Legends League Cricket 2024
Legends League Cricket 2024: या लिजेंडस लीग स्पर्धेचे तिसरे पर्व आहे. या पर्वाची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलावात प्रत्येक खेळाडूंसाठी लाखों रुपये मोजले गेले. या स्पर्धेसाठी एकूण सहा संघ सज्ज झाले असून 20 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 200 माजी खेळाडू सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेत एकूण 25 सामने होणार आहेत. या स्पर्धेत संघ हे साखळी फेरीत एकूण 10 सामने खेळणार आहे. म्हणजेच रॉबिन राऊंड पद्धतीने दोन वेळा आमने सामने येणार आहे. जागतिक क्रिकेट मधील अनेक दिग्गज माजी खेळाडू मैदानावर आपल्या खेळाने चाहत्यांची मने जिंकणार आहेत. लेजेंडस लीग क्रिकेट (LLC) च्या तिसऱ्या सत्रात पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहेत. मागील 2 हंगाम खूप यशस्वी झाल्यानंतर, असे अनेक माजी खेळाडू एलएलसीच्या आगामी हंगामात खेळताना दिसणार आहेत.
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन, याशिवाय दिनेश कार्तिकही पहिल्यांदाच एलएलसीमध्ये खेळताना दिसणार आहे. हा तिसरा सीझन जोधपुरमध्ये सुरू होणार आहेत. लिजेंडस लीग क्रिकेट 2024 चा पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, तर काही सामने 3 वाजता देखील खेळले जातील. या स्पर्धेत टॉप 4 संघ बाद फेरी आणि इलीमीनेटर स्पर्धेत खेळणार आहे. आयपीएलप्रमाणे टॉप दोन संघ फायनलसाठी खेळतील. विजयी संघ थेट अंतिम फेरीत जाईल. तर पराभूत संघ इलीमीनेटर स्पर्धेतील विजेत्याची वाट पहिल. इळीमिनेटर फेरीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघात लढत होईल. पहिल्या बाद फेरीत पराभूत झालेला संघ इलीमीनेटस स्पर्धेतील विजेत्या संघाशी खेळेल. यातून एका संघाची फायनलमध्ये वर्णी लागेल. ही स्पर्धा जोधपुर, सूरत, जम्मू, आणि श्रीनगर मध्ये होणार आहे. अंतिम फेरी 16 ऑक्टोबरला पार पडणार आहे.
इयान बेलकडे इंडिया कॅपिटल्स, शिखर धवनकडे गुजरात जायंट्स, इरफान पठाणकडे कोणार्क सूर्या ओडीशा, हरभजन सिंगकडे मणिपाल टायगर्स, दिनेश कार्तिककडे साऊथर्न सुपरस्टार्सची धुरा सोपवण्यात आली आहे. तर अर्बनरायझर्स हैदराबादची धुरा सुरेश रैनाच्या खांद्यावर असेल.
लिजेंडस लीग स्पर्धेतील सहा संघ
संघ | संघाचे नेतृत्व | संघातील खेळाडू |
---|---|---|
इंडिया कॅपिटल स्क्वाड | इयान बेल | इयान बेल, ड्वेन स्मिथ, एष्ले नर्स, धवल कुलकर्णी, ध्रुव रावल, बरिंदर सरां, रवी बोपारा, परविंदर अवाना, नमन ओझाक, क्रिस्टोफर मोफू, इकबाल अब्दुल्लाह, किर्क एडवर्क्स, पंकज सिंह, पवन सुयाल, राहुल शर्मा गणेश्वरा राव, फइज फजल, कॉलीन डी ग्रान्डहोम, भारत चीप्ली, बेन डंक |
गुजरात जायंट्स | शिखर धवन | ख्रिस गेल, लियाम प्लेकेट, मोर्ने वान वीक, लँडल सिमंस, असोहर अफोहन, जेरोम टेलर, पारस खाडा, सिकूगे प्रसन्ना, कमाऊ लेवररॉक, सायब्रॅंड एनोएलब्रेक्ट, शॅनन गॅब्रीयल, समर क्वाड्रि, मोहम्मद कैफ, श्रीसंत अनि शिखर धवन |
कोणार्क सूर्या ओडीशा | इरफान पठाण | इरफान पठाण, यूसुफ पठाण, केविन ओ ब्रायन, रॉस टेलर, विनय कुमार, रिचर्ड लेवी, दिलशान मुनाविरा, शाहबाज नदीम, फिदेल एडवर्डस, बेन लॉफलीन, राजेश बिश्नोई, प्रवीण तांबे, दिवेश पठानीया, केपी आपन्ना, अंबाती रायडू आणि नवीन स्टिवर्ट. |
