महायुतीचे मंत्री ठरले! भाजप 20, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion 2024

Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुतीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरल्या नंतर आता राहिलेल्या बाकीचे मंत्रिपदाची शपथविधी राहिली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या जोर- बैठकांचा सिलसिला संपवून आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. आज 15 डिसेंबर रोजी नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहेत. महयुतीचे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपकडून भाजपकडून 19 आमदारांना मंत्रीपदासाठी फोन करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वत: आमदारांना फोन करून मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यात सांगत आहे.

Maharashtra Cabinet Expansion 2024
Maharashtra Cabinet Expansion 2024

तसेच भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्रीपदे मिळणार आहेत. शिवसेनेच्या वाट्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 12 मंत्रीपदे मिळणार आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसला अजित पवारांसह 10 खाती मिळणार आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदासाठी आज सकाळपासून संबंधित पक्षाच्या वरिष्ठांना फोन केले आणि मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदासाठी फोन करण्यात आला.

नागपुरात आज फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शपथविधी होत आहे. खातेवाटपात गृह, अर्थ, नगरविकास, महसूल अशा महत्वाच्या खात्यांवरून महायुतीत तिढा असल्याची चर्चा होती. शिवाय, कुणाला जास्त मंत्रीपदे, तर कुणाला कमी, यावरून ही दुमत होते. आखरिस 13 डिसेंबरच्या रात्री हा तिढा सुटला असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सागर निवासस्थानी रात्रीत भेट आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला. आज सायंकाळी चार वाजता नागपूर मध्ये राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी आज सकाळपासून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठी कडून मंत्रीपदासाठी नाव फायनल झालेल्या नेत्यांना फोन करायला सुरुवात झाली आहे.

Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुतीतील या नेत्यांना मंत्रीपदासाठी फोन गेल्याची माहिती

आज (15 डिसेंबर) नागपुरात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना मंत्रीपदासाठी फोन गेल्याची माहिती आहे.

Maharashtra Cabinet Expansion 2024

या नेत्यांची यादी पुढील प्रमाणे:

भाजप शिवसेना (शिंदे गट)राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)
1) नितेश राणे उदय सामंत आदिती तटकरे
2) शिवेंद्रराजे भोसले प्रताप सरनाईक बाबासाहेब पाटील
3) चंद्रकांत पाटील शंभुराजे देसाई दत्तमामा भरणे
4) पंकज भोयर योगेश कदम हसन मुश्रीफ
5) मंगलप्रभात लोढा आशीष जैस्वाल नरहरी झिरवाळ
6) गिरीश महाजन भरत गोगावले मकरंद पाटील
7) जयकुमार रावल प्रकाश आबिटकर इंद्रनील नाईक
8) पंकजा मुंडे दादा भुसे धनंजय मुंडे
9) राधाकृष्ण विखे पाटील गुलाबराव पाटील
10) गणेश नाईक संजय राठोड
11) मेघना बोर्डीकर संजय शिरसाठ
12) अतुल सावे
13) जयकुमार गोरे
14) माधुरी मिसाळ
15) चंद्रशेखर बावनकुळे
16) संजय सावकारे
17) आकाश फुंडकर
18) अशोक उईके
19) आशीष शेलार

महायुतीच्या मंत्रीमंडळातील संभाव्य चेहऱ्यांची ही यादी असून शपथविधीनंतरच मंत्रीमंडळात नेमकं कोण कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल.

Maharashtra Cabinet Expansion 2024: मंत्रिमंडळात कोणाला कोणती खाती मिळणार?

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: कडे गृहखाते ठेवणार असल्याची चर्चा आहे. तसंच, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, आदिवासी विकास, पर्यटन, वने अशी महत्वाची खतीही भाजपकडे राहण्याची शक्यता आहे.
  • अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे शिंदे सरकारमध्ये जी खाती होती, तीच खाती पुन्हा फडणवीस यांच्या सरकारमध्ये कायम राहणार असल्याची माहिती आहे.
  • वित्त, सहकार, कृषि, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालकल्याण, अन्न आणि औषध प्रशासन, क्रिडा आणि युवक कल्याण, मदत आणि पुनर्वसन अशी महत्वाची खाती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असतील, असं म्हंटलं जातंय.
  • तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे नगरविकास, आरोग्य, पाणीपुरवठा, उत्पादन शुल्क, जलसंधारण, पणन, शालेय शिक्षण, सामाजिक न्याय अशी खाती असतील अशी शक्यता आहे.
  • 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांना शपथविधी होणार आहे. 15 डिसेंबर दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांना शपथविधी होणार आहे. महायुतीच्या या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेतील, अशी शक्यता आहे.
Maharashtra Cabinet Expansion 2024

Maharashtra Cabinet Expansion 2024: मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10

मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय त्यामुळे आता भाजपचे 20 शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या राजभवनात दुपारी तीननंतर हा शपथविधी होणार असून राजभवनात दुपारी तीननंतर हा शपथविधी होणार असून राजभवनात प्रशस्त लॉनवर याची जोरदार तयारी करण्यात आलीय. याआधी 1991 मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता. यानंतर 33 वर्षानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी हा नागपुरात होणार आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!