MG Windsor EV: ही कार एका चार्ज मध्ये 331 किलोमीटर जाते, आणि एवढ्या कमी किंमतीत

MG Windsor EV 2024

MG Windsor EV 2024: प्रसिद्ध वाहन कंपनी MG Motor ने भारतात आपली दमदार MG Windsor EV लॉन्च केली आहे. याची किंमत कंपनीने 9.99 लाख ठेवली आहे. ही एक्स शोरूम किंमत आहे. JSW भागीदारी कंपनीची कार पहिली कार आहे. या बरोबर यावर्षी भारतीय बाजारात अनेक नवीन कार लॉन्च होत आहे. कमी बजेटमध्ये प्रथम कुप आणि आता ते क्रॉस ओव्हर युटीलिटी व्हेईकल (CUV) नावाच्या एका नवीन सेगमेंट मध्ये प्रवेश करणार आहे. हे नवीन मॉडेल भारतात आज (11 सप्टेंबर 2024) लॉन्च होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात ही कार थेट Tata Curvv EV शी स्पर्धा करेल, जारी या कारमध्ये अनेक चांगल्या वैशिष्ट्यांचा समावेश असेल, परंतु यात 135 डिग्री रिक्लाइन सीट (एरो लाउंज सीटस) असतील.

नवीन एमजी विंडसरची वैशिष्ट्ये आणि त्यांची किंमत जाणून घेऊया. एमजी विंडसर टेस्टिंग दरम्यान अनेक वेळ दिसली. एमजीने अलीकडेच नवीन विंडसरची आल टेरेन टेस्टिंग केली आहे. खराब रोडवर या कारची चाचणी केली. भारतातील प्रत्येक ऋतु लक्षात घेऊन ही कार तयार करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की नवीन विंडसर कोणत्याही हवामानात चंगळ Performance देईल. कंपनीने अलीकडेच या ईव्हीच्या इंटीरियरचा प्रथमच टिझर रिलीज केला आहे. तुम्ही फोटो पाहताच समजू शकता की नवीन Windsor EV चे केबिन खूप सुंदर आणि प्रीमियर देखील आहे. ब्लॅक लेदर च्या सीटस सह 135 डिग्री रेक्लाइनिग रियर सीटस येथे देण्यात आल्या आहेत.

एमजीने या इलेक्ट्रिक कारच्या मागील सीटवर ॲडजस्टेबल हेदरेस्ट, 3 पॉइंट सीटबेल्ट, मागील एसी व्हेंटस आणि मागील डीफॉगर दिले आहेत. कारला ब्लॅक ब्रॉन्झ स्कीम केबिन आणि ॲम्बीयंट लाईटिंग देखील आहे. कार उत्पादक MG Motor आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार MG Windsor द्वारे हा सेगमेंट सुरू करणार आहे.

MG Windsor EV 2024

या नवीन कारची बुकिंग 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. तसेच याची डिलिव्हरी 13 ऑक्टोबर पासून सुरू होईल. ZS EV आणि Comet नंतर ही कंपनीची तिसरी इलेक्ट्रिक कार आहे. यांच्या फीचर्स बद्दल आशिक माहिती जाणून घेऊ.

MG Windsor EV 2024: सुंदर असे फीचर्स ने भरलेली केबिन

डॅशबोर्डवर नजर टाकल्यास, Windsor EV ला Windsor EV ला 15.6 इंचाची टचस्क्रीन, 8.8 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर्स डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जिंग, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल फ्रंट सीटस आणि इलेक्ट्रिक टेलगेट देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टी कोणातूनही कार अतिशय मजबूत बनवण्यात अली आहे. यात 6 एअरबॅग, ईसीएस, TRMS, इलेक्ट्रॉनिक्स पार्किंग ब्रेक, 360 डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स आहेत. प्रीमियर कार म्हणून, असा अंदाज आहे की ईव्हीला ऍडव्ह्यांस ड्रायव्हर असिस्टंट दिली आहे, या फीचर्ससह अनुकूल क्रूझ नियंत्रण आणि ऑटोमेटिक इमर्जसी ब्रेकिंग यांसारख्या फीचर्स कारमध्ये जोडले गेले आहे.

