Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतील.
अजित पवारांनी २८ जुलै महाराष्ट्राचं अर्थसंकल्प सादर केला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या अर्थसंकल्पावर टिकून आहे. सर्वसामन्यासाठी हा अर्थसंकल्प काय घेऊन येणार आणि त्याचा आपल्याला कायफायदा होणार हे जाणून घेण्यासाठी लॉक उत्सुक आहेत. अजित पवारांनी महाराष्ट्र सरकारकडून अर्थसंकल्प सादर केला ज्यामध्ये महिलांसाठी अनेक चांगल्या आणि फायद्याच्या योजना जाहीर करण्यात आल्या.
ज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ ही योजना अनेक महिलांच्या कामाची आहे. या योजने अंतर्गत महिलांना १५०० रुपये महिना म्हणजे दीड हजार रुपये महिना मिळणार आहे. ज्यामुळे अनेकांना आनंद आहे. पण ही योजना नक्की कोणासाठी आहे आणि त्यासाठी आत काय असणार आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. ज्यामुळे महिलांना याचा लाभ घेण सोप होईल.
२१ ते ६० वयोगटातील पात्र महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ Majhi Ladki Bahin Yojanaया योजनेसाठी पात्र आहेत. प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये या योजने अंतर्गत दिले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारला ४६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केले. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
लाडकी बहणा योजना काय आहे?
महाराष्ट्रातल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ Majhi Ladki Bahin Yojana योजना ज्या योजनेवरून घेतली गेल्याचं बोललं जातंय. ती मध्य प्रदेशची ‘लाडली बहणा योजना’ काय आहे. तेही आपण पाहूया. मध्य प्रेदेशमद्धे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगली प्रसिद्धी मिळाली आहे.
शिवराजसिंह यांनी मध्यप्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली त्यात या योजनेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात. महिला मतदारांनी त्यांना भरभरून मत दिली होती. महाराष्ट्र सरकारनेही येणारी विधानसभा निवडणूक आणि नहिला मतदार डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवल्याचं बोललं जात आहे.
या योजनेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्षा वयोगटातील महिला पात्र असतील. राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलीय. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Majhi Ladki Bahin Yojana) योजनेत पाच महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. तसेच त्याबाबत जीआर देखील राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे. लाभार्थी महिलांना अर्ज करणे सोपे व्हावे. यासाठी राज्य सरकारने आधीच अनेक अटी शर्ती यांच्यामध्ये बदल केला आहे.
या योजनेच्या लाभासाठी खालील पात्रता हवी:
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला.
- किमान वयाची २१ वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्ष होईपर्यंत.
- सदर योजनेंतर्गत लॅब घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभारथ्यांचे बॅक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त नसावे.
- लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
कोण अपात्र असेल?
या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही, हेही सरकारने स्पष्टपणे नमूद केलंय. ते तुम्ही खालील चित्रातल्या मुद्यावरून समजून घेऊ शकता.
- ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम /मंडळ . भरात सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत. तथा स्वायनसववक कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहे.
- सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रु.१५०० पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक:
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला/ शाळेचा दाखला
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखचा उत्पन्नाचा दाखला/ पिवळे रेशनकार्ड किंवा केशरी रेशनकार्ड
- बॅक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड
- सदर योजनेच्या अटी-शर्ती पालन करण्याबाबत हमीपत्र
Majhi Ladki Bahin Yojana: योजना कधीपासून लागू?
महाराष्ट्र सरकारने मुली आणि महिलांसाठी ही योजना सुरू केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभेत म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण Majhi Ladki Bahin Yojana योजनेची घोषणा करत आहोत. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जातील. ही योजना येत्या जुलै २०२४ पासून लागू होईल.
योजनेत पाच महत्वाचे बदल
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पाच महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. तसेच त्याबाबत जीआर देखील राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे. लाभार्थी महिलांना अर्ज करणे सोपे व्हावे. यासाठी राज्य सरकारने आधीच अनेक अटी शर्ती यांच्यामध्ये बदल केला आहे. केलेले बदल पुढील प्रमाणे:
- पहिला बदल हा रेशनकार्ड संदर्भातील आहे. नवविवाहित महिलेचे रेशन कार्डवर तात्काळ नव लागत नाही. त्यामुळे अशा महिलांना सध्या अर्ज करण्यासाठी अडचण होत आहे. त्यामुळे आता नवविवाहित महिलांचे विवाह नोंदणीपत्र किंवा पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
- ज्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास करणाऱ्या पुरुषाशी विवाह केला आहे. किंवा ज्या महिलांचा परराज्यात जन्म झाला आहे. अशा महिलांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच या शिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षा पूर्वीचे रेशन कार्ड आणि मतदान कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे.
- लाभार्थी महिलांचे इतर बँकांप्रमाणे पोस्ट बँक खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहे.
- ऑफलाइन अर्जावर असणाऱ्या लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
- बालवाडी सेविका, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सांगण्यात आले आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!