iPhone 16 Launch Date: लॉंचिंगची वेळ आणि तारीख ठरली, जाणून घ्या फीचर्स, Ai टूल्स अन् बरच

iPhone 16 Launch Date

iPhone 16 Launch Date: आयफोनच्या चाहत्यांसाठी खुशखबर! खुशखबर! यंदाच्या वर्षी आयफोन 16 सिरिज लॉन्च होणार आहे, त्यामुळे आयफोनचे चाहते या फोनच्या लॉंचिंग बद्दल उत्सुक अहेत. ॲपल हा आपल्या चाहत्यांसाठी दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यांमध्ये लॉन्च होतात. त्यामुळे ही सिरिज लॉन्च होण्यासाठी आता अवघे काही महीने शिल्लक आहेत. मात्र आत्तापासून आयफोन 16 मधील संभाव्य फीचर्स बद्दल चर्चा सुरू आहेत. एका लिकनुसार, आयफोन 16 सिरीजमध्ये दोन बेस मॉडेल आणि दोन प्रो मॉडेल अशी एकुन चार डिव्हाईस असतील. आयफोन 16 आणि 16 प्लस हे 15 सिरिजमधील मॉडेल्स सारखेच असतील 16 सिरिज मध्ये व्हर्टीकल डयूअल- कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे.

आता ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहचणार आहे. कारण आयफोन 16 ची लॉन्च (iPhone 16 Launch Date) तारीख जाहीर करण्यात आली आहे. ॲपलने सोमवारी ‘इट्स ग्लोटाइम’ नावाच्या 9 सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठी आमंत्रणे पाठवले आहे. जिथे कंपनी नवीन आयफोन 16 आणि इतर उत्पादनांचे अनावरण करेल असे सांगण्यात येत आहे. तर हा कार्यक्रम स्टीव्ह जॉब्स थिएटर मध्ये क्युपर्टीनो कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे, ॲपलने आमंत्रणात iPhone 16 चा उल्लेख केला नाही. किंवा ते कोणती उत्पादनांचे करतील याची कोणतीही माहिती दिली गेली नाही. पण आयफोन 16 लाइन अपचे लॉन्च होणार हे निश्चित आहे. हा इव्हेंट पॅसिफिक वेळेनुसार सकाळी 10 किंवा 10 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल.

असं म्हंटलं जातं आहे कि, या सिरिज मधील बेस आयफोन मॉडेल 3D व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करेल. सध्या हे फीचर प्रो सिरिजपुरतं मर्यादित आहे. सर्व फोनला ॲक्शन बटन आणि नवीन कॅप्चर बटन मिळेल. लिकस्टर सोनी डीक्सनच्या मते, आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस नवीन शेडसमध्ये येतील. जे आयफोन 16 प्रो सिरिजची वाट पाहत आहेत ते थोडे निराश होऊ शकतात. प्रो मॉडेल्सचे रंग 15 प्रो मॉडेल्स सारखेच असतील. त्यांच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा आयलँड असेल. चारही आयफोन 16 मॉडेल्स यूएसबी सी पोर्टसह येतील. आयफोन 16 प्रो आणि 16 प्रो मॅक्स् फास्ट डेटा ट्रान्सफर स्पीड सपोर्टसह मिळतील. बेस मॉडेल्सवर हे फक्त यूएसबी 2.0 सँडर्ड पुरतं मर्यादित असेल.

iPhone 16 Launch Date
iPhone 16 Launch Date

अँन्ड्रॉईड कंपन्यांमध्ये कमी किंमतीमध्ये दर्जेदार मोबाइल फोन देण्याची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा गेल्या काही वर्षापासून ॲपलच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे. पण त्यानंतर ही आयफोनची क्रेझ कायम आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून आयफोन 16 कधी लॉन्च (iPhone 16 Launch Date) होणार याची चर्चा सुरू होती. आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कंपणीनं आयफोन 16 लॉन्चची तारीख जाहीर केली आहे.

iPhone 16 Launch Date: ह्या iPhone 16 मध्ये खास काय?

