Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत 99 जागा जिंकल्याने कॉँग्रेसला 10 वर्षानंतर लोकसभेत(Lok Sabha Election 2024) विरोधी पक्षनेत्याचे संवैधानिक पद पुन्हा मिळत आहे. यासाठी पक्षात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वत: राहुल गांधी यांनी स्वीकारायला हवी यावर कॉँग्रेस मध्ये एकमत दिसते. कॉँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत यावर औपचारिकपणे निर्णय घेतला जाईल.
लोकसभेचे पहिले अध्यक्ष जी. व्ही. मावलंकर यांच्या काळात बनवण्यात आलेल्या नियमानुसार विरोधी पक्षाचे नेत्याचे पद लोकसभेतील सदस्य संख्येच्या 10 टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षाला मिळते. सत्ताधारी पक्षाला वाटल्यास आपल्या पक्षाच्या वतीने प्रस्ताव सादर करत सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला हा दर्जा देऊ शकतात.
सरकारने घटनात्मक सुरक्षेचा घेरा कायम ठेवला पाहिजे. असे विरोधी पक्ष ठपवतात. सत्तेत असलेल्या पक्षाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, प्रतिक्रिया देणे, त्यांना प्रश्न विचारणे हे विरोधकांचे काम आहे. सरकार अनि विरोधी प्रश्न यांच्यातील वाद हा देशातील लोकशाही टिकवण्यात महत्वाची भूमिका बाजवतो. त्यामुळेच विरोधकांकडे सभागृहात महत्वाची जबाबदारी आहे.
मतमोजणीचे निकाल मिळाल्यानंतर विरोधी पक्षाची खुर्ची कोणाकडे राहणार हे निश्चित होते. विरोधी पक्षाचे पद असे दिले जात नाही, त्यासाठी नियमही आहेत. विरोधी पक्षात कॉन बसणार आणि त्या पक्षनेत्याला कोणत्या सुविधा मिळणार हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.
विरोधी पक्षनेता कधी नेमला जातो?
सभागृहात अनेक विरोधी पक्ष असतात. पण विरोधी पक्ष नेता नेमण्यासाठी लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान दहा टक्के जागा निवडून येण गरजेच असत, म्हणजे लोकसभेच्या 543 जागांपैकी किमान 55 जागा विरोधातल्या पक्षाने जिंकलेल्या असणं गरजेच आहे. 2014 च्या निवडणुकीत कॉँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे 16 व्या लोकसभेसाठी विरोधी पक्ष नेता नेमला गेला नाही. 2019 च्या निवडणुकीत कॉँग्रेसला 52 जागा जिंकता आल्या. तीन जागा कमी पडल्याने 17 व्या लोकसभेसाठीही विरोधी पक्ष नेता नेमला गेला नाही.
Lok Sabha Election 2024 च्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसला 99 जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्राच्या सांगलीतुन अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनी कॉँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसचा सदनातला आकडा 100 वर पोहचला आहे. त्यामुळे कॉँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपड मिळेल. कॉँग्रेसच्या कार्यकारिणीने राहुल गांधी यांना हे पद स्वीकारण्याची विनंती केलेली आहे.
विरोधी पक्षनेतेपद कधी रिक्त होतं?
195 साली स्वतंत्र भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकसभेतही विरोधी पक्षनेतेपद कोणत्याही पक्षाला मिळालं नव्हत, त्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसला लोकसभेत 360 ते 370 जागा मिळाल्या होत्या. पहिल्या तीनही लोकसभांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष ठरला होता. पण सिपीआय या निवडणुकांमध्ये 16 ते 30 च्या दरम्यान जागा मिळाल्या होत्या.
चौथ्या लोकसभेमध्ये 1969 साली राम सुभाग सिंह हे पहिले विरोधी पक्षनेते बनले आणि तब्बल 17 वर्षानी सभागृहाला विरोधी पक्षनेता मिळाला. त्यावेळी कॉँग्रेसमध्ये फुट पडली होती आणि लोकसभा अध्यक्षांनी कॉँग्रेसच्या राम सुभाग सिंह यांना पक्षनेता म्हणून मान्यता दिली होती. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या लोकसभेमध्येही विरोधकांकडे पक्षनेतेपद मिळवण्याइतकं संख्याबळ नव्हत.
1980 आणि 1984 मध्येही कोणत्याही विरोधी पक्षाला 55 जागा न् मिळाल्याने विरोधी पक्ष नेता नव्हता.
