ओळख नवीन खासदारांची, जे झालेत पहिल्याच टर्म ला खासदार, पहा कोण आहेत ते

Lok Sabha 2024 Election Result

Lok Sabha 2024 Election Result: च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात अनेक गोष्टी आश्चर्यकारक होत्या. मतमोजणीच्या दिवशी (4 जून) चढ-उतार असताना अनेक नवीन चेहऱ्यांनी निवडणुकीत विजय (Lok Sabha 2024 Election Result ) मिळवला. यामध्ये ह्या खासदारांचा समावेश आहे, त्यापैकी बहुतेक भारतीय ब्लॉकमधील आणि एक एनडीए कॅम्पमधील आहेत, जे नवीन लोकसभेत आपले विचार मांडताना दिसतील. या नवीन खासदारांपैकी प्रत्येकाकडे मजबूत ओळखपत्रे आहेत आणि त्यापैकी बहुतेक राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. चला या खासदारांबद्दल सांगतो ज्यांनी दिग्गज नेत्यांचा पराभव करून संसदेच्या कनिष्ठ सभागृहात पोहोचण्याचा मार्ग मोकळा केला.

Lok Sabha 2024 Election Result
Lok Sabha 2024 Election Result

1. नीलेश लंके (नगर- राष्ट्रवादी शरद पवार गट)

अत्यंत किरकोळ शरीरयष्टी, डोळ्याला काड्यांचा चष्मा, खुरटलेली काळी-पांढरी दाढी, कपाळावर टिळा, साधा शर्ट-पॅन्ट अशा एकदम सामान्य वेशभूषेतील नीलेश ज्ञानदेव लंके यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या पोटात शिरण्याची आणि लोकांत मिसळण्याची विलक्षण हातोटी आहे. शिवाय तितक्याच कौशल्याने ते आधुनिक समाज माध्यमांचाही वापर करतात. थोडक्यात म्हणजे रूप साधे मात्र अंगी नाना कळा. अशा या सामान्य परिस्थितीतील कार्यकर्त्याने ग्रामपंचायतीचा सरपंच ते आमदार आणि आता खासदार अशी भरारी घेतली आहे.

सुरुवातीला शिवसेनेचे आमदार विजय औटी यांचे कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. पुढे तालुकाप्रमुख झाले. पंचायत समिती सदस्य निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यांनी त्याच जागी पत्नी राणी लंके यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडूण आणले. तत्कालीन आमदार औटी आणि लंके यांची कार्यशैली परस्परविरोधी. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सन २०१८ मधील पारनेर दौऱ्यात झालेल्या दगडफेकीचे खापर लंके यांच्यावर फोडण्यात आले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. त्याचवेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेससाठी पारनेरमध्ये उमेदवाराच्या शोधात होतेच. लंके यांनी लगेच विधानसभेसाठी औटी यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल करत दणदणीत(Lok Sabha 2024 Election Result) विजयही मिळवला.

2. मुरलीधर मोहोळ (पुणे-भाजप)

कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले आहेत. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. त्यामुळे कसलेला पैलवान ते (Lok Sabha 2024 Election Result) खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास ठरला आहे.

मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ यांनीही शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. पुण्यात प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर कुस्तीसाठी ते कोल्हापूरला गेले. आंतरमहाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावराच्या आखाड्यापर्यंत त्यांनी मजल मारली. कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परतले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांचा पुण्याच्या राजकारणात १९९३ च्या सुमारास प्रवेश झाला. या दरम्यान, माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या ते संपर्कात आले आणि त्यांनी राजकीय आखाडाही गाजविण्यास सुरुवात केली.

पक्ष संघटनेत वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या वर्षी त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले. भाजपची पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, तर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांना महापौरपदाची जबाबदारी मिळाली. स्मार्ट सिटी आणि पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ मध्ये निवडणूक लढविली होती.

3. अनुप धोत्रे (अकोला-भाजप)

अकोल्यातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांना राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा श्यामराव धोत्रे हे आमदार होते. त्यानंतर वडील संजय धोत्रे यांची तीन दशकावून अधिक काळाची यशस्वी राजकीय कारकीर्द आहे. संजय धोत्रे यांनी सर्वप्रथम मुर्तिजापूर मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. २००४ मध्ये त्यांना अकोल्यातून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. लोकसभेवर सलग चार निवडणुकांमध्ये ते विक्रमी मताधिक्याने निवडून गेले. २०१९ मध्ये त्यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. अनुप धोत्रे यांच्या मातोश्री सुहासिनी धोत्रे भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत.

अनुप धोत्रे यांचा जन्म २४ मे१९८४ रोजी झाला आहे. पुणे येथील सिंबायोसिस महाविद्यालयातून बी.कॉम.चे त्यांनी शिक्षण घेतले. वडिलांच्या आजापणामुळे त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी अनुप धोत्रे सक्रिय झाले. या अगोदर कधी निवडणूक लढली नसली तरी वडिलांच्या निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर नेहमी राहतच होती. सोशल मीडिया प्रभारी म्हणून पक्षात त्यांनी जबाबदारी पार पाडली. युवकांचे संघटनात्मक जाळे निर्माण केले. अनुप धोत्रे यांच्यावर (Lok Sabha 2024 Election Result )मध्ये अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देत पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. त्या दृष्टिने ते कामाला लागले. तळागाळातून जनसंपर्क वाढविण्यासोबतच पक्षसंघटन मजबूतीवर त्यांनी भर दिला. त्याचा लाभ त्यांना निवडणुकीत झाला.

4. बळवंत वानखडे (अमरावती-कॉँग्रेस)

भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचे पाठबळ, सत्तेचे वलय अशा अनुकूल बाबी सोबत असूनही भाजपच्या नवनीत राणा यांना अमरावतीची जागा गमवावी लागली. त्यांना पराभवाची धूळ चारणारे काँग्रेसचे बळवंत वानखडे यांची सरपंच ते खासदारकी पर्यंतची झेप लक्षवेधी ठरली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते रा. सू. गवई, दे. झा. वाकपांजर यांच्या आंबेडकरी चळवळीच्या मुशीतून तयार झालेले बळवंत वानखडे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमत: आमदार म्हणून विजयाची संधी मिळाली आणि आमदारकीचा कार्यकाळ संपण्याआधीच ते लोकसभेत पोहचले. पोहचल्या नंतर ते ((Lok Sabha Election Result 2024)लोकसभेत ही निवडून आले

सर्वसामान्यांसोबत जुळलेला शांत, संयमी कार्यकर्ता ही बळवंत वानखडे यांनी खरी ओळख. दर्यापूर तालुक्यातील थिलोरीच्या झामाजी वाकपांजर कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून ते कार्यरत असतानाच रिपाइंचे नेते रा.सू. गवई यांच्या राजकीय वर्तुळात वावरण्यास त्यांनी सुरूवात केली. कालांतराने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. दरम्यान, राजकीय कार्यकर्ता म्हणून अल्पकाळात आपले अस्तित्व निर्माण केले. दर्यापूर तालुक्यातील लेहगाव हे त्यांचे गाव. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, त्यानंतर थेट जिल्हा परिषद सदस्य, सभापती, दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वाचनाची, भटकंतीची त्यांना आवड आहे. सर्व समाजातील नेत्यांसोबत चांगले संबंध, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क त्यांच्या विजयात दुवा ठरला.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!