मालगाडी आणि एक्सप्रेस रेल्वेची धडक, भीषण अपघात 15 जणांचा मृत्यू, असा झाला अपघात

Kanchenjunga Express Accident

Kanchenjunga Express Accident: पश्चिम बंगालमध्ये कांचनजगा एक्सप्रेस मालगाडीला धडकून मोठा अपघात झाला आहे. या अपघातातिल मृतांचा आकडा 15 वर पोहचला आहे. तर 46 जण जखमी झाले आहेत. सोमवारी (17 जून) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कांचनजगा एक्सप्रेस आसामच्या गुहाटीवरून पश्चिम बंगालच्या सियालदहला जात होती. या अपघातामुले 8 रेल्वे रद्द झाल्या आहेत. तर 24 रेल्वेचे मार्ग बदलण्यास आले आहेत.

न्यू जलपैगुडी जवळ ही गाडी उभी होती. तेव्हा मालगाडी येऊन धडकली. कांचनजगा एक्स्प्रेसचे तीन डबे आपघातामुळे रुळावरून घसरले. दार्जिलिंगचे अतिरिक्त पोलिस आधीक्षक अभिषेक रॉय यांनी माध्यमांना सांगितले की कांचनजगा एक्सप्रेस उभी होती आणि पाठीमागून आलेल्या मालगाडीने टक्कर दिली. त्यामुळे तीन डब्बे पत्रीवरून उतरले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आम्ही त्यांना बाहेर काढले आहे आणि रुग्णालयात दाखल केले आहे.

Kanchenjunga Express Accident
Kanchenjunga Express Accident

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये मालगाडीने कांचनजगा एक्स्प्रेसला जोरदार धडक दिली. अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच 60 प्रवासी जखमी झाले आहेत. जलपाईगुडी परिसरामध्ये हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कांचनजुंगा एक्सप्रेस सियालदाहच्या दिशेने प्रवास करत होती या घटनेशी संबंधित काही फोटो देखील सोशल मिडियावर व्हेरल झाले आहेत. हा अपघात कीती भीषण होता, हे फोटोच्या माध्यमातून समजते. धडकेमुळे ट्रेनचे डबे एकावर एक चढले आहेत. आगरतलावरून निघालेल्या कांचनजुंगा एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डब्यांना मालगाडीची धडक बसली.

कटीहार विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापन (डीआरएम) म्हणाले की, 13174 कांचनजंगा एक्सप्रेस आगरतळावून सियालदहकडे जात असताना ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, विभागीय पथक आणि 15 रुग्णवाहिका तातडीने घटणास्तळीदाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. दुर्घटनेमध्ये एकुन 15 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

Kanchenjunga Express Accident: रेल्वेमंत्री घटनास्थळी पोहचले-

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी तातडीने पश्चिम बंगाल जलपाईगुडी स्टेशनजवळ रंगापानी येथे घटनास्थळावर भेट डेट पाहणी केली. मोठी वाहने जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने आपघातस्थळी जाण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना मोटरसायकलने जावे लागेल. ईशान्य फ्रटियर रेल्वे (NFR) च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी रंगपानी स्टेशनजवळ एका मालगाडीने कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून धडक दिली. त्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

सरकारकडून मदत जाहीर-

पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली. ते म्हणाले की, अपघातातिल मृतांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मृतांच्या नातेवाईकांना 10-10 लाख रुपये देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमींना 2.5-2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
Kanchenjunga Express Accident

पंतप्रधान कार्यालयाकडून सोशल मिडियावर पोस्ट करत मदतीची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातातिल प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधिकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच अपघातातिल जखमीना 50,000 रुपये दिले जातील.

पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात (Kanchenjunga Express Accident) झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबायांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधिकडून 2 लाख रुपयांचे आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले आहे.

पश्चिम बंगालमधील झालेला रेल्वे अपघात फारच दुखद आहे, आपले प्रियजन गमावलेल्या लोकांप्रति माझ्या संवेदना आहेत. जखमींनि लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. अधिकाऱ्यांशी बोलून तेथील परिस्थिति जाणून घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी बचावकार्य आहे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी निघाले आहेत.

