Maharashtra vidhansabha Election 2024
Maharashtra vidhansabha Election 2024: भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. भाजपची केंद्रीय निवड समितीची बैठक जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडली होती. या पार पडलेल्या बैठकीच्या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश होता. दरम्यान आज भाजप उमेदवार यादी जाहीर करत मैदानात उतरली आहे.
रावसाहेब दानवेंच्या मुलाला तर अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी
गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकुण 99 जागांसाठी (Maharashtra vidhansabha Election 2024) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नाव आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना देखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना देखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.
Maharashtra vidhansabha Election 2024: भाजपची पहिली उमेदवार यादी
मतदार संघ | उमेदवार |
---|---|
1) नागपूर पश्चिम | देवेंद्र फडणवीस |
2) कामठी | चंद्रशेखर बावनकुळे |
3) शहादा | राजेश पाडवी |
4) नंदुरबार | विजायकुमार गावीत |
5) धुळे शहर | अनुप अग्रवाल |
6) सिंदखेडा | जयकुमार रावल |
7) शिरपूर | काशीराम पावरा |
8) रावेल | अमोल जावले |
9) भुसावळ | संजय सावकारे |
10) जळगाव शहर | सुरेश भोळे |
11) चाळीसगाव | मंगेश चव्हाण |
12) जामनेर | गिरीश महाजन |
13) चिखली | श्वेता महाले |
14) खामगाव | आकाश फुडकर |
15) जळगाव (जामोद) | संजय कुटे |
16) अकोला पूर्व | रणधीर सावरकर |
17) धामगाव रेल्वे | प्रताप अडसद |
18) अचलपुर | प्रवीण तायडे |
19) देवली | राजेश बकाने |
20) हिंगनघाट | समीर कुणावार |
21) वर्धा | पंकज भोयर |
22) हिंगना | समीर मेघे |
23) नागपूर दक्षिण | मोहन माते |
24) नागपूर पूर्व | कृष्ण खोपडे |
25) तिरोरा | विजय रहांगडाले |
26) गोंदिया | विनोद अग्रवाल |
27) अमगांव | संजय पुरम |
28) आर्मोली | कृष्णा गजबे |
29) बल्लारपुर | सुधीर मूनगंटीवार |
30) चिमुर | बंटी भांगडिया |
31) वाणी | संजीवरेड्डी बोडकुरवार |
32) रालेगाव | अशोक उडके |
33) यवतमाळ | मदन येरवर |
34) किनवट | भीमराव केरम |
35) भोकर | श्रीजया चव्हाण |
36) नायगाव | राजेश पवार |
37) मुखेड | तुषार राठोड |
38) हिंगोली | तानाजी मुटकुले |
39) जिंतूर | मेघना बोर्डीकर |
40) परतूर | बबनराव लोणीकर |
41) बदनापूर | नारायण कुचे |
42) भोकरदन | संतोष दानवे |
43) फुलंब्री | अनुराधा चव्हाण |
44) सांभाजीनगर पूर्व | अतुल सावे |
45) गंगापूर | प्रशांत बंब |
46) बगलान | दिलीप बोरसे |
47) चंदवड | राहुल अहेर |
48) नाशिक पूर्व | राहूल ढीकाले |
49) नाशिक पश्चिम | सीमाताई हीरे |
50) नालासोपारा | राजन नाईक |
51) भिवंडी पश्चिम | महेश चौघुले |
52) मुरबाड | किसन कथोरे |
53) कल्याण पूर्व | सुलभा गायकवाड |
54) डोंबिवली | रवींद्र चव्हाण |
55) ठाणे | संजय केळकर |
56) ऐरोली | गणेश नाईक |
57) बेलापुर | मंदा म्हात्रे |
58) दहिसर | मनीषा चौधरी |
59) मुलुंड | मिहिर कोटेचा |
60) कांदिवली पूर्व | अतुल भातखलकर |
61) चारकोप | योगेश सागर |
62) मालाड पश्चिम | विनोद ठाकूर |
63) गोरेगाव | विद्या ठाकूर |
64) अंधेरी पश्चिम | अमित साटम |
65) विले पार्ले | पराग अलवणी |
66) घाटकोपर पश्चिम | राम कदम |
67) वांद्रे पश्चिम | आशीष शेलार |
68) सायन कोळीवाडा | तमिल सेल्वन |
69) वडाळा | कालिदास कोळंबकर |
70) मलबार हिल | मंगलप्रभात लोढा |
71) कुलाबा | राहुल नार्वेकर |
72) पनवेल | प्रशांत ठाकूर |
73) उरन | महेश बाल्दी |
74) दौंड | राहुल कुल |
75) चिंचवड | शंकर जगताप |
76) भोसरी | महेश लांडगे |
77) शिवाजीनगर | सिद्धार्थ शिरोले |
78) कोथरूड | चंद्रकांत पाटील |
79) पर्वती | माधुरी मिसाळ |
80) शिर्डी | राधाकृष्ण विखे पाटील |
81) शेवगाव | मोनिका राजले |
82) राहुरी | शिवाजीराव कर्डील |
83) श्रीगोंदा | प्रतिभा पाचपुते |
84) कर्जत जामखेड | राम शिंदे |
85) केज | नमिता मुंदडा |
86) निलंगा | संभाजी पाटील निलंगेकर |
87) औसा | अभिमन्यु पवार |
88) तुळजापूर | राणा जगजितसिंह पाटील |
89) सोलापूर शहर उत्तर | विजयकुमार देशमुख |
90) अक्कलकोट | सचिन कल्याणशेट्टी |
91) सोलापूर दक्षिण | सुभाष देशमुख |
92) मान | जायकुमार गोरे |
93) कराड दक्षिण | अतुल भोसले |
94) सातारा | शिवेंद्रराजे भोसले |
95) कणकवली | नीतेश राणे |
96) कोल्हापूर दक्षिण | अमल महाडीक |
97) इचलकरंजी | राहुल आवाडे |
98) मिरज | सुरेश खाडे |
99) सांगली | सुधीर गाडगीळ |
Maharashtra vidhansabha Election 2024: भाजपने खेचून घेतले शिवसेनेचे 5 मतदारसंघ
धुळ्यात 2019 ला शिवसेनेचे हिलाल माळी हे धुळे शहराचे उमेदवार होते. पण याच मतदारसंघातून भाजपाकडून यंदा अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अचलपूरमधून अतुल तायडेना भाजपने यंदा उमेदवारी दिलीये. याच मतदारसंघातून सुनीता फिसके या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. देवळी मतदारसंघातून भाजपाकडून राजेश बकानेना उमेदवारी देण्यात आली आहे. याच बकानेनी 2019 मध्ये शिवसेनेच्या समीर देशमुखांचा पराभव केला होता. भाजपचे राजन नाईक हे नालासोपाऱ्यातुन उमेदवार आहेत.
2019 मध्ये या मतदार संघातून शिवसेनेचे प्रदीप शर्मा उमेदवार होते. उरणमधून भाजपने महेश बालदिना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोईर हे 2019 ला उमेदवार होते. त्यामुळे या पाच मतदारसंघावर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे नालासोपऱ्यात कोणताही भाजपचा आमदार किंवा भाजपचा पाठिंबा असलेला अपक्ष आमदार निवडून आलेला नसताना या मतदारसंघात भाजपने (Maharashtra vidhansabha Election 2024) आपला उमेदवार दिला आहे. भाजपच्या या रणनीतीचा परिणाम भविष्यातल्या जागांवरही होणार असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये पालघर, बोईसर यांसारख्या जगांचा समावेश असल्याच्या चर्चा आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!