसंगात तो एक हत्या करतो, त्यावेळी गोलू त्याला विचारते अरे असं का वागलस?
तेव्हा तो उत्तर देतो, ‘इसे कहते है आपदा को अवसरमें बदलना’ त्यावरून गुड्डू पंडित काय काय करू शकतो ते उलगडत जातं. या सीझन च्या एका प्रसंगाचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो, तो म्हणजे गुड्डू पंडित शहरातला कालीन भैय्याचा पुतळा फोडून टाकतो तो प्रसंग. या प्रसंगाला दिग्दर्शकाने एक दूसरा प्रसंगही चपखलपणे जोडला आहे त्यामुळे या प्रसंगाची तीव्रता वाढली आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!