MG Windsor EV 2024: एका चार्ज मध्ये किती रेंज देते?

नवीन Windsor EV मध्ये 38 kWh LFP बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, या कारची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 331 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळेल. ही कार 136 hp पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करते. ग्राहकांना ड्रायव्हिंगसाठी यात इको+. इको, नॉर्मल आणि स्पॉर्ट मोड मिळणार. जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. MG ने खरेदी दारांसाठी खास ऑफर देखील आणली आहे. जाणोनि बॅटरीवर अनलिमिटेड किलोमीटर ची वॉरंटी देत आहे.

नवीन एमजी Windsor मध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहे. मात्र यातील 135 डिग्री रिक्लाइन सीटसची (एरोलाउंज सीटस) सध्या चर्चेचा विषय आहे. या कारच्या सीटस तुम्हाला सिनेमा हॉलमध्ये किंवा फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये देण्यात आल्या प्रमाणे आहे. इतर कोणत्याही कारमध्ये अशा प्रकारच्या सीटस देण्यात आलेल्या नाहीत. MG Windsor EV मध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, जे तुमच्या दैनदीन वापरासाठी उपयुक्त ठरतील. यामध्ये सेगमेंट मधील सर्वात मोठी 15.6 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली, जी सर्वात खास आहे. या डिस्प्लेमध्ये तुम्हाला मनोरंजन आणि गेमिंगचा आनंद घेता येईल. यातच MG ही एकमेव कार कंपनी आहे जी सर्वात मोठा डिस्प्ले देते. या कारमध्ये 18 इंची अलॉय व्हील्स दिसणार आहेत.

MG Windsor EV 2024: सेफ्टीच्या बाबतीत आहे बेस्ट कार

MG Windsor EV मध्ये 4 एअरबॅग, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360 डिग्री कॅमेरा आणि ADAS यासारख्या हाय टेक फीचर्स देण्यात आल्या आहेत. ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम अंतर्गत, ॲडॉप्टीव्ह क्रूझ कंट्रोल, लें डिपार्चर वॉर्निग आणि ऑटो नॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग यांसारखी फीचर्स कारमध्ये देण्यात आली आहेत. आगामी सुरक्षा नियमांनुसार, भारतीय मॉडेलला 4 एवजी 6 एअरबॅग मिळणार आहेत.

MG Windsor EV 2024

MG Windsor EV 2024: स्पेसिफिकेशन्स

1) अधिक स्पेस

नवीन एमजी विंडसरमध्ये 135 डिग्री रिक्लाइन सीटस (एरोलाउंज सीटस) असतील. याचा अर्थ असा की तुम्हाला प्रीमियर सिनेमा हॉलमध्ये किंवा फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये बसून जसा आनंद मिळतो तसाच आनंद तुम्हाला मिळेल. इतर कोणत्याही कारमध्ये अशा जागा अजून सापडलेल्या नाहीत. या कारमध्ये मागे बसलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

2) लक्झरी इंटीरियर

MG च्या नवीन Windsor EV चे इंटीरियर प्रीमियर तसेच आलीशान असेल. या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा, ड्रायव्हिंग मोडस, स्पोर्टी सीट यश अनेक चंगळे फीचर्स मिळू शकतात. भारतात ही कार Tata Curve EV शी स्पर्धा करेल व फीचर्सच्या बाबतीत ही कार टाटाला मागे सोडू शकते.

MG Windsor EV 2024
3) मोठा डिस्प्ले

नवीन MG Windsor मध्ये सर्वात मोठा डिस्प्ले उपलब्ध असेल. या कारमध्ये 15.6 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम असेल. कंपनी GRANDVIEW टच डिस्प्ले या नावाने त्याची जाहिरात करत आहे. सध्या एवढी मोठी यंत्रणा भारतात उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही कारमध्ये दिसत नाही. हे वैशिष्ट्ये देखील ग्राहकांना सर्वाधिक आकर्षित करते. याआधी, MG Hector मध्ये 14 इचाची इन्फोटेनमेंट सिस्टम देखील होती.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!