महायुतीतुन कोण होणार महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री? जाणून घ्या

Maharashtra Election Result 2024

Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी पर पडल्या. आज 23 नोव्हेंबर 2024 निकाल जाहीर झाला आहे. या मध्ये महायुतीला सर्वात जास्त मताधिक्य मिळवून त्यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे. महायुतीला 225+ जागा मिळाल्या आहेत. भाजपने तब्बल 120 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत भाजप हा राज्यातील एक नंबर चा पक्ष बनला आहे. त्यामुळे सर्व भाजप कार्यकर्ते, नेत्यांनी आत्ताच भाजपचा मुख्यमंत्री होणार, त्यामुळे सर्वांनी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार हे अशा पद्धतीचे बॅनरही सर्वत्र झळकवायला सुरुवात केली आहे. आज आलेल्या निकालावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी हा 25 तारखेला होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार हे कोडे लवकरच उलगडेल.

Maharashtra Election Result 2024

मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर लवकरच कळेल. या प्रश्नावर उत्तर देताना सर्वांनी एकच सांगितले आहे की जसे आम्ही जागा वाटपासाठी एकत्र बसून निर्णय घेतला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आम्ही सर्व नेते मंडळी मिळून चर्चा करून नवीन मुख्यमंत्री निवडू असे सांगितले आहे. राज्यामधील विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे महायुती ही एक दिवस अगोदर नवीन सरकार स्थापन करणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम मायबाप जनतेचे आभार (Maharashtra Election Result 2024) मानले. त्यांनी त्यांचे अमूल्य मत हे त्यांना दिले. महायुतीला या निवडणुकीत बहुमत मिळेल, हे मी आधीपासून सांगत होतो. मी मतदारांचे पुन्हा अभिनंदन करतो. सर्व माझ्या लाडक्या बहीणींचे सुद्धा आभार मानतो. त्यासोबतच शेतकरी बांधव, जेष्ठ बांधव आणि लाडक्या भावांनी मतदान केलं. समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला भरभरून मतदान केले. आम्ही जे अडीच वर्ष काम केले, त्या कामाची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मतदारांनी दिली. त्यामुळेच महायुतीला असे भरभरून यश मिळाले आहे. असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Maharashtra Election Result 2024

त्या सोबत त्यांनी लाडक्या बहीणींनी, शेतकरी बांधव, जेष्ठ नागरिक, लाडके भाऊ आणि आम्ही जे अडीच वर्षात ज्या पद्धतीने काम केले आहे. त्या कामाची नोंद, त्या कामाची पोचपावती, त्या कामाचं मोजमाप म्हणून या जनतेने आम्हाला दिली आहे. मी माझ्या मतदारसंघातील जनतेचेही आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

प्रत्येकाने आपापल्या अंदाजात प्रत्येकाने आपले अंदाज व्यक्त केले. मात्र महाराष्ट्राच्या जनतेने ह्या अडीच वर्षात झालेल्या विकासाकडे पाहून जे यश प्राप्त करून दिलं आहे. त्यामुळे मी मनापासून सगळ्या महाराष्ट्रातील सर्व मायबाप जनतेचे मनापासून आभार मानतो. ज्या प्रकारे कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे असं समजून कामाला लागले. आमच्या सुरू केलेल्या योजनांची चेष्टा मस्करी करण्यात आली. राज्य कंगाल केलं वगैरे सांगण्यात आलं. हे सर्व झाल्या नंतर जेव्हा विरोधकांचे जाहिरनामे आल्यानंतर काय चाललं आहे ते आम्हाला समजलं. आम्हाला मात्र लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आले. त्यातूनच आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला.

आम्ही अर्थसंकल्प सादर केल्या नंतर केल्यानंतर विविध योजना राबवल्या त्यामधील लाडकी बहीण योजना गेमचेंजरच ठरली. त्यामुळे सर्व विरोधक हे उताने पडले. आता या मायबाप जनतेने आम्हाला निवडणून देऊन आमच्यावरची जबाबदारी ही वाढली आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं.

Maharashtra Election Result 2024

मी राजकारणात असल्या पासून इतकं प्रचंड बहुमत मी पाहिलेलं नाही. 222 आणि 225 असं महाराष्ट्रात मिळालेलं यश मी पाहिलेलं नाही असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे. आम्हाला समजतंय ते मिळालेलं यश पहिल्यांदाच आहे. त्या मुळे खूप काम करावं लागेल असं मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना फोन करून सांगितलं. आम्हाला त्यात कुठलीही अडचण नाही. त्याचप्रमाणे आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे. त्याचा आम्हाला कुप मोठा आधार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Election Result 2024: मुख्यमंत्री पदाचा निर्णय एकमताने होईल!

मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाची चर्चा आहे. पुढचा मुख्यमंत्री भाजप चा असेल, आणि ते देवेंद्र फडणवीस असतील असं भाजपाकडून सांगितलं जातं आहे, त्या वर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री असे काही आमच्यात बोलणे झालेले नाही. निकालाची संपूर्ण आकडेवारी आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्षांचे नेते मिळून एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ. ज्या पद्धतीने आम्ही एकमताने निवडणूक लढलो, तसेच आम्ही एकमताने पुढचा निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

भाजप मधून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी पाहण्याचा आवाज

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिममधून या विधानसभेतून विजयी झाले आहेत. त्यासोबतच भाजपला महाराष्ट्रात 130 जागांवर आघाडी मिळालेली आहे. तर महायुतीला सर्व 225 पेक्षा अधिक जागांवर (Maharashtra Election Result 2024) निवडणून आलेली आहे. त्यामुळे भाजप मधून फडणविसांना मुख्यमंत्रिपदी पाहण्याचा आवाज आहे. मतमोजणीत भाजपला आघाडी मिळू लागताच, भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेत्यांनी फडणविसांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची मागणी होऊ लागली.

देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाची महत्वाची वैशिष्ट्ये
  • लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर (Maharashtra Election Result 2024) ठरली, ती पण निवडणुकांच्या तोंडावर
  • कर्जामुळे नाराज असलेला शेतकरी, कर्जमाफीच्या आश्वासनावर शेतकरीसुद्धा महायुतीकडे वळाला.
  • ‘कटेंगे तो बटेंगे’ हा नारा पुसून ‘एक है तो सेफ है’ हा मतदारांपर्यंत पोहोचवला.
  • प्रचारात एकमेकांवर टीका करण्यापेक्षा विकासाचा मुद्दा पोहचवण्यावर भर
  • उमेदवारांच्या निवडीपासून त्याच्या विजयापर्यंत प्रत्येक पायरीचे नियोजन
  • देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्येक मतदारसंघातील मायक्रो प्लॅनिंग यशस्वी ठरले.
  • मराठा आरक्षणाचा मुद्दा हा देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रकारे हाताळला.
  • मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका न् करता जरांगे फॅक्टर निकाली काढला.
  • सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेमधील अपयशाचा डाग पुसून महाविकास आघाडीवर फेक नरेटीव्हचा ठपका ठेवला.
  • देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचं व्हीजन महायुती सरकारच्या काळात झालेल्या महाराष्ट्रात झालेले पायाभूत प्रकल्प, मुंबईत वाढलेलं मेट्रोचं जाळं, राज्यातील परकीय गुंतवणूक, मराठवाडा वॉटर ग्रिड प्रकल्प, वाढवण बंदरांमुळे होणारा राज्याला आणि देशाला फायदा हे सर्व मुद्दे फडणविसांनी भाषणातून सातत्याने मांडले. त्यांचे मुद्दे राज्यातील मतदारांना विशेषत शहरी मतदारांना भावल्याचं या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!