Laapataa Ladies Oscar 2025
Laapataa Ladies Oscar 2025: 97 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ह्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला आहे. याला फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने दुजोरा दिला आहे. दिग्दर्शक किरण रावचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट यावर्षी मार्च मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तो समीक्षकांना तसेच लोकांना प्रभावित झाला. फनी कॉमेडीसह समाजातील महिलांच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत ठरलेला चित्रपट आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मिडियावर सांगितले की, भारतानं यंदाच्या ऑस्करसाठी ‘लापता लेडीज’ हाच चित्रपट ऑस्करसाठी पाठवावा. प्रेक्षकांची ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
अनेकजण किरण राव यांच अभिनंदन करत आहेत. किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. इतर उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह प्रतिष्ठित सन्मान मिळविण्यासाठी हा चित्रपट भारताकडून प्रयत्न करताना दिसेल. भारतात आधीच धुमाकूळ घालणारा हा चित्रपट आता ऑस्करकडे वळला आहे. 2024 – 25 ऑस्करसाठी ‘लापता लेडीज’ नं प्रवेश केल्या नंतर आता किरण रावही आनंदी असल्याचं दिसत आहे. यापूर्वी देखील अमीर खानचा ‘लगान’ देखील ऑस्करसाठी भारताकडून पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावेळी भारताला ऑस्करनं हुलकावणी दिलं होती. दुसऱ्यांदा आमीर खान निर्माता असलेला चित्रपट ऑस्करसाठी जाणार आहे.
वृत्तसंस्था पिटीआयच्या भारतीय फिल्म फेडरेशनने सोमवारी जाहीर केले की ऑस्कर 2025 (Laapataa Ladies Oscar 2025) साठी भारताकडून ‘लापता लेडीज’ अधिकृतरित्या पाठवला जाणार आहे. रणबीर कपूरचा ॲनिमल, मल्याळम चित्रपट ‘अट्टम’ आणि पायल कपाडियाचा ‘ऑल वी इमॅजीन अँड लाइट’ यासह 29 चित्रपटांच्या यादीतून ‘लापता लेडीज’ ची निवड करण्यात आली आहे. आसामी दिग्दर्शक जाहू बरुआ यांच्या अध्यक्ष तेखालील 13 सदस्यीय निवड समितीने एकमताने आमीर खान आणि राव यांनी निर्मित ‘लापता लेडीज’ चा अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय घेतला. महाराजा, कल्की 2898 एडी, हनुमान, स्वातंत्र्य वीर सावकार आणि आर्टिकल 370 या तमिळ चित्रपटांचाही या यादीत समावेश होता. मात्र यामध्ये लापता लेडीज ने बाजी मारली.

लापता लेडीज हा चित्रपट दोन भारतीय नववधूच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा हृदयाला भिडणारी आहे. अमीर खान प्रोडक्शन आणि किरण सवच्या किंडलिंग प्रोडक्शनच्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट याच वर्षी मार्चमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, छाया कदम, स्पर्श श्रीवास्तव आणि अभय दुबे या कलाकारांचा समावेश आहे. त्यात अभिनेता रवी किशन पोलीसाच्या भूमिकेत दिसला होता. महिला सक्षमी करणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करणारा हा चित्रपट आहे.
Laapataa Ladies Oscar 2025: 29 चित्रपटाच्या शर्यतीत ‘लापता लेडीज’ ची निवड
पिटीआय दिलेल्या वृत्तानुसार, ‘लापता लेडीज’ या वर्षीच्या स्लिपर हिटपैकी एक ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री असेल. भारतीय फिल्म फेडरेशनच्या समितीनं 29 चित्रपटांच्या यादीतून ‘लापता लेडीज’ ची ऑस्कर 2025 साठी अधिकृत एंट्री म्हणून निवड केली आहे. समितीसमोर सादर झालेल्या 29 चित्रपटांच्या यादीत ‘ॲनिमल’ आणि अट्टम’ या चित्रपटांचाही समावेश होता. दरम्यान, ‘लापता लेडीज’ चं पहिलं स्क्रीनिंग गेल्या वर्षी टोरंटो फिल्म फेस्टिव्हल मध्ये झालं होतं, जिथे त्याला प्रचंड प्रशंसा मिळाली. किरण रावचा हा चित्रपट मार्च 2024 मध्ये लिमिटेड स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांची उत्तम दाद मिळाली. 5 कोटींपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं जगभरात 25 कोटींहून अधिक कमी केली आहे.

या उत्कृष्ट चित्रपटासाठी अभिनेते नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांचही खूप कौतुक करण्यात आलं आहे. महिलांवरील संवेदनशील विषयावर उत्कृष्ट चित्रपट बनवल्याबद्दल किरण राव यांच्या दिग्दर्शनाचंही खूप कौतुक झालं होतं.
Laapataa Ladies Oscar 2025: संपूर्ण टीम ने आनंद साजरा केला
आपला आनंद व्यक्त करताना ज्योती देशपांडे, प्रेसिडेंट, मिडिया आणि कंटेंट बिझनेस, RIL, म्हणाल्या, ऑस्करवाडी लापता लेडीजची निवड ही मेक इंन इंडियाचे प्रदर्शन करण्याची एक उत्तम संधी आहे. या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांकडून आधीच खूप प्रेम मिळाले आहे. OTT वर जगभरात सर्वाधिक पहिल्या गेलेल्या चित्रपटांपैकी तो एक आहे. जिओ स्टुडियो जागतिक स्तरावर भारताला अभिमान वाटावा सर्वतोपटी प्रयत्न करेल आणि या सन्मान आणि विशेषाधिकारासाठी मी भारतीय फिल्म फेडरेशनचे आभार मानते. अमीर खान-आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ (2001) हा शॉर्टलिस्ट होणारा शेवटचा भारतीय फीचर चित्रपट होता, जो 74 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘नॉ मॅन्स लँड’ मुले पराभूत झाला. नेटफ्लीक्सवर जिओ स्टुडिओचे ‘लापता लेडीज’ हा सिनेमा पाहता येईल.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, किरण राव दिग्दर्शित ‘मीसिंग लेडीज’ ही ऑस्कर 2025 साठी भारताची अधिकृत एंट्री आहे. अमीर खान आणि किरण राव यांनी सह निर्मिती असलेला हा सिनेमा त्याच्या अनोख्या कथेमुळे प्रेक्षक आणि समीक्षकांच्या मनात घर करून गेला. सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.
किरण राव काय म्हणाली?

किरण आनंद व्यक्त करत म्हणाली, आमचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेला याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमामुळे आज हे यश आम्हाला मिळालं आहे. मला आशा आहे की, हा चित्रपट भारताप्रमाणेच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.
Laapataa Ladies Oscar 2025: बॉलीवूडसाठी 2023 हे उत्तम वर्ष होते
गेल्या वर्षी जुद अँथनी जोसेफच्या 2018 या सिनेमाचे 96 व्या अकादमी पुरस्कारांच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान हुकले होते. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नातू नातू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने 95 व्या वर्षी भारताची मान अभिमानाने उंचावली होती. कार्तिकी गोन्साल्वीस आणि गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हीस्पर्स’ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. शौनक सेनच्या ‘ऑल दॅट ब्रीदस’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म्सचा पुरस्कारही मिळाला होता.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!