Lok Sabha 2024
Lok Sabha 2024: 18 व्या लोकसभेच (Lok Sabha 2024) पहिल अधिवेशन 24 जूनपासून सुरू होतंय. अधिवेशनाच्या सुरुवातील नवीन खासदारांना शपथ दिली जाईल आणि त्यानंतरचं महत्वाच कामकाज असेल लोकसभा अध्यक्षांची नेमणूक. लोकसभा अध्यक्षांची निवड कशी केली जाते? हे पद महत्वाच का आहे? हे प्रश्न अनेकांना पडलेले असतात. आपण या वृत्तलेखातून ते जाणून घेऊया.
17 व्या लोकसभेचं कामकाज सुरू होताना सगळ्यात आधी Pro-Tem Speaker म्हणजे हंगामी अध्यक्षांनी निवड केली जाते. हे हंगामी अध्यक्ष खासदारांना शपथ देण्याच काम करतात आणि सभागृहाच कामकाज पूर्णवेळ अध्यक्षांनी नेमणूक होईपर्यंत चालवतात. सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांची निवड प्रो-टेम स्पीकर म्हणून केली जाते.
अर्थातच, सत्ताधारी एनडीए आघाडीमध्ये या पदावरून रस्सीखेच सुरू आहेच हे पद निवडले जात नाही तो पर्यंत लोकसभेचे कामकाज हंगामी अध्यक्षांकडून चालवले जाईल. हे हंगामी अध्यक्ष संसदेतील नव्या सदस्यांचा शपथविधी पार पडतील. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जून रोजी लोकसभेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीचा ठराव मांडतील. दरम्यान, नवा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत आताच्या लोकसभेचे सर्वात जेष्ठ सदस्य आणि कॉँग्रेसचे नेते कोडीकुन्नील सुरेश हे हंगामी अध्यक्षपदी निवडले जाण्याची शक्यता आहे. हंगामी अध्यक्ष म्हणजे काय आणि लोकसभेच्या पहिल्या-वाहिल्या अधिवेशनात काय घडते, या बाबत जाणून घेऊयात.
आता सभागृहाचा पीठासीन अधिकारी म्हणून नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल. संसदीय लोकशाहीमध्ये अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जाते. लोकसभेचा अध्यक्ष हा लोकसभेचे कामकाज चलविणारा नेता असतो. राज्यघटनेच्या कलम 94 नुसार, लोकसभा विसर्जित झाल्यानंतर त्यांची पहिली बैठक होईपर्यंत अध्यक्ष आपल्या पदावरच राहतात. नव्या लोकसभेमध्ये सभागृहाच्या अध्यक्षांची निवड साध्या बहुमताने केली जाते. त्यांची ही निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्षांकडून काही महत्वाची कामे पार पडली जातात.
Lok Sabha 2024: यंदा लोकसभा अध्यक्षपद कुणाला?
साधारणपणे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची नेमणूक लोकसभा अध्यक्ष म्हणून केली जाते. तर उपाध्यक्ष पद हे विरोधी पक्षाला दिलं जातं. आजवर एकमतानेच लोकसभा अध्यक्षांची निवड झाली असून स्वतंत्र भारताच्या इतिहासात या पदासाठी निवडणूक झालेली नाही.
यावेळी भाजपला पूर्ण बहुमत न् मिळाल्याने भाजपने तेलगू देसम पक्ष आणि जनता दल युनायटेडच्या सहाय्याने NDA सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षपद भाजप स्वत:कडे ठेवत की मित्र-पक्षांना देऊ करत या विषयीच्या चर्चा रंगत आहेत. तर प्रघताने विरोधी पक्षांना मिळणार उपाध्यक्षपद आपल्याला मिळाव अशी मागणी इंडिया आघाडीने केली आहे.
16 व्या आणि 17 व्या लोकसभेमध्ये भाजपकडे पूर्ण बहुमत होत. सुमित्रा महाजन या 16 व्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या. ALADMK चे नेते एम. थबी दुराई हे या लोकसभेचे उपाध्यक्ष होते. भाजपचे ओम बिर्ला 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष होते. पण या लोकसभेत उपाध्यक्षांची निवड करण्यात आली नव्हती आणि पूर्ण काळ हे पद रिक्त राहील होत.
Lok Sabha 2024: लोकसभा अध्यक्षांची निवड कशी होते?
संविधानाच्या कलम 93 मध्ये लोकसभा अध्यक्षांच्या निवडीचा उल्लेख आहे. या अंतर्गत लोकसभा अध्यक्षांच्या निवडीची तारीख राष्ट्रपतींना मंजूर केली आहे. यानंतर लोकसभा सचिवालय निवडणुकीची अधिसूचना जारी करते. राष्ट्रपती प्रोटेम स्पीकरची नियुक्ती करतील, जे संसदेच्या नवीन सदस्यांना शपथ देतील. लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीच्या एक दिवस आधी म्हणजे 25 जून रोजी, लोकसभेचा कोणताही सदस्य लोकसभेच्या अध्यक्षांच्या नावाचा प्रस्ताव सचिवांना उद्देशून लेखी स्वरूपात देऊ शकतो. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने केली जाते.