विरोधी पक्षात कोन बसणार हे कसे ठरते?
- सभागृहात एकूण जागांपैकी 10 टक्के जागा असलेल्या पक्षाला विरोधी पक्षाला विरोधी पक्षात बसण्याची संधी मिळते.
- त्या पक्षाच्या खासदारांची विरोधी पक्षनेतेपदी एकमताने निवड केली जाते. पण कोणत्याही विरोधी पक्षाकडे एकूण जागांपैकी 10 टक्के पक्षनेते नसतील तर अशावेळी कोणीही सभागृहात विरोधी पक्षनेत्याला 1977 स;ई वैधानिक मान्यता देण्यात आली.
- हाच नियम विधानसभेला देखील लागू होतो. यातहे सुद्धा विरोधी पक्षात बसण्यासाठी 10 टक्के जागा मिळवणे बंधनकारक आहे.
- 17 व्या लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे 10 टक्के जागा नव्हती. त्यामुळे सभागृहात कोणीही विरोधी पक्षनेते होऊ शकले नाही. पण अधीर रंजन चौधरी हे लोकसभेतील कॉँग्रेसचे नेते आहेत. जे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
1956 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती जी. व्ही. मावलंकर यांनी 120-123 या निर्देशाननुसार पहिल्यांदा संसदेत 10 टक्के नियम आणला होता. हा नियम थेट विरोधी पक्षनेत्याशी संबधित होता. खर तर हा दर्जा मिळवण्यासाठी सदस्याला संसदीय पक्ष म्हणून मान्यता असलेल्या पक्षाशी संबंधित असणे बंधनकारक होते. लोकसभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी पक्षाकडे 10 टक्के जागा असणे आवश्यक होते. 1969 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा पहिल्यांदा लोकसभेत विरोधी पक्ष औपचारिकपणे अस्तित्वात आला.
Lok Sabha Election 2024: विरोधी पक्ष नेता महत्वाचा का आहे?
- विरोधी पक्ष नेतेपद त्या पक्षाच आणि पक्षाच्या नेत्याचं महत्व दर्शवते. लोकसभेतल्या (Lok Sabha Election 2024) विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो आणि त्यानुसार पगार भत्ते आणि सुविधा मिळतात.
- लोकशाही सुद्दढ ठेवण्यासाठी विरोधी पक्ष मजबूत असणं गरजेच असत. सरकारच्या कामकाजा बाबत, धोरणात्मक प्रश्न विचारून सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका विरोधी पक्ष पर पडतो.
- लोकसभेच्या महत्वाच्या विषयांवरील चर्चा आणि प्रस्थावांवर विरोधी पक्ष नेत्याची भूमिका महत्वाची असते. सरकारवर अंकुश ठेवण्याच्या विरोधी पक्ष नेत्याची भूमिका महत्वाची असते, सरकारवर अंकुश ठेवण्याच्या विरोधी पक्षांच्या भूमिकेच नेतृत्व हा विरोधी पक्ष नेता करत असतो.
- संसदेमद्धे विरोधकांचा आवाज क्षीण असेल तर सरकार मनमानी कायदे, धोरण मंजूर करू शकत. त्यामुळेच सरकारवर विरोधी पक्षाचा धक असंन लोकशाहीच्या दृष्टीने गरजेचे असत.
- विरोधीपक्ष नेतेपड असणार खासदार हा विविध समित्यांचाही सदस्य असतो. यात लोकलेखा समिति (Public Accounts Committee), सार्वजनिक उपक्रम समिति (Public Undertakings Committee) यांच्यासह विविध संसदीय समित्यांचा समावेश आहे.
- यांसोबत केंद्रीय दक्षता आयोग (central Vigilance Commission), केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission), सीबीआय (central Bureau of Investigation), राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (National Human Rights Commission) यांच्या प्रमुखांची नेमणूक करणाऱ्या समितीमध्येही विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश असतो.
- राज्यघटनेत विरोधी पक्षनेतेपदाचा उल्लेख नसला तरी संसदीय कायद्यात त्याचा उल्लेख आहे. लोकसभेच्या कामकाजाला लागू होणारे नियम केवळ लोकसभेच्या अध्यक्षांना संसदेच्या कनिष्ट सभागृहाच्या कामकाजासाठी सूचना देण्याचा अधिकार देतात.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!