Landslides in Wayanad
Landslides in Wayanad: देशात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस कोसळत असतानाच भूस्खलन झालंय. चहूबाजूला सर्वत्र विनाश, उद्धवस्त झाल्याचा खुणा दिसत आहेत. मदतीसाठी सैन्याला बोलवाव लागलंय. त्यावरून नुकसान कीती मोठ्या याची कल्पना येते. फायर फोर्स आणि NDRF च्या टिम्सना प्रभावित क्षेत्रात तैनात केल्याची माहीत आहे.
केरळच्या वायनाडमध्ये (Landslides in Wayanad) ‘माळीण’ ची पुनरावृत्ती झाली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 296 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 100 हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळतंय. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी आणि वाचवण्यासाठी बचावकार्य राबावलं जात आहे. बचाव कार्यात अग्निशमन दल, NDRF आणि स्थानिक आपत्कालीन प्रतिसाद दलाचे जवळपास 250 जवान सहभागी आहेत. NDRF ची अतिरिक्त टीम तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना आल्या आहेत.
या बचावकार्यादरम्यान जवळपास 1000 लोकांना वाचवण्यात आलंय. तसंच, किमान 200 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. सध्या दरडीखाली अडकलेल्या लोकांचा एकूण आकडा सांगता येणं शक्य नाही. दुर्घटनाग्रस्त भागात चहाचे मळे असून दरड कोसळल्याने त्या भागात हेलिकॉप्टर ही उतरण्यास अडचणी येत आहेत. दुर्घटनाग्रस्त भागातील एका चहाच्या मळ्यात सुमारे 150 कुटुंबे राहत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
अग्निशामन दल, NDRF, कन्नूर डीफेन्स कॉप्स आणि नौदलाचे हेलिकॉप्टरर्स बचावकार्य करत आहेत. या दुर्घटणस्थळी असलेला पूल कोसळल्याने आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्य काहीसे अडथळे येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळली. यानंतर पहाटे 4.10 च्या सुमारास आणखी एक दरड कोसळली. मातीच्या ढीगऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर कडण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरड कोसळलेल्या भागात पोहोचण्यासाठी सुरक्षा दलाला एक तात्पुरता पूल तयार करण्यास सांगण्यात आलंय. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुख्यमंत्री कार्यालयानं ही माहिती दिलीय. चुराललमाला ते मुंदाक्काई आणि अट्टामाला भागाला जोडणार पुलही कोसळल्यानं बचावकार्याच्या मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत.
केरळचे वनमंत्री एके ससिंदरन यांनी सांगितले की, दरडीखाली कीती लोक अडकले आहेत, याची नेमकी आकडेवारी सांगणं फार कठीण आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वायनाड येथी घटनेनंतर बचावकार्य वेगाने सुरू असल्याची माहिती दिली. या दुर्घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणेनं बचावकार्य सुरू केल्याचं त्यांनी सांगितले.
केरळच्या वायनाडमधील मेप्पाडी पंचायतीत (Landslides in Wayanad) भूस्खलनामुळे मोठ नुकसान झालंय, असं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलंय. शेकडो लोक अडकले असण्याची भीती आहे. सैन्याच्या चार तुकड्या घटनास्थळी आहेत. 122 इन्फॅट्री बटलीयनच्या (प्रादेशिक सेना) दोन तुकड्या आणि कन्नूर डीएससी सेंटरच्या दोन तुकड्या यामध्ये आहेत. वैधिरी, कलपट्टा, मेप्पाडी आणि मनंतवडी रुग्णालयाला अलर्टवर ठेवल आहे. वायनाड येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणखी टिम्स तैनात करण्यात येतील.
तर कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी वायनाडच्या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलं. प्रियंका गांधी म्हणाल्या, ” या घटनेत आपल्या प्रियजणांना गमावलेल्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. प्रत्येकजण सुखरूप बाहेर यावं यासाठी मी प्रार्थना करत आहे. सरकारने त्वरित मदत आणि जलद बचावकार्यासाठीचे प्रयत्न करावेत. तसंच UDF च्या कार्यकर्त्यांना विनंती करते की, त्यांनी या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्व लोकांना मदत आणि सांत्वन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, अशी विनंती करते”
तसंच मदतकार्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीची माहिती द्यावी, मी त्यांना वायनाडला शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलंय, अशी ही माहिती राहुल गांधींनी दिली.
Landslides in Wayanad: राष्ट्रीय आरोग्य मिशनने एक कंट्रोल रूम स्थापित
सीएमओनुसार राष्ट्रीय आरोग्य मिशनने एक कंट्रोल रूम स्थापित केला आहे. मदतीसाठी 9656938689, 8086010833 हे मोबाइल क्रमांक जारी करण्यात आले आहेत. तसेच हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर तमिळनाडूच्या सुलूर तळावरून वायनाडला मदतीसाठी रवाना करण्यात आली आहे.
मदतीसाठी केरळ सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केले ते पुढील प्रमाणे:
04936 2044151 | 9562804151 8078409770 |
04936 223355 -220296 | 6238461385 |
04935 241111 -240231 | 9446637748 |
04936 256100 | 8590842965 9447097705 |
केरळच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती घेतली असून मंत्र्यांना घटनास्थळाचा दौरा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सरकारी यंत्रणांना बचावकार्याची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्याने थामरसेरी घाटातून अनावश्यक वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसेच या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये व मदत लवकर पोहोचावी यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.
Landslides in Wayanad: पीएम मोदींनी मदत जाहीर केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटलंय की, “वायनाडच्या काही भागात भूस्खलन झाल्याच ऐकुन मी व्यथित आहे. जयणी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलय, त्याच्यासोबत माझ्या सर्व संवेदना आहेत. जखमींसाठी मी प्रार्थना करतो. प्रभावित लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन यांच्याशी मी बोललो. केंद्र सरकार सर्व सहकार्य करेल” भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना पीएम मोदी यांनी 2 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येईल.
Landslides in Wayanad: वायनाडमध्ये यापूर्वी ही घडल्यात भूस्खलनाच्या घटना
वायनाड (Landslides in Wayanad) हा केरळचा डोंगराळ भाग असून येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. कोळीकोड विमानतळ ते वायनाड हे अंतर सुमारे 86 किलोमीटर आहे. वायनाड हे कर्नाटकातील कोडागू आणि म्हैसूर जिल्ह्याच्या उत्तरेस आणि तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्याच्या उत्तर-पूर्वेस आहे. वायनाडमध्ये यापूर्वीही अनेक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
राजकीय दृष्ट्याही वायनाड जिल्ह्याला महत्व आहे. कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 2019 आणि 2024 असे सलग दोनवेळा वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र 2024 म्हणजे विद्यमान लोकसभेत ते उत्तर प्रदेशातील रायबेरेली मधूनही जिंकल्यानं त्यांनी वायनाड मतदारसंघ सोडला आणि तिथून कॉँग्रेसनं प्रियंका गांधी यांना उमेदवारी जाहीर केलीय.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!