Maharashtra Cabinet Ministers List 2024
Maharashtra Cabinet Ministers List 2024: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालाच्या उलट निकल लागल्याचं पहायला मिळालं. महायुतीनं जोरदार कमबॅक करत अद्भुत असं यश मिळवलं. राज्यात महायुतीला 235 जागांचं यश पाहायला मिळालेलं असताना महाविकास आघाडी मात्र 49 जागांपर्यंतच मर्यादित राहिली. पण 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी 12 दिवसांनंतर म्हणजेच 5 डिसेंबरला झाला. यानंतर आज (15 डिसेंबर) मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होत आहे.
नागपूर येथील विधीमंडळात महायुती सरकारचा (Maharashtra Cabinet Ministers List 2024) शपथविधी सोहळा पार पडला आहे. एकूण 39 मंत्री आज शपथ घेत आहे. 39 पैकी 33 आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर 6 आमदारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मात्र या मंत्रिमंडळात विस्तारावर नजर टाकल्यास घराणेशाहीची छाप दिसून येते. विधानसभा निकालातही घराणेशाहीचा दबदबा दिसून आला होता.
Maharashtra Cabinet Ministers List 2024: महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी
मंत्र्यांची नावे | पक्ष | जबाबदारी / खातं |
---|---|---|
देवेंद्र फडणवीस | भाजपा | मुख्यमंत्री |
एकनाथ शिंदे | शिवसेना | उपमुख्यमंत्री |
अजित पवार | राष्ट्रवादी | उपमुख्यमंत्री |
1) चंद्रकांत पाटील | भाजपा | निर्णय प्रलंबित |
2) मंगलप्रभात लोढा | भाजपा | निर्णय प्रलंबित |
3) राधाकृष्ण विखे पाटील | भाजपा | निर्णय प्रलंबित |
4) पंकजा मुंडे | भाजपा | निर्णय प्रलंबित |
5) गिरीश महाजन | भाजपा | निर्णय प्रलंबित |
6) गणेश नाईक | भाजपा | निर्णय प्रलंबित |
7) चंद्रशेखर बावनकुळे | भाजपा | निर्णय प्रलंबित |
8) आशीष शेलार | भाजपा | निर्णय प्रलंबित |
9) अतुल सावे | भाजपा | निर्णय प्रलंबित |
10) संजय सावकारे | भाजपा | निर्णय प्रलंबित |
11) अशोक उईके | भाजपा | निर्णय प्रलंबित |
12) आकाश फुंडकर | भाजपा | निर्णय प्रलंबित |
13) माधुरी मिसाळ | भाजपा | निर्णय प्रलंबित |
14) जयकुमार गोरे | भाजपा | निर्णय प्रलंबित |
15) मेघना बोर्डीकर | भाजपा | निर्णय प्रलंबित |
16) पंकज भोयर | भाजपा | निर्णय प्रलंबित |
17) शिवेंद्रराजे भोसले | भाजपा | निर्णय प्रलंबित |
18) नितेश राणे | भाजपा | निर्णय प्रलंबित |
19) जयकुमार रावल | भाजपा | निर्णय प्रलंबित |
20) दादा भुसे | शिवसेना | निर्णय प्रलंबित |
21) गुलाबराव पाटील | शिवसेना | निर्णय प्रलंबित |
22) संजय राठोड | शिवसेना | निर्णय प्रलंबित |
23) उदय सामंत | शिवसेना | निर्णय प्रलंबित |
24) प्रताप सरनाईक | शिवसेना | निर्णय प्रलंबित |
25) योगेश कदम | शिवसेना | निर्णय प्रलंबित |
26) आशीष जैस्वाल | शिवसेना | निर्णय प्रलंबित |
27) भरत गोगावले | शिवसेना | निर्णय प्रलंबित |
28) प्रकाश आबिटकर | शिवसेना | निर्णय प्रलंबित |
29) संजय शिरसाठ | शिवसेना | निर्णय प्रलंबित |
30) शंभुराजे देसाई | शिवसेना | निर्णय प्रलंबित |
31) हसन मुश्रीफ | राष्ट्रवादी कॉंग्रेस | निर्णय प्रलंबित |
32) आदिती तटकरे | राष्ट्रवादी कॉंग्रेस | निर्णय प्रलंबित |
33) धनंजय मुंडे | राष्ट्रवादी कॉंग्रेस | निर्णय प्रलंबित |
34) दत्तमामा भरणे | राष्ट्रवादी कॉंग्रेस | निर्णय प्रलंबित |
35) बाबासाहेब पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस | निर्णय प्रलंबित |
36) नरहरी झिरवाळ | राष्ट्रवादी कॉंग्रेस | निर्णय प्रलंबित |
37) मकरंद पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस | निर्णय प्रलंबित |
38) इंद्रनील नाईक | राष्ट्रवादी कॉंग्रेस | निर्णय प्रलंबित |
