Maharashtra Exit Polls 2024
Maharashtra Exit Polls 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या 288 विधानसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झालंय. यंदा राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत आहे. पण, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह बंडखोर आणि अपक्षही काही मतदारसंघात निर्णायक ठरु शकतात. विधानसभा निवडणुकीत यंदा राज्यात सरासरी 65 टक्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतांचा टक्का वाढल्याचं दिसतं. अखेरच्या काही तासांत मतदानाचे जोर पकडल्याचं चित्र राज्याच्या काही भागात पहायला मिळालं. त्यामुळे जादा झालेलं मतदान कोणाच्या परड्यात गेलं?आणि या निवडणुकीत कोणाला धक्का बसणार? ही 23 डिसेंबरला होणाऱ्या मतदानातच स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकांनंतर (Maharashtra Exit Polls 2024) सहा महिन्यांनी होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकांकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व एक्झिट पोलचे अपडेट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे राज्यात बहुमत मिळवण्यासाठी किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं आहे. ही बाब लक्षात घेणं आवश्यक आहे की भारतीय निवडणूक आयोग निवडणुकीपूर्वच सर्वेक्षण करत नाही. तसेच एक्झिट पोल देखील करत नाही.
एक्झिट पोल हे वेगवेगळ्या संस्थांनी केलेले सर्वेक्षण असतात. यातून कोणताही अंतिम निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.11 टक्के मतदान झालं आहे. संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर मतदान 68 टक्यांच्या घरात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कोणत्या जिल्ह्यात कीती टक्के मतदान झालं? जाणून घेऊया. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्यासा फारसं यश आलं नसल्याचं दिसलं.
Maharashtra Exit Polls 2024: या निवडणुकीत एक्झिट पोलसचा काय अंदाज आहे?
- मॅटराइज सर्व्हेनी सांगितले की भाजप आणि मित्रपक्षांना 150 – 170 जागा मिळतील. तर कॉँग्रेस आणि मित्रपक्ष (मविआ) ला 110 ते 130 जागा मिळू शकतात, इतरांना 8-10 जागा मिळतील.
- पीपल्स प्लसने महायुतीला 182 तर महाविकास (Maharashtra Exit Polls 2024) आघाडीला 97 जागा सांगितल्या आहेत. चाणक्य स्ट्रटेजीजने महायुतीला 152 ते 160 जागा सांगितल्या आहेत, तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा सांगितल्या आहेत. इतरांना 6 ते 8 जागा मिळतील असं त्यांनी सांगितले आहे.
- पी – मार्कने सांगितले आहे की महायुतीला 137 ते 157 इतक्या जागा मिळतील तर मविआ ला 126 ते 146 या इतक्या जागा मिळण्याचा अंदाज आहे.
- लोकशाही मराठी रुद्रच्या सर्व्हेनुसार महायुतीला 128 ते 142 तर महाविकास आघाडीला 125 ते 140 आणि इतरांना 18 – 23 जागा मिळतील असं म्हंटलं आहे.
- टाइम्स नाऊ जेविसीच्या सर्व्हेनुसार महायुतीला 150 ते 167 आणि महाविकास आघाडीला 107 – 125 आणि इतरांना 13 – 14 जागांचा अंदाज वर्तवला आहे.
- दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 125 ते 140 जागा मिळतील. महाविकास आघाडीला 135 ते 150 जागांवर विजय मिळेल. तर इतरांना 20 ते 25 जागांवर विजय मिळवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- पोल देरीच्या अंदाजानुसार महायुतीला 122 ते 186 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला 69 ते 121 जगांवर विजय मिळेल. त्या व्यतिरिक्त इतरांना 12 ते 29 जागा मिळवण्याचा अंदाज आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी
जिल्हे | टक्केवारी |
---|---|
1) अहमदनगर | 71.73 टक्के |
2) अकोला | 64.45 टक्के |
3) अमरावती | 65.57 टक्के |
4) छ. संभाजीनगर | 68.89 टक्के |
5) बीड | 67.79 टक्के |
6) भंडारा | 69.42 टक्के |
7) बुलढाणा | 70.32 टक्के |
8) चंद्रपूर | 71.27 टक्के |
9) धुळे | 64.70 टक्के |
10) गडचिरोली | 73.68 टक्के |
11) गोंदिया | 69.53 टक्के |
12) हिंगोली | 71.10 टक्के |
13) जळगाव | 64.42 टक्के |
14) जालना | 72.30 टक्के |
15) कोल्हापूर | 76.25 टक्के |
16) लातूर | 66.92 टक्के |
17) मुंबई शहर | 52.07 टक्के |
18) मुंबई उपनगर | 55.77 टक्के |
19) नागपूर | 60.49 टक्के |
20) नांदेड | 64.92 टक्के |
21) नंदुरबार | 69.15 टक्के |
22) नाशिक | 67.57 टक्के |
23) उस्मानाबाद | 64.27 टक्के |
24) पालघर | 65.95 टक्के |
25) परभणी | 70.38 टक्के |
26) पुणे | 61.05 टक्के |
27) रायगड | 67.23 टक्के |
28) रत्नागिरी | 64.55 टक्के |
29) सांगली | 71.89 टक्के |
30) सातारा | 71.71 टक्के |
31) सिंधुदुर्ग | 72 टक्के |
32) सोलापूर | 67.36 टक्के |
33) ठाणे | 56.05 टक्के |
34) वर्धा | 68.30 टक्के |
35) वाशिम | 66.77 टक्के |
36) यवतमाळ | 69.02 टक्के |
Maharashtra Exit Polls 2024: शहरी भागांत हवा तितका प्रतिसाद नाही
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमधील मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह पाहायला मिळाला. या शहरांमध्ये फक्त 50 ते 55 टक्के मतदान झालं. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्यासा फारसं यश आलं नसल्याचं दिसलं.
मागील विधानसभेला 61 टक्के मतदान
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 61 टक्के मतदान झालं होत. शहरी भागांच्या ग्रामीण भागात मतदारांचा आकडा जास्त होता. नाशिक जिल्हासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री 9 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं. त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी येण्यास विलंब लागला असला ट्री मिळालेल्या आकडेवारीप्रमाणे, मतदानाने 65 ची टक्केवारी गाठली होती. यात पुढे आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Exit Polls 2024: अखेरच्या टप्प्यात जोर
दुपारच्या सत्रानंतर मतदान काहीस वाढलेलं दिसलं. संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान सर्वाधिक मतदान झालं. अंतिम आकडेवारीनुसार, मुंबईत 56 टक्के मतदान झालं. यात सर्वाधिक 62 टक्के मतदान भांडुप मतदारसंघात झाले असून बोरिवली आणि मुलुंडमध्येही 61 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चंदिवलीमध्ये सर्वात कमी 48 टक्के मतदान झालं आहे. वडाळा मतदारसंघात सर्वाधिक 58 टक्के, तर कुलाब्यात सर्वात कमी 45 टक्के मतदान झालं.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!