संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय करवा चौथ व्रत, या व्रताला विशेष महत्व! जाणून घ्या, महूर्त आणि महत्व

Karwa Chauth 2024

Karwa Chauth 2024: धर्मसिंधु, निर्णयसिंधु आणि व्रतराज या प्राचीन हिंदू ग्रंथामध्ये करवा चौथला करक चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपती आणि करवा मातेची पूजा केली जाते. करवा चौथ, अखंड सौभाग्यासाठी व्रत, आश्विन-कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी करतात. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या व्रताचे पालन करतात. या दिवशी निर्जल व्रत केले जाते. आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्र दर्शन घेत पतीच्या हाताने पाणी पिऊन हे व्रत सोडला जातो. पंचांगानुसार, यंदा 20 ऑक्टोबर रोजी करवा चौथ व्रत (Karwa Chauth 2024) आहे. या व्रताला विशेष महत्व आहे. कारण या दिवशी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची संकष्टी चतुर्थी देखील जुळून येत आहे. त्यामुळे या व्रताचे महत्व अनेक पटीने वाढले आहे.

अशा वेळी त्यांना या व्रताबद्दल माहिती असावं. शिवाय आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत कोणतीही महिला करू शकतात. तर तुम्हीही यंदा करवा चौथ करायला ठरवलं असेल तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणूनघ्या. करवा चौथ व्रत कार्तिक कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा करण्यात येत. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. हे व्रत सूर्योदयापासून रात्री चंद्रोदयापर्यंत पाळलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावर विधिवत पूजा करण्यात येते. नंतर रात्री चंद्र पाहून उपवास सोडला जातो.

Karwa Chauth 2024
Karwa Chauth 2024

Karwa Chauth 2024: करवा चौथ तिथी आणि मुहूर्त

करवा चौथ रविवार, 20 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. करवा चौथ पूजा मुहूर्त कालावधी संध्याकाळी 5 वाजून 46 मिनिटे ते 7 वाजून 3 मिनिटापर्यंत आहे. करवा चौथ पूजेचा एकुन कालावधी 1 तास 16 मिनिटे आहे. करवा चौथच्या दिवशी संध्याकाळी 7.53 वाजता चंद्रोदय होतो. रविवारी 20 ऑक्टोबर रोजी कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला चंद्र उगवण्याची वेल रात्री 7 वाजून 5 मिनिटे ते 8 वाजून 48 मिनीतापर्यंत असेल. राहुकाळ आणि भद्राची वेल सोडून व्रताची पूजा करतात. करवा चौथच्या दिवशी भद्रा सकाळी 6.24 ते 6.46 पर्यंत असते. करवा चौथ व्रत भद्राकाळ सुरू होण्यापूर्वी सुरू होईल. अशा स्थितीत उपवास करणाऱ्यानी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. सरगी घ्यावी व व्रतांचा संकल्प करावा.

करवा चौथच्या दिवशी स्त्रीया सकाळी स्नान करून पूजा करतात आणि त्यानंतर दिवसभर अन्नपाण्याशिवाय उपवास करतात. महिला दिवसभर निर्जळी उपवास करतात. यानंतर संध्याकाळी टी कथा ऐकते आणि करवाची पूजा करते. याशिवाय चंद्रोदयनंतर चंद्राला अघ्र्य अर्पण केल्यानंतर प्रथम चाळणीतून चंद्राकडे आणि नंतर नवऱ्याला बघतात आणि त्यानंतर स्त्रीया हा व्रत मोडतात.

करवा चौथ पूजा विधी

करवा चौथ व्रताची सुरुवात सकाळी सर्गीने केली जाते. सर्गीमध्ये सासू सुनेला पौष्टिक पदार्थसह सौभाग्यचं लेण देते. यानंतर महिलांनी देवाची पूजा करून निर्जला व्रताची शपथ घ्यायची असते. संध्याकाळी मातीच्या वेदिवर सर्व देवी देवतांची प्रतिष्ठापना केली जाते. यानंतर उदबत्ती, दिवा, चंदन, रोळी, कुंकू, तूप इत्यादी वस्तु ताटात ठेवाव्या लागतात. ही पूजा चंद्रोदयापूर्वी करण्यात येते. यादरम्यान करवा चौथची कथही ऐकली जाते. यानंतर महिला रात्री चंद्राला अर्ध्य देतात. मग टी पतीच्या हातचे पाणी पिऊन उपवस सोडतात.

