Mahindra XEV 9e and BE 6e Launch
Mahindra XEV 9e and BE 6e Launch: जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. तसेच भारतात सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्यासाठी कार कंपन्याही नवीन नवीन इलेक्ट्रिक कारचे मॉडेल्स लॉन्च करत आहेत. तसेच सामान्य माणसाच्या बजेट आणि गरजा लक्षात घेऊन नवनवीन मॉडेल्स बाजारात येत आहेत. जे अत्यंत सुरक्षितता, उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि इंधन कार्यक्षमता प्रदान करते. ही कार ‘इन्ग्लो आर्किटेक्चर’ तयार केले आहे. हे अशा प्रकारे तयार केले आहे कि वाहन चालकांना सहज व आनंदायी अनुभव मिळावा, यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. महिंद्रा कंपनीचा हा उद्देश आहे की आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनाच्या माध्यमातून आकर्षक आणि उत्कृष्ट अनुभव मिळवा.
देशामधील प्रसिद्ध अशी आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ने आज आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक कार XEV 9e आणि BE 6e लॉन्च केल्या आहेत.
‘XEV 9e’ ही कार एक इलेक्ट्रिक लक्झरी प्रमाणे आपली परिभाषा मांडते. ही इलेक्ट्रिक SUV ही विविध लक्झरी कार प्रमाणे स्मार्ट ड्रायव्हिंग सुविधांपासून ते आकर्षक डिझाइन पर्यंत या मॉडेलमध्ये विविध अशा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ह्या इलेक्ट्रिक कार मध्ये हाय फीचर्सचा भर असून, भारतीय ग्राहकांना एक लक्झरी ड्रायव्हिंगचा अनुभव देण्यासाठी महिंद्राचा हेतु आहे.
तर ‘BE 6e’ हा कार एक दमदार आणि ॲथेलेटीक SUV चे प्रतिनिधित्व करते. हा मॉडेल खास ग्राहकांना वेगवान आणि उत्कृष्ट असा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. स्पोटी लुक, लेटेस्ट तंत्रज्ञान आणि मजबुतीच्या दृष्टीने ‘BE 6e’ला बाजारात एक उत्तम असे स्थान मिळेल. महिंद्राने ‘BE 6e’ हे मॉडेल च्या माध्यमातून ग्राहकांना एक उत्तम दर्जाचा पर्याय दिला आहे, ज्यात वेग आणि स्पोटी लुक त्याबरोबर उच्च दर्जाची कार्यक्षमता हे मिळू शकेल.
महिंद्राचे दोन्ही मॉडेल्स (Mahindra XEV 9e and BE 6e Launch) हे जागतिक स्तरावर बाजारातील सर्व स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. भारतीय बजारात एक सुंदर अशी SUV म्हणून वाहनांची वाट पहिली जात आहे. या सह आता इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये ह्या कार थेट स्पर्धा टाटा मोटर्सशी होणार आहे. कारण सध्या इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये दबदबा आहे.
ह्या दोन्ही कार ह्या 3 व्हेरीएंटमध्ये उपलब्ध आहेत. यातील पहिल्या व्हेरीएंट च्या किंमतिचा खुलासा करण्यात आला आहे. Mahindra XEV 9e ह्या मॉडेलची किमत 21 लाख 90 हजार आहे. तर Mahindra BE 6e ह्या मॉडेलची किंमत 18 लाख 90 हजार असेल.
Mahindra XEV 9e and BE 6e Launch: बॅटरी आणि चार्जिंग
Mahindra XEV 9e
ही कार महिंद्राच्या स्केलेबल आणि मॉड्यूलर बोर्न EV INDGO प्लॅटफॉर्मद्वारे आधारलेले आहे. ही एसयूव्ही 175kW DC फास्ट चार्जर चा वापर करून, आणि कंपनीच्या माहिती प्रमाणे कार ची बॅटरी ही फक्त 20 मिनिटांत 20 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत वाढवता येतात. XEV 9e मोठ्या 79kWh युनिटसह एका चार्जवर 656 KM चालते, तर युरोपियन WTLP वर महिंद्राच्या सांगण्यावरून SUV 533km जाते. खरं ते कंपनी म्हणते की त्यांच्या वास्तविक जगाच्या चाचण्यावर, XWV 9e ने 500 km पेक्षा जास्त अंतर दिले.
Mahindra BE 6e
Mahindra BE 6e च्या या मॉडेल मध्ये दोन बॅटरी मिळतात. 59kWh युनिट आणि 79kWh युनिट LFP च्या रसायनासह ऑफर केले जाईल. ह्या मध्ये BYD च्या ब्लेड सेल तंत्रज्ञानाचा वापर करते आणि मोटर, इन्व्हर्टर आणि ट्रान्समिशनने बनलेले कॉम्पॅक्ट थ्री-इन-वन पॉवरट्रेन म्हणतात. ह्या बतरीच्या पॅकमध्ये ARAI दावा केलेली श्रेणी 682 km किंवा WLTP श्रेणी 550 km आहे. महिंद्रा बॅटरी पॅकवर संपूर्ण आयुष्यभर वॉरंटी देखील देत आहे. कंपनी दावा करते की 175kWh DC फास्ट चार्जर वापरुन फक्त 20 मिनिटात बॅटरी 20 टक्के ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.
Mahindra XEV 9e and BE 6e Launch: इंटीरियर आणि वैशिष्ट्ये
ह्या दोन्ही कार ह्या डायव्हर केंद्रित केबिनसह येतात. कार निर्मात्ये असा दावा करत आहेत की या एसयूव्ही च्या केबिनसाठी रचना करण्यासाठी त्यांनी लढाऊ विमानांकडून प्रेरणा घेतली आहे. XEV 9e ह्या मॉडेल च्या केबिन मधील हायलाइट हा एक तिहेरी स्क्रीन सेटअप आहे. जो महिंद्राच्या Adrenox सॉफ्टवेअरद्वारे समर्पित तीन 12.3 इंच डिस्प्ले एकत्र करतो. तर BE 6e साठी स्क्रीनची संख्या दोन आहे आणि दोन्ही समान आकाराचे आहेत. XEV 9e ला वायरलेस स्मार्टफोन चार्जर पॅनोरॅमीक सनरूप आणि ADAS सूट मिळतो. Mahindra BE 6e ह्या मॉडेलला एक मॉडेन लोगो आणि मोठा सनरूप मिळतो. SUV मध्ये ADAS सूट आणि 360 डिग्री कॅमेरा सारखी वेशिष्ट्ये देखील आहेत. ह्या कार मध्ये 16 स्पीकर हरमन कार्डन् ऑडियो सिस्टम हे या SUV च्या केबिनमधील आणखी एक प्रमुख वेशिष्ट्ये आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!