मणिपाल टायगर्स | हरभजन सिंग | हरभजन सिंह, रॉबिन उथप्पा, थिसारा परेरा, शेल्डन कॉटरेल, डॅन ख्रिश्चयन, अँजेलो परेरा, मनोज तिवारी, असेला गुणरत्ने, सोलोमन मायर, अनुरीत सिंह, अबू नेचीम, अमित वर्मा, इमरान खान, राहुल शूक्ला, अमीतोज सिंह, प्रवीण गुप्ता आणि सौरभ तिवारी. |
साऊथर्न सुपरस्टार्स | दिनेश कार्तिक | दिनेश कार्तिक, एल्टर चिंगूबुरा, हॅमील्टन मसाकाद्जा, पवन नेगी, जीवन मेंडिस, सुरंगा लकमल, श्रीवत्स गोस्वामी, हमीद हसन, नाथन कुल्टर नाईल, चिराग गांधी, सुबोध भाटी, रॉबिन बीष्ट, जेसल कारी, चतुरंगा डी सिल्वा आणि मोनू कुमार. |
अर्बनरायझर्स हैदराबाद | सुरेश रैना | सुरेश रैना, गुरकिरत सिंह, पिटर ट्रेग्रो, समीरउल्लाह शिनवारी, जॉर्ज वर्कर, इसुरू उदाना, रिक्कि क्लार्क, स्टूअर्ट बिन्नी, जसकरण मल्होत्रा, चैडविक वाल्टन, बिपुल शर्मा, नुवान प्रदीप आणि योगेश नागर. |
लेजेंडस लीग क्रिकेट स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक
या स्पर्धेत टॉप 4 संघ बाद फेरी आणि इलीमीनेटर स्पर्धेत खेळणार आहे. आयपीएलप्रमाणे टॉप दोन संघ फायनलसाठी खेळतील. विजयी संघ थेट अंतिम फेरीत जाईल. तर पराभूत संघ इलीमीनेटर स्पर्धेतील विजेत्याची वाट पहिल. इळीमिनेटर फेरीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघात लढत होईल. पहिल्या बाद फेरीत पराभूत झालेला संघ इलीमीनेटस स्पर्धेतील विजेत्या संघाशी खेळेल.
जोधपुर
तारीख | सामने |
---|---|
20 सप्टेंबर 2024 | कोणार्क सूर्या ओडीशा विरुद्ध मणिपाल टायगर्स |
21 सप्टेंबर 2024 | इंडिया कॅपिटल विरुद्ध अर्बनरायझर्स हैदराबाद |
22 सप्टेंबर 2024 | मणिपाल टायगर्स विरुद्ध गुजरात जायंट्स |
23 सप्टेंबर 2024 | साऊथर्न सुपरस्टार्स विरुद्ध गुजरात जायंट्स |
25 सप्टेंबर 2024 | अर्बनरायझर्स हैदराबाद विरुद्ध साऊथर्न सुपरस्टार्स |
26 सप्टेंबर 2024 | साऊथर्न सुपरस्टार्स विरुद्ध गुजरात जायंट्स |
सूरत
27 सप्टेंबर 2024 | कोणार्क सूर्या ओडीशा विरुद्ध मणिपाल टायगर्स |
28 सप्टेंबर 2024 | अर्बनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात जायंट्स |
29 सप्टेंबर 2024 | इंडिया कॅपिटल विरुद्ध कोणार्क सूर्या ओडीशा |
30 सप्टेंबर 2024 | इंडिया कॅपिटल विरुद्ध मणिपाल टायगर्स |
1 ऑक्टोबर 2024 | मणिपाल टायगर्स विरुद्ध साऊथर्न सुपरस्टार्स |
2 ऑक्टोबर 2024 | कोणार्क सूर्या ओडीशा विरुद्ध साऊथर्न सुपरस्टार्स |
जम्मू
3 ऑक्टोबर 2024 | मणिपाल टायगर्स विरुद्ध अर्बनरायझर्स हैदराबाद |
4 ऑक्टोबर 2024 | इंडिया कॅपिटल विरुद्ध कोणार्क सूर्या ओडीशा |
5 ऑक्टोबर 2024 | अर्बनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात जायंट्स |
6 ऑक्टोबर 2024 | इंडिया कॅपिटल विरुद्ध साऊथर्न सुपरस्टार्स |
6 ऑक्टोबर 2024 | कोणार्क सूर्या ओडीशा विरुद्ध अर्बनरायझर्स हैदराबाद |
7 ऑक्टोबर 2024 | इंडिया कॅपिटल विरुद्ध गुजरात जायंट्स |
श्रीनगर
9 ऑक्टोबर 2024 | अर्बनरायझर्स हैदराबाद विरुद्ध साऊथर्न सुपरस्टार्स |
10 ऑक्टोबर 2024 | इंडिया कॅपिटल विरुद्ध मणिपाल टायगर्स |
11 ऑक्टोबर 2024 | कोणार्क सूर्या ओडीशा विरुद्ध गुजरात जायंट्स |
12 ऑक्टोबर 2024 | क्वालिफायर (पोझिशन 1 वि पोझिशन 2) |
13 ऑक्टोबर 2024 | क्वालिफायर (पोझिशन 3 वि पोझिशन 4) |
14 ऑक्टोबर 2024 | उपांत्य फेरी (पराजय क्वालिफायर वि विजेता एलिमिनेटर) |
16 ऑक्टोबर 2024 | अंतिम (विजेता क्वालिफायर विरुद्ध विजेता उपांत्य फेरी) |
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!