म्हाडा उपाध्यक्षकांचं आश्वासन; घरांच्या किंमती कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार

MHADA House Price 2024

MHADA House Price 2024: सर्वसामान्यांना परवडणारी घरं देणाऱ्या म्हाडाची घरं आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेली असल्याचं चित आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमती आता सर्रासपणे ४० ते ५० लाखांच्या वरती असल्याचं नुकत्याच जाहीर झालेल्या जाहिरातीवरून दिसून आलं. पण दर्जेदार घरांची निर्मिती आणि परवडणारे दर यांची सांगड घालत घरांच्या किंमती कमी करण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलं. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं.

म्हाडाकडून ॲन्टॉप हिल, विक्रोळी कन्नमवार नगर, गोरेगाव, वरळी या मुंबईतिल काही मोक्याच्या ठिकाणी असणारी घरांसाठीची सोडत काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आणि इच्छुकांनी या सोडतीसाठी अर्ज करत महडच्या या लॉटरीला प्रतिसाद देण्यात सुरुवात केली. या सोडत आणि अर्ज भरणा प्रकियेमध्ये काही इच्छुकांनी मात्र म्हाडाच्या घरांच्या किंमती (MHADA House Price 2024) अधिक असल्याचं म्हणत काहीसा नाराजीचा सुर आवळला. येत्या काळात म्हाडा हीच नाराजी दूर करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होत आहे.

MHADA House Price 2024
MHADA House Price 2024

वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बदलत्या काळात दर्जेदार घरांची निर्मिती आणि परवडणारे दर यांची सांगड घालणे याचे कौशल्ये म्हाडाकडे आहे. म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेली असल्याचे बोलले जात आहेत. यावर घरांच्या संजीव जयस्वाल यांनी दिलं.

MHADA House Price 2024: म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार

मुख्य शहरांकडे अनेकांचाच कल, तिथं मिळणाऱ्या संधी या आणि अशा अनेक कारणांमुळे सध्या घरांची मागणीही सातत्याने वाढताना दिसत आहे. बदलत्या काळाची हीच मागणी घेत दर्जेदार पण परवडणाऱ्या घरांची करण्यासाठी म्हाडा धोरणात्मक निर्णय घेणार आहे. खुद्द म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनीच असं आश्वासन दिल्यामुळे आता पुन्हा एकदा Mhada Lottery कडे सर्वांचे लक्ष वळलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आयोजित ध्वजारोहण माजी सैनिक या प्रवर्गातून सद्यस्थितीत म्हाडामध्ये सेवेत असणाऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जयस्वाल यांनी ही महत्वाची माहिती दिली. म्हाडा लोकाभिमुख कार्यालय असून, इथं नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी संवेदनशील असणं महत्वाचं असल्याचं म्हणत त्यांनी आग्रही सुर आळवला.

MHADA House Price 2024: सध्याच्या जाहिरातीनुसार म्हाडाच्या घरांच्या किंमती

ठिकाण उत्पन्न गट घरांच्या किंमती
अँटॉप हिल अत्यल्प ४१ लाख ५१ हजार
वरळी अल्प २ कोटी ६२ लाख
विक्रोळी अल्प ६७ लाख १३ हजार
मालाड अल्प ७० लाख ८७ हजार
गोरेगाव मध्यम १ कोटी ११ लाख ९४ हजार
पवई मध्यम गट १ कोटी २० लाख 1३ हजार
पवई उच्च १ कोटी ७८ लाख ७१ हजार
अंधेरी उच्च ४ कोटी ८७ लाख
ताडदेव उच्च ७ कोटी ५२ लाख ६१ हजार
MHADA House Price 2024

दर्जेदार घरांची निर्मिती आणि परवडणारे दर यांनी सांगड

संजीव जयस्वाल म्हणाले की, लोकशाही दिनाचे आयोजन खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल जेव्हा नागरिकांच्या तक्रारी संपुष्टात येतील आणि हे उदिष्ट साध्य करण्याकरिता म्हाडा परिवारातील प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले योदण दिले पाहिजे. तसेच म्हाडा ही गृहनिर्मिती क्षेत्रात देशातील अग्रेसर संस्था ठरते. नजीकच्या भविष्यात म्हाडाच्या कामाची कीर्ती आंतराष्ट्रीरीय स्तरावर देखील घेतली जाईल. वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बदलत्या काळात दर्जेदार घराची निर्मिती व परवडणारे दर यांची सांगड घालणे यांचे कौशल्य म्हाडाकडे आहे.

MHADA House Price 2024: म्हाडाकडून अटी शिथिल करण्याच्या हालचाली

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरत असताना अर्जदारांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. अर्जदारांच्या डिजी लॉकरच्या कटकटीतून सुटका म्हाडाच्या घरांसाठी या माध्यमातून कागदपत्र करण्याची आत शिथिल करून जुन्या पद्धतींच कागदपत्र आणि इतर तपशील अपलोड करण्याची पद्धत सुरू करण्याच्या म्हाडाकडून सुरू केल्या गेल्याचं कळत आहे. म्हाडाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या सोडतीमध्ये घरांच्या किमती पाहूनच अर्जदारांना घाम फुटला. ज्यामुळे आता घरांच्या किंमती नेमक्या किती प्रमाणात कमी होणार यावर अनेकांचच लक्ष राहील. म्हाडाच्या सध्या सुरू असणाऱ्या सोडतीमध्ये ५५० चौरस फुटांच्या फ्लॅटची किंमत २ कोटी ६२ लाख रुपये आहे.

घर मिळाल्यास सेवाशुल्क आणि मालमत्ता करही भरणं अपेक्षित असल्यामुळे या किंमतीत आणखी भर पडेल. त्यामुळे नऊ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हे घरं कसं परवडणार? हाच प्रश्न आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमतीमुळं बँकांकडून गृहकर्ज घेतानासुद्धा विजेत्यांना घाम फुटणार आहे. तेव्हा आता म्हाडाच्या घरांच्या नव्या किंमती कशा असतील हे पाहण महत्वाचं ठरेल.

MHADA House Price 2024: काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना संजीव जयस्वाल म्हणाले की, म्हाडा एक लोकाभिमुख कार्यालय आहे. त्यामुळे म्हाडा कार्यालयास भेट देणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक अधिकारी- कर्मचारी यांनी संवेदनशील असणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हाडातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिन कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक लोकांच्या तक्रारीचे स्वरूप लक्षात आले आहे. त्यादृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

MHADA House Price 2024: अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा, म्हाडाचं आवाहन

म्हाडातर्फे नुकतीच मुंबईतिल विविध गृहप्रकल्पातील २०३० सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेत सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आलं आहे.

अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाइल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. या सोडतीमद्धे समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प गटासाठी रुपये सहा लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये नऊ लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे.

म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी वरती दिलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन तिथं अर्ज नोंदणी करावी. यानंतर अनामत रक्कम जमा करावी. संकेतस्थळावरच अर्जदारांना मार्गदर्शकिय सूचना देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हाडानं इच्छुकांना सतर्क करत कोणीही सल्लागार, एजंट अथवा प्रतिनिधि नेमला नसल्याचं सांगत अर्जदारांनी फसव्या प्रलोभनांपासून दूर राहावं असं आवाहन आलं आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!