Jio New 5G Plans
Jio New 5G Plans: जिओने आपल्या प्लॅनच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशभरातील जिओच्या यूजर्सच्या खिशाला कात्री लागणार आहे. रिलायन्स जिओने गुरुवारी आपली नवीन अमर्यादित 5G डेटा प्लॅन जाहीर केला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हे नवीन सेवा 3 जुलै 2024 पासून देशभरात लागू होणार आहेत. रिलायन्स जिओ 5G देशाच्या कानाकोपऱ्यात कोठेही सर्वात फास्ट 5G सेवा देत आहे. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपले कोणते प्लॅन महाग केले आहेत आणि जुन्या किंमतीच्या तुलनेत कितीने प्लॅन वाढवलेला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊया.
रिलायन्स जिओ कंपनीने आपले पोस्टपेड आणि प्रिपेड प्लॅनचे दर वाढवले आहेत. जिओचा सर्वात कमी असलेला प्रिपेड प्लॅन 155 रुपयांचा होता. आता त्या प्लॅनची किंमत 189 रुपये करण्यात आली आहे. तसेच जिओने एका महिन्याचा, तीन महिन्याचा प्लॅन आणि वार्षिक प्लॅनचे दर बदलले आहेत. हे दार आता 3 जुलै पासून लागू होणार आहेत.

आता अनलिमिटेड 5G डेटा हा फक्त काही वापरकर्त्यांना मिळणार आहे. त्यामध्ये जिओने सर्व ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा देणं बंद केलं आहे. हा लाभ फक्त काही प्लॅनवरच उपलब्ध असणार आहे.
कंपनीने आपल्या सर्व प्रिपेड आणि पोस्टपेड लहान मोठ्या प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा करण्यात केली आहे. टेलिकॉम कंपनीने 19 जुन्या प्लॅनसाठी दरवाढीची घोषणा केली. यात 17 प्रिपेड प्लॅन आहेट आणि दोन पोस्टपेड प्लॅनचा समावेश आहे. जिओचा सर्वात स्वस्त 155 रुपयांचा प्लॅनमध्ये 22 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. येत्या 3 तारखेपासून नवीन दर लागू होणार आहे.
Jio New 5G Plans: नवीन प्लॅन वाढलेली किंमत
खालील प्लॅन हे जिओ कंपनी कडून जुन्या प्लॅन हे किती रुपयाने वाढवलेले आहेत. हे खालील टेबल मध्ये दिलेले आहेत.
Existing Price (RS) | New Price (Rs) | Data Allowance | Validity (Days) |
---|---|---|---|
155 | 189 | 2 GB | 28 |
209 | 249 | 1 GB/Day | 28 |
239 | 299 | 1.5 GB/Day | 28 |
299 | 349 | 2 GB/Day | 28 |
349 | 399 | 2.5 GB/Day | 28 |
399 | 449 | 3 GB/Day | 28 |
479 | 579 | 1.5 GB/Day | 56 |
533 | 629 | 2 GB/Day | 56 |
395 | 479 | 6GB | 84 |
666 | 799 | 1.5 GB/Day | 84 |
719 | 859 | 2 GB/Day | 84 |
999 | 1199 | 3 GB/Day | 84 |
1559 | 1899 | 24 GB | 336 |
2999 | 3599 | 2.5 GB/Day | 365 |
अमर्यादित 5G डेटा प्लॅन जाहीर केला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही नवीन सेवा 3 जुलै 2024 पासून देशभरात लागू होणार आहेत.

Data Add-On Plans
Existing Price (RS) | New Price (Rs) | Data Allowance |
---|---|---|
15 | 19 | 1 GB |
25 | 29 | 2 GB |
61 | 69 | 6 GB |
Jio New 5G Plans: नवीन पोस्टपेड प्लॅन
पोस्टपेड प्लॅनही अधिक महाग झाले आहेत. 30 GB डेटा प्रदान करणाऱ्या 299 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता नवीन प्लॅन नुसार 349 रुपये आहे. 75 GB डेटासह 399 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता नवीन प्लॅन नुसार 449 रुपये आहे.