सभापति पदासाठी कोणतीही विशेष पात्रता विहित केलेली नाही आणि लोकसभेच्या कोणत्याही सदस्याला सभापति म्हणून निवडले जाऊ शकते. लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेडवरबाबत निर्णय झाल्यानंतर पंतप्रधान आणि संसदीय कामकाज मंत्री त्यांचे नाव सुचवतात, प्रस्ताव स्वीकारल्यानंतर, पीठासीन अधिकारी घोषित करतात की, प्रस्तावित सदस्यांची सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, नवनिर्वाचित सभापतींना पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते आसनावर घेऊन जातात. यानंतर सर्व सदस्याकडून सभापतीचे अभिनंदन केले जाते आणि प्रत्युत्तरात सभापती अभारचे भाषण करतात. त्यानंतर नवीन सभापती आपला कारीबर स्वीकारतात.
लोकसभा अध्यक्षांची काम काय असतात?
- कामकाज योग्य रीतीने चालेल यांची जबाबदारी लोकसभा अध्यक्षांची असते म्हणूनच हे पद अतिशय महत्त्वाच मानल जात. लोकसभा अध्यक्ष संसदीय बैठकीचा अजेंडा ठरवतात. सभागृहात वाद झाल्यास अध्यक्ष नियमानुसार कार्यवाही करतात.
- सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही बाजूंचे सदस्य असतात. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षांनी तटस्थ राहून कामकाज चालवणं अपेक्षित असतं. अध्यक्ष एखाद्या मुद्याविषयीचं स्वत:चं मत जाहीर करत नाहीत.
- एखाद्या प्रस्तावावरच्या मतदानात अध्यक्ष सहभागी होत नाहीत. पण जर प्रस्थावाच्या बाजूने आणि विरोधात सारखीच मत पडली टाय झाला, तर मात्र अध्यक्षांच मत निर्णायक ठरत.
- लोकसभेचे सभापति विविध समित्यांची स्थापना करतात आणि त्यांच्या सूचना मार्गदर्शनानुसार या समित्यांच काम होत. महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या सदस्याने सदनात अयोग्य वर्तन केल्यास त्यांना निलंबित करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे असतो.
- 2023 डिसेंबरमध्ये संसदेच्या हिवाळी सत्रादरम्यान लोकसभेतील घुसखोरीविषयी चर्चेची मागणी करण्याऱ्या एकुन 141 विरोधी पक्ष नेत्यांना गैरवर्तन केल्याबद्दल निलंबित करण्यात आल. यापैकी 95 जणांच लोकसभेतून तर 46 जणांच राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं होत. ही लोकशाही थट्टा असल्यासच म्हणत विरोधकांनी यांचा निषेध केला होता.
लोकसभेतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शपथ कशी दिली जाते?
Lok Sabha 2024 पंतप्रधानांनी मंजूरी दिल्यानंतर, संसदीय कामकाज मंत्र्यांकडून हंगामी अध्यक्ष आणि शपथविधी पार पडणाऱ्या इतर तीन जणाची सामान्यत फोनवरूनच संमती घेतली जाते. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री याबाबतची माहिती राष्ट्रपतींना देऊन त्यांची मंजूरी घेतात. तसेच टेक लोकसभेतील सदस्यांच्या शपथविधीची तारीख आणि वेळ निश्चित करतात. राष्ट्रपतिकडून मंजूरी मिळाल्यानंतर, संसदीय कामकाज मंत्री निवड झालेल्या हंगामी अध्यक्षाला आणि इतर तीन जणांना त्याबाबतची माहिती देतात. यानंतर राष्ट्रपती हंगामी अध्यक्षाला राष्ट्रपती भावणामध्ये शपथ देतात. राष्ट्रपतिकडून अधिकृतरीत्या नित्यक्त झालेल्या या हंगामी अध्यक्षांकडून इतर तीन सहाय्यक सदस्यांचा शपथविधी करून घेतला जातो.
यानंतर हंगामी अध्यक्ष इतर तीन सदस्यांच्या मदतीने सभागृहातील इतर सदस्यांचा शपथविधी पार पडतात. सामान्यत लोकसभेचे अधिवेशन सकाळी 11 वाजता सुरू होते. हंगामी अध्यक्षांच्या शपथविधी राष्ट्रपतीच्या सोयीनुसार सामान्यत सकाळी 9 वाजता पार पडला जातो.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!