Jasprit Bumrah Injury Update
Jasprit Bumrah Injury Update: सिडनी कसोटी सामना सुरू असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेला संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बूमराहला मैदान सोडावं लागलं आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बूमराहला मैदान सोडून हॉस्पिटलला जावं लागलं आहे. बूमराहने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अप्रतिम गोलंदाजी करत 1 विकेटही मिळवली. पण लंचब्रेकवेळी बूमराह स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलला (Jasprit Bumrah Injury Update) जाताना दिसून आला. जसप्रीत बूमराह लंच ब्रेक नंतर मैदानावर दिसला नाही. टु सपोर्ट स्टाफसह मैदान सोडताना दिसला. यावेळी तो टीम इंडियाच्या मॅच जर्सीतही नव्हता. त्याने ट्रेनिंग कित घातली होती. ज्यानंतर जसप्रीत बूमराह काहीसा अडचणीत असल्याचे मानले जात आहे.
याशिवाय तो मैदानाबाहेर एका कारमध्येही दिसला त्यांतर आता समोर आलं आहे की जसप्रीत बूमराहला काही दुखापत झाली आहे आणि त्याला टीम स्टाफसह स्कॅनिंगसाठी पाठवण्यात आले आहे. सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघाला अवघ्या 185 धावा करता आल्या. मात्र त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी चांगलाच जोर लावत भारतीय संघाला सामन्यात टिकवून ठेवलं आहे. बूमराह वेगवान गोलंदाजी आक्रमणाचंही नेतृत्व करतोय त्याने पहिल्या दिवशी शेवटच्या षटकात आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला.

बूमराह कारमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये जाताना दिसून आला. त्याला स्कॅनसाठी घेऊन जाण्यात आलं आहे. स्कॅन रिपोर्ट आल्यानंतर त्याला नेमकी काय दुखापत झाली, हे कळेल. या महत्वाच्या सामन्यात कोहली संघांच नेतृत्व करताना दिसतोय. त्याचबरोबर गोलंदाजांची संपूर्ण जबाबदारी सिराज आणि प्रसिद्ध कृष्णावर आली आहे. बूमराहच्या अनुपस्थितीत (Jasprit Bumrah Injury Update) प्रसिद्ध कृष्णा आणि नितीश रेड्डीने चांगली गोलंदाजी करत विकेट घेतले आहेत. जसप्रीत बूमराहने या मालिकेत आतापर्यंत 32 विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत बूमराहने मैदान सोडणं हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. सिडनी कसोटीच्या या डावात बूमराहने आतापर्यंत 10 षटकं टाकली आहेत आणि 2 विकेटही घेतले आहेत. म्हणजेच या सामन्यातही तो चांगल्या फॉर्ममध्ये होता.
जसप्रीत बूमराहच्या अनुपस्थितीत भारताने 5 विकेट्स मिळवले आहेत आणि ऑस्ट्रेलिया 181 धावांवर सर्वबाद करत भारताने 4 धावांची आघाडी मिळवली आहे. जसप्रीत बूमराह मैदानाबाहेर गेल्यानंतर दुसऱ्या सत्रातच भारताने ऑस्ट्रेलियाला सर्वबाद केलं आहे. दुसऱ्या सत्रात नितीश रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले आहेत. तर सिराजने बोलँडला क्लीन बोल्ड करत 1 विकेट मिळवली.

बूमराहला कामाच्या ओझ्यामुळे झाली दुखापत?
मेलबर्न आणि सिडनी कसोटीमध्ये केवळ तीन दिवसांचे अंतर होते. मेलबर्न कसोटीत बूमराहने 53 पेक्षा जास्त षटके टाकली होती. त्याच सामन्यातील त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रोहित शर्माने त्याला गोलंदाजी करण्याची विनंती केली. तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला होता. या संपूर्ण दौऱ्याने बूमराहने सर्वाधिक गोलंदाजी केली आहे आणि कदाचित या कामाच्या ओझ्यामुळे त्याला दुखापत झाली असावी. या दौऱ्यात इतर कोणत्याही गोलंदाजांची मदत न मिळाल्याने बूमराहला जास्त मेहनत करावी लागत आहे. तो सिडनी कसोटीतुन बाहेर पडला तर भारतासाठी हा मोठा धक्का असेल.
Jasprit Bumrah Injury Update: बूमराहची शानदार सुरुवात
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या 185 धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियालाही हवी तशी सुरुवात करता आली नाही. पहिल्या दिवसाची शेवटच्या षटकात बूमराहने उस्मान ख्वाजाला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बूमराहने मार्नस लाबूशेनला 2 धावांवर बाद करत माघारी धाडलं. बूमराहने या डावात 10 षटकात 33 धावा खर्च करत 2 गाडी बाद केले आहेत.

Jasprit Bumrah Injury Update: जसप्रीत बूमराह जबरदस्त फॉर्ममध्ये
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बूमराह या मालिकेत जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांच्या कर्णधार पदापासून ते त्यांच्या गोलंदाजी पर्यंत दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टीम इंडियाला यावेळी बूमराहची गरज आहे. या मालिकेत बूमराहची कामगिरी इतर सर्व खेळाडूंच्या तुलनेत खूपच चंगली झाली आहे. या मालिकेत त्याने एकुण 32 विकेट्स घेतल्या आहेत. जे सर्वोच्च आहे. ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही गोलंदाजाने अशी कामगिरी केलेली नाही याशिवाय बूमराह या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधारही आहे. अशा स्थितीत टीम इंडियासाठी हा दुहेरी धक्का आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!