Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई हा कोण आहे? त्याला तुरुंगात हाय सिक्युरिटी सेलमध्ये का ठेवतात?

Lawrence Bishnoi

Lawrence Bishnoi: मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या भूमिकेची चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. त्या पाश्वभूमीवर ही बातमी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गुजरातमधील अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात बंद असलेल्या या कैद्याचं नव सध्या राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही चर्चेचा विषय झाला आहे. भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंधही ताणले गेले आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी एका निवेदनात हरदीय निज्जर यांच्या हत्येमागे भारतीय अधिकारी असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कॅनडा पोलिसांनी भारताने गुप्तहेर आणि लॉरेन्स बिश्नोई एकत्रित काम करतात असा आरोप केला आहे.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर यावर्षी एप्रिल महिन्यात गोळीबार झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 1735 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपत्रात अनेक ठिकाणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा उल्लेख आहे. सलमान खानशी निगडीत असल्याने या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाची चर्चा होते असंही नाही. कारण त्याची आधीपासून गुन्हेगारी क्षेत्रात पाश्वभूमी आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणाचा मुंबई पोलिस तपास करत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची कोठडी मिळवणे मुंबई पोलिसांसाठी आव्हान बनले आहे.

Lawrence Bishnoi
Lawrence Bishnoi

गुन्हेगारी विश्वाशी संबंधित पोलिस अधिकारी आणि याबाबत बातम्या करणाऱ्या काही पत्रकारांच्या मते, बिश्नोई हा सलमान खानसारख्या हायप्रोफाइल लोकांना धमक्या देऊन स्वत:च्या नावाची दहशत वाढवण्याची शक्कल लढवतो. अनेक दिवसांपासून गुजरातच्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई बाबत काही बातमी आलेली नव्हती, पण तेवढ्यात सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली.

Lawrence Bishnoi: लॉरेन्स यांच गुन्हेगारी विश्वात पाऊल व पोलिसांनी त्याला ठोकलेल्या बेड्या

ज्यावर्षी लॉरेन्स (Lawrence Bishnoi) नी आपल्या कॉलेज मध्ये विदहयार्थी संघटना स्थापन केली, त्या वर्षी त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. 2011-12 मध्ये विद्यार्थीदशेच्या अंतिम टप्प्यात त्याच्यावर दाखल झालेला पहिलाच गुन्हा खुनाचा प्रयत्न केल्याचा होता. विद्यार्थी निवडणुकीत त्याचा पराभव झाल्याच्या रागातून लॉरेन्सच्या सहकाऱ्याने प्रतिस्पर्धी विद्यार्थी नेत्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्या घटनेने लॉरेन्स बिश्नोईचे नाव पहिल्यांदा पोलिसांच्या रेकॉर्डवर आले. बिश्नोईला 2014 साली पहिल्यांदा राजस्थान येथे अटक करून भरतपूर तुरंगात ठेवण्यात आलं. त्याच्यावरील खटल्याच्या सुनावणीसाठी त्याला पंजाबच्या मोहाली येथे आणलं जात असताना तो पोलिसांच्या तावडीतून निसटला आणि फरार झालाव त्या नंतर तो अंडरग्राऊंड झाला.

Lawrence Bishnoi: गुजरात, साबरमती जेल

त्यानंतर त्याला 2016 साली त्याला पुन्हा पोलिसांनी ट्रप लावून अटक करण्यात आले. 2021 साली गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्डशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठीच्या मकोका कायद्यातर्गत एका प्रकरणात सुरक्षेच्या कारणास्तव त्याला तिहार तुरुंगात हलविण्यात आले. तिहारला आणण्यापूर्वी तो पंजाबच्या बठिंडा तुरुंगात कैद होता. दरम्यान 2022 साली पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात त्याला पंजाब पोलिसांकडून तुरुंगातूनच ताब्यात घेण्यात आले. 2022 सालीच गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्याला अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोषी ठरवलं. हे प्रकरण कच्छमधून पाकिस्तानी ड्रग्सची मोठी तस्करी करण्याशी संबंधित होते. पोलिसांना या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचा संशय होता.

या प्रकरणी गुजरात पोलिसांकडून त्याला दिल्लीच्या तुरुंगातून काढून 23 ऑगस्ट 2023 रोजी गुजरातच्या साबरमती तुरुंगात नेण्यात आलं. तेव्हापासून तो साबरमती तुरुंगातच आहेत. विशेष म्हणजे याच दरम्यान 30 ऑगस्ट 2023 रोजी त्याच्याविरुद्ध केंद्रीय गृहमंत्रालयाने सीआरपीसीचे कलम 266 (1) नोंदवले जेणेकरून त्याला पुढील एका वर्ष साबरमती तुरुंगातून बाहेर नेता येणार नाही. त्यामुळे त्याच्यावर इतर राज्यात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलं जातं. सामन्यात गुन्हेगार अपराध केल्यानंतर पोलिसांपासून लपवण्याचे प्रयत्न करतात. मात्र लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गंग कोणत्याही मोठ्या गुन्हेगारी कृतींची जबाबदारी स्वत: घेतात. देशातील विविध राज्यातील बहुचर्चित गुन्हेगारी घटनपैकी सिद्धू मुसेवाला आणि गतवर्षीच्या जयपूर येथी; करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी त्याचे नाव चर्चेत होते.

Lawrence Bishnoi

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!