Maharashtra Vidhan Sabha Election Dates
Maharashtra Vidhan Sabha Election Dates: बहुप्रतीक्षित अशा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यात एका टप्यात निवडणूक पार पडणार आहे. मतदान 20 नोव्हेंबर 2024 ला राज्यात पर पडेल. तर 23 नोव्हेंबर 2024 ला मतमोजणी होईल. मुख्य निवडणुका आयुक्त राजीव कुमार यांनी तारखांची घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषेदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असली तरी मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य पक्ष हे काही मतदार संघातील (Maharashtra Vidhan Sabha Election Dates) मतांचे गणित बिघडवू शकतात. झारखंडमध्ये एका पेक्षा जास्त टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये शक्यतो एकच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तसेच केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याआधीच 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आणि निकाल पूर्ण होईल, असे सांगितले होते. त्यामुळे आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त निवडणुकीची घोषणा करणार आहेत. दरम्यान राज्यातील सर्वच पक्षांनी या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. राज्यात सर्व मोठे पक्ष या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षाप्रमाणेच महाराष्ट्रातील जनताही या निवडणुकीकडे बारीक लक्ष ठेवून आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्याच पाश्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच दोन्ही पक्षांकडून जागा वाटपासंदर्भातही लवकरच घोषणा केली जाणार आहे.
राज्याच्या 288 विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगणार आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीत कॉँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा समावेश आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Dates: निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडविस यांची सोशल मिडियावर पोस्ट चर्चेत
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी इंडिया आघाडीला 31 तर एनडीएला 17 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली. भाजपने 23 जागा गमावल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीनं महायुतीला चांगलीच टक्कर दिली होती. आता विधानसभेतही हा इम्पॅक्ट पहायला मिळणार कि लाडकी बहीण योजना वरचढ ठरणार यांची उत्सुकता आहे. विकास कामांचा धडाका की विरोधकांचे खंडेबोल जनता कुणाला कौल देणार यांचा फैसला मतदारराजा घेणार आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Dates: मतदारांसाठी या आहेत महत्वाच्या घोषणा
जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. सीनियर सिटीझन्स आणि दिव्यांग व्यक्तींना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करूनदेण्यात येणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग केलं जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर जास्त रंग असेल तर मतदारांच्या सुविधेसाठी खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. गुन्हेगारी पाश्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. पैसे, मद्य, ड्रग्स वाटपावर कडक नजर ठेवली जाणार आहे. मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या आत असावेत असं सूचना करण्यात आल्या आहेत.

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर
शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे, सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. या निवडणूक निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. ठाकरेंची साथ सोडून शिंदेंनी शिवसेना मिळवली, तर अजित पवारांनी राष्ट्रवादी आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांना जनता कीती साथ देते पाहावं लागेल. तर, दुसरीकडे शरद पवार आणि उंदहव ठाकरेची जादू लोकसभेप्रमाणे पुन्हा कमाल करणार का, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. सध्या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच पक्ष श्रेष्ठीकडे इच्छुकांनी रांग लागलेली पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी नेत्यांचं या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात असं सुरू आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Dates: महाराष्ट्रात कीती मतदार?
- महाराष्ट्रात एकुन 9.63 कोटी मतदार
- महिला मतदार – 4.66 कोटी
- पुरुष मतदार – 4.97 कोटी
- युवा मतदार – 1.85 कोटी
- नव मतदार – 20.93 लाख
निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू
त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषेदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करण्यासोबत आज पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचीही घोषणा केली. निवडणूक आयोगाला 26 नोव्हेंबर 2024 पूर्वी निवडणुका घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील जनता महयुटीला निवडेल की महाविकास आघाडीला याचा निकल लागेल.

Maharashtra Vidhan Sabha Election Dates: महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची पहिली निवडणूक होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं जात असून येत्या काही दिवसांत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!