Karwa Chauth 2024
  • या दिवशी ब्रम्ह महूर्तावर उठून स्नान करून, त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करत देवघरात स्वच्छता करा.
  • त्यांतर देवी देवतांची पूजा करत करवा चौथ व्रतचा संकल्प करा.
  • सायंकाळी करवा चौथची पूजा करत व्रतकथा पठन करा. नंतर चंद्राची पूजा करा.
  • चंद्र दर्शनानंतर चंद्राला अघ्र्य अर्पण करा.
  • त्यानंतर चाळणीतून पतीचे दर्शन घेतयानंतर आरती करावी आणि पतीच्या हातून पाणी पिऊन व्रताचे पारण करा.
  • हे व्रत सूर्योदयापासून रात्री चंद्रोदयापर्यंत पाळलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावर विधिवत पूजा करण्यात येते. नंतर रात्री चंद्र पाहून उपवास सोडला जातो.

(टीप: वरील सर्व बाबी MH टाइम्स 24 केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MH टाइम्स 24कोणताही दावा करत नाही.)

विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचा सण, पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना

करवा चौथ हा एक सण आहे, जो प्रामुख्याने विवाहित स्त्रीया साजरा करतात. या उत्सवात सकाळपासून चंद्र उगवेपर्यंत उपवास करण्याची परंपरा आहे. यंदा करवा चौथचा उपवास 20 ऑक्टोबरला होणार आहे. हे व्रत निर्जल आहे. त्यामुळे महिला पाणीही पीत नाहीत. ज्यामुळे कोणीही दीर्घकाळ अन्न किंवा पाण्याशिवाय आजारी पडू शकतो. भारतीय मान्यतेनुसार हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवले जाते. त्यामुळे मध्यभागी तोडणे देखील अशुभ मानले जाते. करवा चौथच्या काही खास हायड्रेशन टिप्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही करवा चौथचे व्रत सहज पाळू शकाल.

Karwa Chauth 2024: उपवास करण्यापूर्वी हायड्र्रेशनसाठी हे करा

नारळ पाणी- उपवास सुरू करण्यापूर्वी नारळ पाणी प्या. हे एक नैसर्गिक इलेक्टरोलाइट आहे जे दिवसभर शरीरात हायड्र्रेशन रखण्यास मदत करते.

लिंबू पाणी- घरगुती इलेक्टरोलाइट पे बनवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे लिंबू पाणी. यासाठी पाण्यात लिंबू पिळून त्यात चिमूटभर मीठ आणि साखर टाकून प्या. यामुळे हायड्र्रेशन वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

हर्बल टी- कॅमोमाइल किंवा पुदिन्याचा चहा शरीराला हायड्र्रेशन करू शकतो आणि पचनसंस्थेलाही फायदा होतो. त्यामुळे हे नैसर्गिक चहा प्यायला सुरुवात करा.

Karwa Chauth 2024

हे खा

फळे खा- सरगीमध्ये संत्री, काकडी आणि खरबूज यांसारखी पाणचट फळे खा. ही फळे हळूहळू हायड्र्रेशन सोडतात, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर हायड्र्रेशन राहते.

दही- तुम्ही दही खाऊ शकता तर ते केवळ हायड्र्रेशन करत नाही तर आतडेही नोरोगी ठेवते.

ओट्स- ओट्स पाणी शोषून घेतात आणि दूध किंवा दह्या सोबत खाल्ल्यास हायड्र्रेशन देऊ शकतात. त्यामुळे सारगीमध्ये ओट्सचा समावेश करू शकता.

फ्रूट इंफ्यूज्ड वॉटर- उपवास करण्यापूर्वी हायड्रेशन आणि व्हीटॅमीनसाठी काकडी, संत्री किंवा पुदिन्याची पणे यांसारखी फळे मिसळळेळे डीटॉक्स पेय तयार करा आणि प्या.

आत्तापासून या गोष्टीचे सेवन सुरू केल्यास करवा चौथ व्रताच्या दिवशी फारशी तहान लागणार नाही.

Karwa Chauth 2024: या गोष्टी खाणे टाळा

मिठाचे सेवन कमी करा- तुमच्या सारगीमध्ये जास्त खारट आणि मसालेदार अन्न खाणे टाळा, कारण ते तुम्हाला ठाण आणि निर्जलीकरण करू शकते.

कॉफी- उपवास करण्यापूर्वी चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करा, कर्ण यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होते, ज्यामुळे शरीरातील डीहायड्रेशन वाढते.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!