IPL Mega Auction 2025
IPL Mega Auction 2025: आयपीएल 2025 च्या ऑक्शन मध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात विक्रमी बोली लागलेली आहे. ह्या लिलावाचा पहिला तास खूपच रोमांचक होता. पहिल्यांदा कोलकत्ता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार श्रेयश अय्यर हा आयपीएलचा सर्वात महाग खेळाडू ठरला होता. त्याला पंजाब किंग्सने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते, मात्र काही वेळातच हा विकर्म मोडिस आला कारण यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनऊने यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला तब्बल 27 कोटींना खरेदी केले आहे. यामुळे पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडू बनला आहे.
या ऑक्शन मध्ये श्रेयश अय्यर ला 10 मिनिटात पाठीमागे सोडले आहे. तो थोड्याच वेळापूर्वी 26.75 कोटी रुपयांना विकला गेला होता. ह्या लिलावात ऋषभ पंत ला 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि अल्पवधीतच त्याची किंमत 10 कोटींच्या पुढे गेली होती. त्यानंतर ऋषभ पंतसाठी लखनऊ आणि आरसीबी यांच्यात सुरुवातीला सामना रंगला होता. पण लखनऊनेही हार मानली नाही. हैदराबादचे मालक काव्या मारन आणि लखनऊचे मालक संजय गोयंकायांनी पंतसाठी लिलावाच्या टेबलावर बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत 17 कोटींच्या पुढे गेली. पंजाबला किंग्जला एका सक्षम कर्णधाराची गरज होती. श्रेयश च्या रूपात त्यांना चांगला कर्णधार मिळाला आहे.
पंजाबने अर्शदीप सिंगसाठी राइट टू मॅचचा अधिकार वापरत त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. पंजाबने अतिटतीच्या मुकाबल्यात फिरकीपट्टू युझवेंद्र चहलला सामील केलं. चहलसाठी पंजाबने तब्बल 18 कोटी रुपये मोजले.
IPL Mega Auction 2025: आज च्या लीलावात महागात विकले गेलेले खेळाडू
खेळाडू | टीम | किंमत |
---|---|---|
ऋषभ पंत | लखनऊ सुपर जायंट्स | 27 कोटी रुपये |
श्रेयश अय्यर | पंजाब किंग्स | 26.75 कोटी रुपये |
व्यंकटेश अय्यर | कोलकत्ता नाइट रायडर्स | 23.75 कोटी रुपये |
अर्शदीप सिंग | पंजाब किंग्स | 18 कोटी रुपये |
युझवेंद्र चहल | पंजाब किंग्स | 18 कोटी रुपये |
जॉस बटलर | गुजरात टायटन्स | 15.75 कोटी रुपये |
मिचेल स्टार्क दिल्लीत सहभागी झाला आहे. कगीसो रबाडाला गुजरातने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले. मार्की प्लेयरच्या दुसऱ्या सेटमध्ये मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादने 10 कोटीमध्ये विकत घेतले. डेव्हिड मिलरवर लखनऊने 7.50 कोटी रुपये खर्च केले. केएल राहुलला दिल्ली कपिटल्ससने 14 कोटींना विकत घेतले.
IPL Mega Auction 2025: महाग विकले गेलेल्या खेळाडूंचा परफॉर्मन्स
- श्रेयश अय्यर: श्रेयश अय्यर पहिल्यांदा दिल्ली कपिटल्सकडून खेळला होता. तेव्हापासून अय्यरने आयपीएलमध्ये 116 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 127 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 3127 धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये अय्यरची सर्वोच्च धावसंख्या 96 धावा आहे. या मोठ्या स्पर्धेत त्याच्या बॅटने 21 अर्धशतके झळकावली आहेत. कोलकत्ता नाइट रायडर्स श्रेयश अय्यरला कर्णधार म्हणून कायम ठेवले नाही. संघाने त्याला सोडले होते. सध्या श्रेयश अय्यर फॉर्मात असून गेल्या अनेक डावांमध्ये तो चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळेच त्याला मेगा लिलावात मोठी रक्कम मिळाली आहे.
- ऋषभ पंत: आयपीएलच्या 8 हंगामात 111 सामन्यांमध्ये 17 वेळा नाबाद राहिला आहे आणि त्याने 35.31 च्या सरासरीने आणि 148.93 स्ट्राइक रेटने 3248 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ऋषभ पंतने 128 धावांची नाबाद पारी ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम पारी आहे.
कोणत्या टीमकडे किती RTM शिल्लक
टीम्स | RTM |
---|---|
चेन्नई सुपर किंग्स (CSK) | 01 |
दिल्ली कपिटल्स (DC) | 02 |
गुजरात टायटन्स (GT) | 01 |
कोलकत्ता नाइट राइडर्स (KKR) | 00 |
लखनऊ सुपर जायंट्स (LSG) | 01 |
मुंबई इंडियन्स (MI) | 01 |
पंजाब किंग्स (PBKS) | 04 |
राजस्थान रॉयल्स (RR) | 00 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) | 03 |
सनराईझर्स हैदराबाद (SRH) | 01 |
IPL Mega Auction 2025: कोणत्या टीमकडे कीती रक्कम शिल्लक आहे
- चेन्नई सुपर किंग्स (CSK): – 55 कोटी
- दिल्ली कपिटल्स (DC): – 73 कोटी
- गुजरात टायटन्स (GT): – 69 कोटी
- कोलकत्ता नाइट राइडर्स (KKR): – 51 कोटी
- लखनऊ सुपर जायंट्स (LSG): – 69 कोटी
- मुंबई इंडियन्स (MI): – 45 कोटी
- पंजाब किंग्स (PBKS): – 110.50 कोटी
- राजस्थान रॉयल्स (RR): – 41 कोटी
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB): – 83 कोटी
- सनराईझर्स हैदराबाद (SRH): – 45 कोटी
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!