39) माणिकराव कोकाटे | राष्ट्रवादी कॉंग्रेस | निर्णय प्रलंबित |
मंत्रिमंडळाचा पहिलं विस्तार झाला असून आता उद्यापासून (16 डिसेंबर) हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार? याची नोंद लवकरच येण्याची शक्यता आहे. कर्ण मंत्र्यांना अधिवेशनात उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Cabinet Ministers List 2024: फडणवीसांच्या मंत्रिमंडळात घराणेशाहीचा दबदबा
- नितेश राणे: नितेश राणे हे सिंधुदुर्गातिल कणकवली मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राने यांचे नितेश हे पुत्र आहेत. नितेश राणे यांचे भाऊ नीलेश राणे ही यंदा महाराष्ट्राच्या विधीमंडळात आमदार म्हणून निवडून आले आहेत.
- इंद्रनील नाईक: इंद्रनील नाईक हे पुसद मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार आहेत. नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे नातू आहेत. पुसद मतदारसंघावर गेली 72 वर्ष नाईक कुटुंबातूनच आमदार म्हणून निवडून येत आहे.
- आदिती तटकरे: आदिती तटकरे या रायगड मधील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या आमदार आहेत. रायगडचे खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती तटकरे यांचे बंधु अनिकेत तटकरे हे विधान परिषदेत आमदार होते/ तर चुलत भाऊ अवधूत तटकरे हे श्रीवर्धन मतदार संघाचेच माजी आमदार आहेत.
- पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे: धनंजय मुंडे हे परळी मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार आहेत. यापूर्वीही त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात कृषि, समाजकल्याण अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे ते पुटणे आहेत. तर पंकजा मुंडे या विधान परिषेद भाजपच्या आमदार आहेत. आणि त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत.
- राधाकृष्ण विखे पाटील: राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी महसूल सारखं महत्वाचं खांत सांभाळलं आहे. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे राधाकृष्ण विखे पाटील हे पुत्र आहेत. तर अहमदनगर मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यापपूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. नंतर पक्षांतर करत ते भाजपमध्ये सामील झाले.
- शंभुराजे देसाई: शंभुराजे देसाई हे सताऱ्यातील शिंदे गटाचे नेते आणि आमदार आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे ते नातू आहे. शंभुराजे देसाई यापूर्वीच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते.
- आकाश फुंडकर: आकाश फुंडकर हे भाजपचे आमदार आहेत. भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांचे आकाश हे पुत्र आहेत. पांडुरंग फुंडकर यांनी खासदार आणि आमदार अशी दोन्ही पद भूषवली होती. विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवलं होत.
- शिवेंद्रसिंहराजे भोसले: शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसआदहीए होते. साताऱ्याचे माजी खासदार अभयसिंहराजे भोसले यांचे शिवेंद्रसिंहराजे हे पुत्र आहे. तर साताऱ्याचे लोकसभा खासदार उदयनराजे भोसले हे शिवेंद्रसिंह राजेंचे चुलत भाऊ आहेत.
- मेघना बोर्डीकर: मेघना बोर्डीकर या परभणीच्या जिंतुर मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परभणी जिल्ह्यातील राजकारणावर गेली काही दशकं आपलं वर्चस्व कायम राखणाऱ्या रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मेघना या कन्या आहेत. रामप्रसाद बोर्डीकर हे कॉंग्रेसकडून 5 वेळा आमदार होते.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!