Lok Sabha Election Result 2024
Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकल आज (4 जून 2024) जाहीर होत आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 48 तर मुंबईतिल 6 मतदार संघांचा समावेश आहे. राज्यातील शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्यात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मतदान झालं. मुंबई आणि ठाणे लोकसभेची निवडणूक आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही महत्वाची आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईकर ठाकरे गट की शिंदे गट? कुणाच्या बाजूने आहेत याचा निकाल देखील या निवडणुकीतून होणार आहे.
मुंबईत महाविकास आघाडीकडून सहापैकी चार जागांवर शिवसेना ठाकरे गट मैदानात आहे तर दोन जागांवर कॉँग्रेस निवडणूक लढत आहे. तर महायुतीकडून भाजप आणि शिवसेना शिंदे गट प्रत्येकी तीन जागांवर निवडणुकीत उतरले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात कॉन बाजी मारणार याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे. तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याण मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच भवितव्य देखील या निवडणुकीतून ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी
लोकसभेचे निकाल आल्यानंतर भाजपला केंद्रात स्वत:च्या बळावर सरकार स्थापन करण्याएवढे बहुमत मिळालेले नाही. तर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता केंद्रात भाजप सरकारला मित्रपक्षाशी मदत घ्यावी लागणार आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतीकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. येथे महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला मिळालेल्या कमी जागांमुळे जबाबदारी स्वीकारत केंद्राला आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनती केली आहे.
विरोधकांनी भाजप घटना बदलणार असा चुकीचा प्रचार केल्याने हे जागांचे नुकसान झाले अन्यथा भाजपा केंद्रात स्वबळावर पुन्हा आले असते असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 जून रोजी पुन्हा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.
Lok Sabha Election Result 2024: अधिवेशनाची तारीख जाहीर
18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जूनच्या मध्यात बहुधा 18 जून सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. एकदा अधिवेशनाची तारीख जाहीर झाली की, संसद सचिवालय नवीन संसद भवन इमारतीत सर्व 543 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रक्रियेनुसार, हंगामी अध्यक्षाची निवड केली जाईल. विरेन्द्र कुमार यांची हंगामी अध्यक्ष म्हणून 2019 मध्ये निवड करण्यात आली होती.
नवे पंतप्रधान इटलीला जाणार?
सत्ताधारी पक्षाच्या सदस्याद्वारे निवड झाल्यानंतर पंतप्रधान 13 ते 15 जून रोजी इटलीत होणाऱ्या जी-7 शिखर परिषेदेत सहभागी होण्यासाठी इटलीला जाणे अपेक्षित आहे.
त्यामुळे हे अधिवेशन 18 जून रोजी होणार आहे. सभागृहाच्या नियम 2.8 प्रमाणे अध्यक्षांना त्यांच्या कर्तव्यात मदत करणे. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत अध्यक्षपदी राहणे किंवा कार्यवाह अध्यक्ष म्हणून एखाद्या सदस्याला बोलावणे ही हंगामी अध्यक्षांची कर्तव्य आहेत.
Lok Sabha Election Result 2024: अहवालातून मिळाले संकेत
सरकारी त्रेमासिकातून आलेले अहवाल हे काही संकेत देत आहेत. त्यानुसार, 2024-2025 या वर्षाला अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाऊ शकतो. पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीनंतर शपथविधी साठी संसदेचे एक छोटे सत्र असायचे आणि त्यानंतर अर्थ संकल्पीय अधिवेशन होत असे. परंतु जून 2019 मध्ये शपथविधी सत्राला अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबत जोडून कार्यपद्धती बदलण्यात आली.
सुरुवातीला, सत्र 17 जून 2019 ते 26 जुलै 2019 या कालावधीत आयोजित करण्याचे ठरवले होते तथापि, ते 7 ऑगस्ट 2019 पर्यंत वाढविण्यात आले.
मुंबईतील सहापाकी पाच जागांवर माविआचा विजय
- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: भाजपचे पियुष गोयल विजयी, काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव.
- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ: काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी, भाजपचे उज्वल निकम पराभूत.
- मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ: संजय दिना पाटील (शिवसेना, उबाठा) विजयी, भाजपचे मिहीर कोटेचा पराभूत.
- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अमोल कीर्तिकर (शिवसेना, उभाठा) पराभूत, रवींद्र वायकर (शिवसेना, शिंदे गट) विजयी.
- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ: अरविंद सावंत (शिवसेना, उबाठा) विजयी, यामिनी जाधव (शिवसेना गट) पराभूत.
- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: अनिल देसाई (शिवसेना, उबाठा) विजयी, राहुल शेवाळे (शिवसेना गट) पराभूत.
मुंबईत वंचितला सपशेल अपयश, मतदानाची टक्केवारी देखील मागील निवडणुकीपेक्षा घटली
वंचितचा करिष्मा मुंबईत फेल, अनेक ठिकाणी नोटापेक्षा वंचितला मुंबईत मतदान कमी
मुंबई उत्तरमधून वंचितला 1429 मतं, मुंबई उत्तर मध्यमधून 3600 मतं
मुंबई उत्तर पूर्वमधून 2665, उत्तर पश्चिममधून 5962 मतं
मुंबई दक्षिणमधून केवळ 994 मतं, दक्षिण मध्य मुंबईतून 7 हजार 342 मतं
Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाचे अपडेट्स
महाराष्ट्रातील 48 जागांसह देशातील 543 जागांचा निकल असं हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. त्यात राज्यातील 48 जागांवर महायुतील जबरदस्त फटका बसला आहे. मिशन 45 चं स्वप्न बघणाऱ्या महायुतीला राज्यात 20 जागाही मिळणं अवघड झालं आहे. महाराष्ट्रात कॉँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात 17 जागा लढवणाऱ्या कॉँग्रेसला 11 ते 12 जागांवर आघाडी आहे. अशाप्रकारे अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल यावेळी बघायला मिळालाय.
4 जूला सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीच्या कला नुसार उदयन राजे भोसले हे पिछाडीवर होते. शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेतली होती. शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी तर विजयाचा जल्लोषही सुरू केली होता. मात्र वारं फिरलं. शिंदेंची आघाडी तोडत उदयन राजे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत टिकवली. शेवटी विजयही त्यांनी नोंदवला. त्यानंतर सुरू झाला तो कार्यकर्त्यांचा जल्लोष. हा जल्लोष अगदी राजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये ही झाला. यावेळी उदयन राजेंना अश्रू अनावर झाले. त्यावेळी दमयंती राजे यांनी उदयन राजे यांना धीर दिला. त्यावेळी राजे थोडे सावरले. त्यांनी मग जल्लोषात सहभाग नोंदवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
Lok Sabha Election Result 2024 विजयानंतर उदयन राजे यांनी आनंद व्यक्त केला. मी काय कमावलं असा विचार मनात येतो. निवडणूक जिंकली ते ठिक आहे. पण निवडणुकीत जनता कशाकडे बघून मतं देते हे समजायला मार्ग नाही असे वक्तव्य त्यांनी केले. भ्रष्टाचार करायचाय तर भ्रष्टाचार कर अशा चिटुरकीतून पोच पावती मिळत असेल काय करायचं असा प्रश्न उपस्थित करत शिंदेंना मिळालेल्या मतांबाबत नाराजी व्यक्त केली. शिवाय त्यांना जे मताधिक्य मिळाले त्याबाबत आपण समाधानी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र या मतदार संघात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!