Kanchenjunga Express Accident

Kanchenjunga Express Accident: मालगाडी पायलटने सिग्नल तोडला

मालगाडीला धडकल्यानंतर कांचनजंगा एक्स्प्रेसचा मागचा भाग पूर्णपणे हवे लटकत असल्याच घटणस्थळावरील फोटोवरून स्पष्ट होत होतं. रेल्वे बोर्डाचे सीईओ आणि अध्यक्ष जया वर्मा यांच्या मते मालगाडीनं सिग्नल तोडत कांचनजंगा एक्स्प्रेसच्या मागच्या बाजूला गार्डचा डब्बा आणि दोन पार्सल व्हॅनच प्रचंड नुकसान झालं आहे.

अपघातावेळी दोन्ही एक्सप्रेस एकाच पटरीवरून धावत होत्या.

कांचनजंगा एक्स्प्रेसमधील सुमारे 1300 सुरक्षित प्रवाशांना त्याच रेल्वेच्या सुरक्षित डब्यांमधून पुढ रवाना करण्यात आल, अस नॉर्थ फ्रंटीयर रेल्वेच्या प्रवक्त्यांनी असे सांगितले. या घटनेत मालगाडीच्या ड्रायव्हरसह कांचनजंगा एक्स्प्रेसच्या गार्डचाही मृत्यू झाला आहे.

Kanchenjunga Express Accident: असा झाला अपघात
  • रविवारी सकाळी कांचनजंगा एक्स्प्रेस त्रिपुराची राजधानी आगरतळाहून सियालदहकडे रवाना झाली होती.
  • गुवाहाटी स्टेशन मार्गे ही रेल्वे निघाली होती. सोमवारी सकाळी सुमारे 8 वाजता कांचनजंगा एक्सप्रेस रेलवेनं पश्चिम बंगालमधून न्यू जलपैगुडी रेल्वे स्टेशन ओलांडले.
  • त्यावेळी ही रेल्वे जवळपास अर्धातास उशिराने धावत होती. त्यानंतर काही वेळान सुमारे पाउणे नऊ वाजता कांचनजंगा एक्स्प्रेस रंगापानी छत्रसाल रेल्वे सेक्शन मध्ये पोहचली. त्यावेळी मागून येणाऱ्या एका कंटेनर ट्रेननया रेल्वेला धडक दिली.
  • या अपघातानंतर एक्स्प्रेसचा मागचा भाग आणि मालगाडीच्या इंजिनसह त्यांचा पुढचा भाग पटरीवरुण उतरला.
  • रेल्वेकडून जया वर्मा यांनी जी माहिती दिली आहे. त्यानुसार मालगाडी थांबवण्यासाठी लाल सिग्नल देण्यात आला होता. पण पायलटने गाडी थांबवली नाही. पुढ जाऊन ती कांचनजंगा एक्स्प्रेसला धडकली.
  • रेल्वे मेन्स फेडरेशनचे महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांनी केलेल्या दाव्यानुसार, मालगाडीचा पायलट सततच्या ड्यूटीमूळ प्रचंड थकलेला होता. त्यामुळे त्याला आरामाची गरज होती. पण सोमवारी त्याला पुन्हा ड्यूटी देण्यात आली आहे.

या अपघातानंतर कांचनजंगा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने एनएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. यात त्याने अपघातावेळी नेमक काय घडल, हे सांगितल आहे. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी मी पण 1 कोचमध्ये होतो. आमच्या बोगिला अचानक जोरदार धक्का बसला त्यानंतर सगळे जण अपघात झाला म्हणून ओरडत होते. काही जण रडायला लागले. मी बाहेर येऊन बघितल तर मालगाडीने आमच्या एक्स्प्रेसला धडक दिली होती, अशी प्रतिक्रिया या प्रवाशाने दिली. पुढे बोलताना या आपघतामुळे आमच्या बोगीत अनेक जण जखमी झाले. तसेच काही लोकांना मृत्यूदेखील झाला. यावेळी माझ्या डोक्यालाही मार लागला, असेही त्याने सांगितले.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!