iPhone 16 Launch Date
  • iPhone 16 सिरिज मध्ये ॲपलइंटेलिजेन्स फीचर्स असेल. त्याचबरोबर या सिरिज मधील कॅमेरा ॲपमध्ये तातडीने फोटोंचा शूट करणे तसंच व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी एक नवं कॅप्चर बटन असण्याची शक्यता आहे.
  • iPhone 16 मध्ये स्क्रीन साइज थोडा मोठा असू शकतो. त्याचबरोबर कॅमेरा ॲरेच्या डिझाइनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार iPhone 16 मध्ये महत्वाच्या हार्डवेअर अपडेट्स समावेश असेल. iPhone च्या चिपसेटला अपग्रेड केल जाऊ शकते. हे अपग्रेड व्हर्जन ॲपल इंटेलिजेन्सला सपोर्ट करेल. सध्या फक्त iPhone 15 Pro आणि 15 Pro Max मध्ये आवश्यक प्रोसेसिंग पॉवर आहे.
  • कॅमेरा अपग्रेड होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये झुम जेक्सर कंट्रोलची सुविधा देणारं कॅप्चर बटन असू शकतं. अर्थात ही सुविधा लॉन्च होणाऱ्या सर्व मॉडेल्स मध्ये असेल की फक्त प्रो मॉडेलमध्ये असेल हे अद्याप स्पष्ट नाही.
  • iPhone 16 च्या यूझर्ससाठी अनेक फीचर्सचा समावेश असेल. यामध्ये यूझर्सना स्लो चार्जिंग पासवर्ड विसरणे यांसारख्या अडचणी समाप्त करण्यासाठी नव्या अपडेट्सचा समावेश असेल.
  • iphone 16 प्रो मध्ये 3,577 mAh दमदार बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. तर iPhone 16 Pro Max मध्ये 4,441 mAh बॅटरी मिळू शकते.
iPhone 16 Launch Date

iPhone 16 Launch Date: आयफोन 16 अपडेट्स प्रोसेसर

यकेळी ॲपल (Apple) सर्व चार मॉडेल्स ए 18 चिपसेट सुसज्ज करू शकते. याआधी, फक्त प्रो मॉडेल्समध्ये नवीन चिपसेट होते. परंतु एआय फीचर्समुळे हा बदल शक्य आहे. ही सर्व उपकरणे डिव्हाईस AI टास्क परफॉर्म करण्यास सक्षम असतील तथापि, आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस प्रोसेसर त्यांच्या जीपियू कार्यक्षमतेच्या आधारावर प्रो व्हेरीअंट पासून वेगळे केले जाऊ शकतात.

iPhone 16 Launch Date: अपेक्षित फीचर्स

  • डिझाइन आणि डिस्प्ले: आयफोन 16 ची डिझाइन आयफोन 15 सारखीच राहील अशी शक्यता आहे पण काही सुधार अपेकशीत आहेत. प्रो मॉडेल्समध्ये मोठे डिस्प्ले असतील अशी अटकळ आहे. iPhone 16 Pro मध्ये 6.3 इंच आणि iPhone 16 pro Max मध्ये 6.9 इंच डिस्प्ले असू शकते.
  • कॅमेरा: कॅमेराची गुणवत्ता वाढवणारे काही फीचर्स येण्याची शक्यता आहे. सर्व मॉडेल्समध्ये फोटोग्राफीचा अनुभव सुधारण्यासाठी नवीन कॅप्चर बटन असेल. तसेच iPhone 15 Pro मध्ये आलेला ॲक्शन् बटन आता स्टँडर्ड iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये म्युट स्विचच्या जागी येऊ शकतो.
  • प्रोसेसर आणि AI फीचर्स: iPhone 16 सिरीजमध्ये ॲपलचा नवीन A 18 चिप असण्याची शक्यता आहे. या चिपसेट फोनची कार्यक्षमता वाढणार आहे. AI संबंधित फीचर्सनाही अधिक गती मिळणार आहे.
  • रॅम: iPhone 16 मध्ये 8 GB रॅम असण्याची शक्यता आहे. यामुळे मल्टीटास्किंग आणि फोनची रिस्पॉन्सीव्हनेस वाढले.
  • नवे रंग: iPhone 16 Pro आणि Pro Max मध्ये नवीन टायटॅनिअम ब्रॉन्झ रंग येण्याची शक्यता आहे.

अशाप्रकारे अनेक अपेक्षित फीचर्ससह iPhone 16 सिरिज लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. अधिकृत घोषणा आणि किंमत जाणून घेण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. ॲपलने आधीच जाहीर केले आहे. की आयफोन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फीचर्सने सुसज्ज असेल. त्याला Apple intelligence असे नाव देण्यात आले आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!