जिओ दोन नवीन App देखील लॉन्च करत आहे.
Jio Safe: कॉलिंग, मॅसेजिंग आणि फाइल ट्रान्सफरसाठी एक सुरक्षित कम्युनिकेशन App, ज्याची किंमत 199 रुपये प्रती महिना आहे.
Jio Translate: व्हाईस कॉल, मॅसेज, मजकूर आणि प्रतिमांचे भाषांतर करण्यासाठी AI- शक्तीवर चालणार बहू भासिक संप्रेषण App, ज्याची किंमत प्रती महिना 99 रुपये आहे.
जिओ वापरकर्ते हे App एका वर्षासाठी मोफत घेऊ शकतात. Reliance Jio InfoComm Limited चे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले. नवीन योजना आणणे हे उद्योगातील नावीन्यपूर्ण आणि 5Gआणि AI तंत्रज्ञानातील शाश्वत वाढ करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. डिजिटल इंडियासाठी उच्च- गुणवत्तेचे, परवडणारे इंटरनेट आवश्यक आहे आणि या दृष्टिकोनात योगदान दिल्याचा जिओला अभिमान आहे. आम्ही भारतात गुंतवणूक करून आमच्या देशाला आणि ग्राहकांना प्राधान्य डेट राहू.
जिओच्या प्लॅनमध्ये 12 ते 25 टक्क्यांनी वाढ
Jio New 5G Plans रिलायन्स जिओने गुरुवारी, 27 जून रोजी त्याच्या प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सवर 12% ते 25% पर्यंत दर वाढवण्याची घोषणा केली. गेल्या अडीच वर्षातील किंमतीमध्ये पहिली वाढ करत आहे. ही नवीन योजना 3 जुलै पासून संपूर्ण देशात लागू होईल. सर्वच सक्रिय प्लॅनमध्ये सर्वात तीव्र वाढ दिसून आली.
नुकताच पार पडलेल्या लिलावात जिओ ने 1800 MHz ब्रॅंडमध्ये 14.4 MHz स्पेक्ट्रम विकत घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घोषणा झाली आहे, त्याची रक्कम Rs. 973 कोटी आहे. भारताचा स्पेक्ट्रम लिलाव 26 जून रोजी झाला त्यामुळे दूरसंचार सेवा प्रदात्यांनी TSPs व Telcos एकुन Rs.11,300 कोटी किंमतीची रेडियो लहरी खरेदी केल्या. ज्या Rs. 96238 कोटींच्या किमान मूल्याच्या फक्त 12% आहे.
भारतीय एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने अजून प्लॅन वाढीची कोणतीही घोषणा नाही केली परंतु ते सूद्दा लवकरच प्लॅन वाढ करतील. जिओने शेवटची वाढ डिसेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती, जेव्हा दार 20% ने वाढले होते.
आता कसे असणार प्लॅन?
Jio New 5G Plans 155 रुपयांचा 2 जिबी पलंची किंमत आता 189 रुपये करण्यात आली आहे. 209 रुपयांच्या 1 जिबी डेटा दररोजच्या प्लॅनची किंमत आता 249 करण्यात आली आहे. 239 च्या 1.5 जिबी प्रतिदिनच्या डेटा प्लॅनची किंमत आता 299 करण्यात आली आहे. 299 च्या 2 जिबी प्रतिदिनच्या डेटा प्लॅनची किंमत आता 349 करण्यात आली आहे. 349 रुपयांच्या 2.5 जिबी प्रतिदिनच्या डेटा प्लॅनची किंमत आता 399 करण्यात आली आहे. 399 रुपयांच्या 3 जिबी प्रतिदिनच्या डेटा प्लॅनची किंमत आता 449 करण्यात आली आहे.
आता 56 दिवसांच्या 5G अनलिमिटेड डेली 2 जिबी प्लॅनसाठी 629 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच 3 महिन्याच्या प्लॅनसाठी आता प्रतिदिन 2 जिबी देतासाठी आता 859 रुपये मोजावे लागणार आहेट. तसेच वार्षिक प्रतिदिन 2.5 जिबीच्या 3599 रुपये लागणार आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!