उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ बेकायदेशीर, बंद केल्यास कायदेशीर कारवाईचे हायकोर्टाचे निर्देशन

Maharashtra Band

Maharashtra Band: बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी (24 ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक देण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र बंदच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात आज (23 ऑगस्ट) सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही. तसेच असे कोणी महाराष्ट्र बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

दुसरीकडे हा बंद राजकीय प्रेरित असल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात या बंद विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका कर्त्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांचाही समावेश आहे. महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता उद्या राज्यामध्ये बंद पुकारला आहे. असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात या बंद विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका कर्त्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांचाही समावेश आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या न्याय पिठापुडे या प्रकरणाची सुनावणी होत आहे.

ठाण्यातील बदलापूर आदर्श शाळेतील घटनेतील अटक झाल्यानंतरही जनआंदोलन सुरूच आहे. लोकांच्या निषेधाच्या पाश्वभूमीवर महाविकास आघाडीने उद्या म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. विरोधकांच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकावर आज सुनावणी होत आहे. प्रत्यक्षात या काळात शाळा महाविद्यालये, बँका आणि इतर अनेक संस्था बंद राहिल्याने राज्यातील जनतेचे मोठे हाल होणार असल्याचा युक्तिवाद या बंद बाबत न्यायालयात करण्यात आला आहे. अशा स्थितीत हा बंद पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Maharashtra Band
Maharashtra Band

उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी काय भूमिका घेणार? याकडे अनेकांच लक्ष लागलं होतं. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करत उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर कॉँग्रेसने भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद (Maharashtra Band) मागे घेत असल्याचं स्पष्ट केले. मात्र कॉँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात विविध ठिकाणी काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात येणार असल्याच सांगण्यात आलं आहे. उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

Maharashtra Band: नेमकं काय म्हटलं न्यायालयाने?

सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेले निकाल निर्देशन हे स्पष्ट आहेत. प्रत्येक राज्याला हे लागू होतात. अशा प्रकारे कोणत्याही राजकीय पक्षाला राज्यात बंद पुकारण्याचा अधिकार नाही.एखाद्या मुद्यावर विरोध करू शकतात. पण अशा प्रकारे बंद करण्याचा अधिकार राजकीय पक्षाला नाहीये. अशामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला एक प्रकारे वेठीस धरले जाते आणि हे अत्यंत चुकीचे आहे. जनजीवन कुठेही विस्कळीत व्हायला नको. शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांना याचा फटका बसत असेल तर ते चुकीचे असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्याच निर्देशनानुसार, राज्य सरकारने हा बंद आधीच बेकायदेशीर ठरवला आहे. या बंदला कुठेही गालबोट लागू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.

आता मुंबई उच्च न्यायालयाचा निर्देशानंतर ज्यांनी हा बंद पुकारला आहे. अशा व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटिस बजावण्यास पोलिसांकडून सुरू करण्यात आलं आहे. जर कुणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात एणार आहे. बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी (24 ऑगस्ट 2024) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, या महाराष्ट्र बंदच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली ओटी. अ याचिकेवर शुक्रवारी (23 ऑगस्ट 2024) सुनावणी पार पडली. या याचिकेवर सुनावणी दरम्यान हा बंद बेकायदेशीर बंद असल्याचं न्यायालयाने म्हटलं तसच बंद करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश सुद्धा राज्य सरकारला दिले आहेत.

Maharashtra Band: शरद पवारांनी काय आवाहन केलं होतं?

बदलापूर घटनेच्या पाश्वभूमीवर उद्या डी. 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन अरण्यात आले होते. त्या दोन अजाण बलिकांवर झालेला अत्याचार हा अतीशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरातुन याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. असं शरद पवार यांनी एक्सवर ट्विटवर म्हटलं होतं.

Maharashtra Band: उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उच्च न्यायालयाने हा निर्णय ज्या तत्परतेने दिल त्याच तत्परतेने महाराष्ट्रात जे गुन्हे घडत आहेत. त्या गुन्ह्यातिल आरोपींना शिक्षा देण्याची तत्परता दाखवावी. उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मात्र न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवावा लागतो. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. मात्र त्याआधे काही अवधी लागू शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आता वेल नाही. त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत. मात्र महाराष्ट्रभर आम्ही महाविकास आघाडीची सर्व नेते आणि कार्यकर्ते हातामध्ये काळे झेंडे घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आम्ही घडलेल्या घटनांचा निषेध करणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले आहे.

Maharashtra Band: बंद बेकायदेशीर

उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्यासाठी परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. मुंबई न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोर्टाने लेखी एष जारी होतील.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!