सरकार स्थापने आधीच नितीश कुमारांच्या 3 मागण्या, कोणत्या असतील त्या मागण्या, सुत्रांनी दिली मोठी माहिती

Lok Sabha Election 2024 Result

Lok Sabha Election 2024 Result: केंद्रात भाजप प्रणीत एनडीएचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित आहे. भाजपला बहुमत न् मिळाल्यामुळे एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना आता विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ही बाब नितीश कुमार यांना चांगलीच माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी सरकार स्थापने आधी तीन महत्वाच्या खात्यांवर दावा केला आहे. शिवाय बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही पहिल्याच बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चार खासदारांमगे एक मंत्रिपद असे सूत्रही त्यांना भाजपला दिले आहे. त्यामुळे निर्णयाचा चेंडू आता भाजपच्या कोर्टात आहे. सध्याची स्थिति पाहत भाजपपुढे नितीश कुमार यांची मागणी मान्य करण्या शिवाय कोणताही पर्याय दिसत नाही.

Lok Sabha Election 2024 Result
Lok Sabha Election 2024 Result

Lok Sabha Election 2024 Result: नितीश कुमारांनी मागितली 3 खाती

नितीश कुमार यांनी भाजपकडे तीन महत्वाच्या मंत्रालयांची मागणी केली आहे. म्हणजेच महत्वाची समजली जाणारी रेल्वे, कृषि आणि अर्थ या खात्यावर नितीश कुमार यांनी दावा केला आहे. ही खाती सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. ही खाती आता भाजप सोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकार स्थापने आधीच मित्रपक्षाच्या अतिशर्थी मुळे मोदी यांचा तिसरा कार्यकाळ हा अडचणींचा सामना करणारा ठरणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

नितीश कुमार आणि चंद्राबाबुना विशेष महत्व

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेड ने 16 जागा लढल्या होत्या. तर भाजपने 17 जागा लढल्या होत्या. दोघांनाही 12 जागांवर विजय मिळवला होता. लोकसभेच्या 240 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. त्यामुळे भाजप बहुमतापासून दूर आहे. अशा वेळी 12 जागा जिंकणारे नितीश कुमार आणि 16 जागा जिंकणारे चंद्राबाबू हे भाजपसाठी महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे महत्वाची खाती आपल्या पदरात पडावी यांसाठी आतापासून यादोन्ही नेत्यांकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

Lok Sabha Election 2024 Result: भाजपपुढे पर्याय काय?

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या प्रमाणे अन्य घटक पक्षही एनडीएमध्ये आहेत. त्यामुळे ही भाजपची कमजोरी पाहता त्यांचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे तेही आपल्या पदरात चांगले खाते पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. एनडीएकडेही काठावरचे बहुमत आहे. त्यामुळे कोणत्याही घटक पक्षाला नाराज करणे भाजपला परवडणारे नाही. त्यामुळे आता भाजप कोणते पाऊल टाकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नितीश कुमार, नायडूना भाजपकडून लोकसभा अध्यक्षपद आणि अर्थमंत्रालय का हवंय?

लोकसभा निवडणूक 2024 चे निकालांमध्ये (Lok Sabha Election 2024 Result) राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळालंय. एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपाला 63 जगाचं नुकसान झालं असून 240 जागा मिळाल्या आहेत. भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे एनडीए मधील जनता दल युनायटेड (JDU) आणि तेलुगू देसम पार्टी (TDP) यांना महत्व प्राप्त झालय. जेडीयुला 12 तर तेलुगू देसमला 16 जागा मिळाल्या आहेत.

निवडणूक निकालानंतर बदललेल्या परिस्थितीत दोन्ही पक्षांनी भाजपकडे आपल्या मागण्याची यादी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) टीडीपीनं लोकसभा अध्यक्षपद आणि 5 मंत्रीपदांची मागणी केलीय. तर नितीश कुमारांच्या (Nitish Kumar) जेडीयुनं अर्थ, रेल्वे आणि कृषि या तीन महत्वाच्या खात्यावर दावा केलाय. विशेष म्हणजे टिडीपिदेखील अर्थमंत्रालयासाठी आग्रही आहे.

