MHADA Lottery 2024
MHADA Lottery 2024: मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. मुंबईत हक्काचं घर हे स्वप्न पाहणारे अनेकजण आहेत. पण, या स्वप्नांची पूर्तता करण्याची संधी मात्र या अनेकांमधील काहींनाच मिळते. अशीच या मायानगरीत घर खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी आता या इच्छुक मंडळींसाठी चालून आली असून, यासाठी मोठी मदत करणार आहे ते म्हणजे म्हाडा. कारण, म्हाडानं आगामी सोडत जाहीर केली असून, त्यासाठी महत्वाच्या तारखाही आता समोर आल्या आहेत. म्हाडाच्या विविध प्रकल्पातुन आता विविध उत्पन्न गटातील इच्छुकांसाठी 2030 घरांची उपलब्धता या सोडतीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. या लॉटरीची अधिकृत जाहिरात 8 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात दिली जाणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळांकडून विविध उत्पन्न गटातील 2023 घरांच्या विक्रीसाठी ही लॉटरि जाहीर करण्यात आली असून यात मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कन्नमवार नगर विक्रोळी, शिवधाम कॉमप्लेक्स मालाड या गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. या लॉटरीत सहभागी होण्याची इच्छा असलेले नागरिक शुक्रवार 9 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रिया करू शकणार आहेत. शुक्रवारी 9 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रिया करू शकणार आहेत. शुक्रवारी दुपारी 12 वाजेपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ‘म्हाडा’ चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते ऑनलाइन समारंभद्वारे सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
अर्ज भरणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 13 सप्टेंबर 2024 रोजी ही सोडत (विजेत्यांची नावं) जाहीर केली जाणार आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास MHADA Lottery 2024 जाहीर होणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँन्ड्रॉईड (Android) किंवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवरुण अनुक्रमे गुगल ड्राईव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नवे मोबाइल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच अर्जदारच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाइल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. या सोडतीमद्धे समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प गटासाठी रुपये सहा लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये नऊ लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे.
MHADA Lottery 2024: आवश्यक कागदपत्रे
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- रद्द केलेला चेक
- चालक परवाना
- पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
- जन्म प्रमाणपत्र
- अर्जदाराचे संपर्क तपशील.
MHADA Lottery 2024: अर्ज कसा भरायचा?
म्हाडा लॉटरी 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. गृहखरेदीदार म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वर लॉटरी संबंधित सर्व माहिती पाहू शकतात.
- म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वर जा.
- अर्जदाराचं नाव, पासवर्ड तयार करून स्वत:ची नोंदणी केली.
- उपलब्ध पर्यायांमधून इच्छित लॉटरी आणि योजना निवडा.
- आवश्यक लॉटरी नोंदणी शुल्क ऑनलाइन भरा.
- खरेदीदाराने हे लक्षात घ्यावे कि, फीची रक्कम तुमच्या उत्पन्नाच्या श्रेणीवर आधारित आहे.
- अर्जदारांना नोंदणी करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी म्हाडाने एक मोबाइल ऑप्लीकेशनही विकसित केले आहे.
- अर्ज शुल्क 500/- +जीएसटी @ 18%-90/= एकूण 590/- अर्ज शुल्क विना परतावा
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख ही 9 ऑगस्ट 2024 पासून ते 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाइन अनामत रक्कम स्वीकारण्याची तारीख 4 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत असणार आहे.
म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी वरती दिलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन तिथं अर्ज नोंदणी करावी. यानंतर अनामत रक्कम जमा करावी. संकेतस्थळावरच अर्जदारांना मार्गदर्शकिय सूचना देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हाडानं इच्छुकांना सतर्क करत कोणीही सल्लागार, एजंट अथवा प्रतिनिधि नेमला नसल्याचं सांगत अर्जदारांनी फसव्या प्रलोभनांपासून दूर राहावं असं आवाहन आलं आहे.
MHADA Lottery 2024: उत्पन्न मर्यादा आणि घरांची संख्या
गट | उत्पन्न मर्यादा | घरांची संख्या |
---|---|---|
अत्यल्प गट | 6 लाख रुपये | 359 |
अल्प गट | 9 लाख रुपये | 627 |
मध्यम गट | 12 लाख रुपये | 768 |
उच्च गट | 12 लाखाहून अधिक (या गटाला कमाल मर्यादा नाही) | 276 |
अल्प उत्पन्न गटासाठी 9 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. तर मध्यम उत्पन्न गटासाठी 12 लाख रुपये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा असेल. याशिवाय उच्च उत्पन्न गटात 12 रुपयांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या समावेश करण्यात आला असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. परंतु हे लक्षात घ्या की अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ति अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ति अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. तसेच मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ति मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतील. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ति केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
मुंबई मंडळाच्या सन 2024 च्या सोडतील अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS)359 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) 627 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) 768 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) 276 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतील म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 सदनिका, विकास ब्=नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) आणि 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातुन विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त 370 सदनिका (नवीन व मागील सोडतील सदनिका) आणि मागील सोडतीतील 333 सदनिकांचा समावेश आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!