IPS Shivdeep Lande: मोठी बातमी! IPS शिवदीप लांडेचा पोलिस सेवेतून का घेतला राजीनामा?

IPS Shivdeep Lande Resing

IPS Shivdeep Lande Resing: बिहार केडरचे हे मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या पोलिस सेवेचा राजीनामा दिला आहे. आपल्या सेवेतून राजीनामा घेतल्या या संदर्भातील माहिती शिवदीप लांडे यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून दिली आहे. यांनी जवळपास पोलिस खात्यात 18 वर्ष सेवा केली आहे. शिवदीप लांडे यांना बिहारमधील सिंघम म्हणून ओळखलं जातं. यांनी आपल्या सेवेतून अचानक राजीनामा दिल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. राजीनामा दिल्या नंतर सूद्दा बिहारमध्ये सेवा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. IPS शिवदीप वामनराव लांडे यांचा समावेश हा बिहारमधील अशा अधिकाऱ्यांमध्ये होतो जे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाच्या दबावापुढे झुकत नाहीत. ते एक प्रामाणिक आणि चांगले पोलिस अधिकारी अशी आहे.

लांडे हे काही काळ महाराष्ट्रातही प्रतिनियुक्तिवर होते. त्यांनी मुंबईत अंमली पदार्थ पथकात कार्यरत असतानाही प्रभावी कामगिरी करत ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर त्यांनी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना ही प्रभावी महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. लांडे हे पुणे जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे ते जावई आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजीनाम्याची बातमी खरी आहे. मी वैयक्तिक कारणांमुळे भारतीय पोलिस सेवेचा राजीनामा दिला आहे. लांडे हे महाराष्ट्रातील अकोल्याचे रहिवासी आहेत. त्यांना आयपीएस म्हणून बिहार केडर मिळाले आहे. त्यांनी तीरहून विभाग (मुजफ्फरपूर) कोसई विभागाचे उपमहानिरीक्षक आणि बोहर मधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. बिहार मधील दबंग पोलिस अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

IPS Shivdeep Lande Resing
IPS Shivdeep Lande Resing

ते 2006 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते. ते आपल्या दमदार अशा बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा जास्ततर काळ हा बिहार मध्ये गेला असल्यामुळे ते आता राजीनामा दिल्या नंतर सुद्धा बिहार माझी कर्मभूमी असेल असे ते म्हणाले.

IPS Shivdeep Lande Resing: राजीनामा दिल्या नंतर सोशल मिडियावर शेअर केली पोस्ट

शिवदीप लांडे यांनी त्यांच्या सोशल मिडिया अधिकृत अकाऊंट फेसबूक पेजवर राजीनामा दिल्याचे जाहीर केले, ते म्हणतात की “माझ्या प्रिय बिहार वासीयांनो, मी गेल्या 18 वर्षापासून मी सरकारी पदावर सेवा देत आहे. आज यया माझ्या पदाचा मी राजीनामा देत आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला स्वत: पेक्षा आणि माझ्या कुटुंबियांपेक्षा सर्वात जास्त मानले आहे. एक सरकारी सेवक म्हणून माझ्या कार्यकाळात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यासाठी मी माफी मागतो. मी आज भारतीय पोलिस दलाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्या नंतर मात्र मी बिहारमध्येच राहणार आहे. यापुढे ही बिहारच माझी कर्मभूमी असेल. जय हिंद!”

IPS Shivdeep Lande Resing

शिवदीप लांडे यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर विविध चर्चाना उत आला आहे. संपूर्ण बिहारमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे की, अखेर एका चांगल्या आयपीएस अधिकाऱ्याने वेळेआधीच का राजीनामा दिला. शिवदीप लांडे यांना काही त्रास होता का? अर्थात लांडे याची ओळख अशी आहे की, ते त्यांच्या कामासमोर कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसत. कायदा सुव्यवस्था राखणे हेच त्यांच्या समोरचे मुख्य असायचे. लांडे यांची पूर्णिया येथे बदली करण्यात आली होती. याआधी ते पूर्णियाच्या तुलनेत मोठ्या असलेल्या तीरहुत येथे नियुक्तीवर होते. फेसबुकवर शिवदीप लांडे यांनी शेअर केलेल्या पोस्टवरून ते यापुढे बिहारमध्ये राहणार आहेत हे स्पष्ट आहे. बिहार माझी कर्मभूमी असेल असे त्यांनी म्हटले असल्याने आता ते पुढे काय करणार याची उत्सुकता लागली आहे. लांडे याबाबत कधी घोषणा करतील हे पहावे लागेल.

IPS Shivdeep Lande Resing: शिवदीप लांडे यांची पहिली पोस्टिंग

शिवदीप लांडे यांची पहिली पोस्टिंग प्रक्षिणार्थी पोलिस अधीक्षक म्हणून बिहारमधील मुंगेर जवळच्या जमालपूर इथं नियुक्ती झाली होती. हा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखलं जात होतं. या भागात पोलिसांवर फायरिंग केली जाते, म्हणून हा नक्षलवाद्यांचा परिसर म्हणून या भागाला ओळखलं जात होतं. इथेच सन 2005 साली पोलिस अधीक्षक सुरेन्द्र बाबूची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यामुळे या भागात पोलिस जाण्यात घाबरत होते. मात्र पहिल्याच नियुक्तीत शिवदीप लांडे यांनी आपली आणि आपल्या कामाची छाप पाडून, स्थानिकांचा विश्वास मिळवला. प्रत्येक आठवड्यात ते या परिसरात जाऊन स्थानिक नागरिकांची गाठीभेटी घेत. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचे त्यांना सहकार्य मिळालं. त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यात झाली.

IPS Shivdeep Lande Resing
IPS Shivdeep Lande Resing

शिवदीप यांनी दमदार आणि अनेक धडक कारवाया करून गुन्हेगारी संपुष्टात आणली. धडक कारवाई रोखण्यासाठी त्याच्यावर राजकीय दबाव टाकण्यात आला. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र त्याच्या बदली विरोधात बिहारी जनता रस्त्यावर उतरली होती.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!