लोकसभा अध्यक्षांचं महत्व

लोकसभेतील कोणत्याही प्रकरणात लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. खासदारांना गैरवर्तनासाठी निलंबित करणे, तसंच पक्षांतर केलेल्या सदस्यांची खासदारकी रद्द करण्याचे अधिकार त्याला असतात. त्याचबरोबर अविश्वास तसच निंदा प्रस्तावाला मान्यताही अध्यक्ष देतात.

लोकसभेतील महत्वाच्या विधेयकांवर कोणता सदस्य मतदान करू शकतो, कॉन करू शकत नाही याचा निर्णय देखील अध्यक्ष घेतात. अध्यक्षांच्या निर्णयाला कायदेशीर संरक्षण आहे. त्यामुळे या पदाला आणखी महत्व आहे.

आघाडी सरकारमधील छोट्या पक्षांना अनेकदा फुटीचा धोका असतो. पक्षांतरबंदी कायद्याचा अर्थ लावणे आणि त्यानुसार निर्णय घेण्यासाठी लोकसभा अध्यक्षांची भूमिका महत्वाची ठरते. पक्षांतर करणाऱ्या सदस्यांना अपात्र ठरवण्याचा अधिकार देखील अध्यक्षांना आहे.

Lok Sabha Election 2024 Result

लोकसभेत सरकारच्या हितांचं संरक्षण करणे हे अध्यक्षांचं मुख्य काम आहे. सरकार आणि अध्यक्षांमध्ये मतभेद असतील तर पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो.

अर्थमंत्रालयचा आग्रह का?

केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र हे चार मंत्रालय महत्वाची मानली जातात. जेडीयु आणि टीडीपी हे दोन्ही पक्ष अर्थमंत्रालयासाठी आग्रही आहेत याची दोन महत्वाची कारणं आहेत.

अर्थसंकल्पातील तरतूद:नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन्ही नेते त्यांच्या राज्यांना विशेष दर्जा मिळवा म्हणून आग्रही आहेत. राज्यांना खास पॅकेज मिळणे तसंच केंद्रीय अर्थसंकल्पात खास वाटा मिळवणे यासाठी अर्थमंत्रालय महत्वाचं आहे.

ED ची भीती: अंमलबजावणी संचालनालय म्हणजे EDहे अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत येतं. चंद्राबाबूच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या केस असून त्याच्या फाइल ED कड आहेत. देशभरातील वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना गेल्या काही वर्षात ED नं टाकलेल्या धाडीची धास्ती आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष विशेषत: टीडीपी अर्थमंत्रालयासाठी आग्रही आहे.

पाच वर्ष तुमच्यासोबत राहू- नितीश कुमार

यावेळी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयु प्रमुख नितीश कुमार म्हणाले की, जेडीयुचा पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना पूर्ण पाठिंबा आहे. आमचा पक्ष पूर्ण 5 वर्ष नरेंद्र मोदी यांच्यासोबत असेल. पुढच्या वेळी आपण जास्त बहुमत घेऊन येऊ. आज हा आनंदाचा क्षण आहे. दहा वर्षापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. आणि आता पुन्हा पंतप्रधान होत आहेत. त्यांनी सगळ्या देशाची सेवाकेली आहे. आता पूर्ण विश्वास आहे की, राज्याचे जे काही बाकी आहे ते पूर्ण करतील आम्हाला तर वाटतंय की पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा याल तेव्हा सगळेच पराभूत होतील, आम्ही सगळे तुमच्या नेतृत्वात काम करू, असे नितीश कुमार म्हणाले.

“गेल्या 10 वर्षात भारतात मोठा बदल झाला असून भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा वेग असाच सुरू राहील आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत यावेळी तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली एनडीए सरकारने गेल्या 10 वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मोदींच्या नेतृत्वात देश जागतिक शक्तिस्थान बनला आहे.”

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!