International Yoga Day 2024
International Yoga Day 2024: 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. सर्वाधिक देशांच्या समर्थनाने आणि मतदानाशिवाय योग दिनाचा प्रस्थाव पारित होण, हे भारताच्या योग सामर्थ्यावर जागतिक विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासारखच होत.
योग्य पद्धतीने आसनांचा सराव केला तरच यापासून शरीरास पूर्ण लाभ मिळू शकतात. पोटपद्धतीने अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही देखील बरेच प्रयत्न करत आहात का? तर मन संपूर्ण माहिती वाचा…
मनाच्या सकारात्मक ऊर्जेसाठी आणि निरामय आरोग्यासाठी योगसाधना आवश्यक आहे. स्वत:चे आरोग्य निरोगी आणि सदूढ् ठेवण्यासाठी जबाबदारी स्वत:वरच आहे. ताणतणाव जीवनशैलीचा एक भाग असून, त्यावर मत करायची असेल तर, योगसाधना आणि प्राणायम नित्यनेमाने करण्याची नितांत आवश्यक असते.
अगदी कमी वयातच हृदय विकाराचा झटका आल्याची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात झालेला बदल, कामांचे बदललेले स्वरूप आणि वेळा खानपानांच्या सवयी आपसूकच अनेक आजारांवर नियंत्रण मिळते. यापैकीच एक चिंताजनक बाब म्हणजे हृदयविकारांना मिळालेले निमंत्रण. काही साध्या-सोप्या गोष्टींचे आपण पालन केले तर नक्कीच दिल की धडकनो कॉ जवाब रखना आसन है.. म्हणूनच तर हृदयविकारांचा धोका कमी करण्यासाठी काही योगासने नियमितपणे केली पाहिजेत. कारण योगा केवळ वेटलॉससाठी नाही. योगा केल्यामुळे विविध अवयवांचे, इंद्रियांचे काम सुरळीत चालते आणि त्यामुळे आपण अधिकाधिक फिट होतो.
योगा, आयुर्वेद आत्मसात करण्याची गरज
योगसाधना, ध्यानधारणा आणि आयुर्वेद ही आपल्या देशाची परंपरा आहे. सूर्यनमस्कार जारी आपण दररोज केले तरी त्याचा खूप सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर जोत असतो. गेल्या काही वर्षापासून अनेक जण दररोज योगा नियमित करतात, त्याचा सकारात्मक परिणाम अनुभूति ते घेत आहेत.
आपणही नियमित योगसाधना आणि प्राणायम केल्यास त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. परंतु आपण योगा आयुर्वेदाकडे दुर्लक्ष करीत आहोत. तसे न् करता त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे.
योगसाधना महत्वाची
शरीर आणि मनामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी योगसाधना महत्वाची आहे. सद्यस्थितीतील धकाधकीचे आणि तनावाचे वातावरण प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात आहे. यास पोलिस विभाग अपवाद नाही. परंतु तरीही वेळेचे नियोजन केल्यास योगसाधना आणि प्राणायाम करणे दररोज शक्य आहे.
योगा आणि प्राणायाम नियमित केल्यास मनावर आणि शरीरावरील ताणतणाव कमी होण्यास बदल होते. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:साठी किमान 40 ते 45 मिनिटे जारी 24 तासातून दिले तरी आपण निरोगी, सकारात्मक आयुष्य जगू शकतो.
ध्यानधारणेतूनच आनंद
प्रत्येकाची इच्छा असते आपण आनंदी असण्यासाठी निरामय आरोग्य आवश्यक आहे. हे प्रत्येकाने आपल्या मनाला विचारले पाहिजे. शरीर आणि मन आनंदी असण्यासाठी निरामय आरोग्य आवश्यक आहे. हे निरामय आरोग्य योगसाधना आणि ध्यानधारणेमुळेच होऊ शकते. आरोग्य आणि आनंद हे सकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यासाठी ध्यानधारणेतूनच आनंद मिळू शकतो. योगसाधनेतून शरीराला रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी क्षमता असून प्राणायम हे त्यावरील रामबाण उपाय आहे. दिवसातून दोनवेळा प्राणायम केल्याने आयुष्य आनंदी होऊ शकते. त्यासाठी प्रत्येकाने योग आणि प्राणायाम करावे,
International Yoga Day 2024: ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाचा’ प्रारंभ
‘आंतरराष्ट्रीय योग दिनाचा’ प्रारंभ 2014 मध्ये झाला. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या संयुक्त राष्ट्र सभेच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ‘ आंतरराष्ट्रीय यो दिनाच्या प्रस्ताव मांडला, आजवरच्या जगाच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे च 177 देशांचा या प्रस्तावाला पाठिंबा मिळाला. विशेष म्हणजे या प्रस्तावासाठी मतदान घेण्यात आले नव्हते. 21 जून 2015रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. सर्वाधिक देशांच्या समर्थनाने आणि मतदानाशिवाय योग दिनाचा प्रस्ताव पारित होण, हे भारताच्या योग सामर्थ्यावर जागतिक विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासारखंच होत.
21 जून हा संपूर्ण वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, म्हणून 21 जून हा दिवस यो दिनासाठी निवडण्यात आला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2024) संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त या मुस्लिम राष्ट्रांमध्येही साजरा होतो. ‘योगा डे’ हा सध्या प्रचलित शब्द असला तरी खरा शब्द ‘योगा’ नसून ‘योग’ हा आहे. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी संपत्ति आहे. गेल्या 9 वर्षामध्ये योग दिन हा जगभरात प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. आपल्या देशातील योग दिनाचे कार्यक्रम जल्लोषात होतात. मात्र, योग दिनापुरते या विषयाचे महत्व न राहता, 365 दिवस राहायला हवे, म्हणून योग दिन रोज साजरा करता येणे शक्य आहे. अनेक व्यक्ति, संघटना या दिशेने कार्यरत आहेत. पण त्या दिवसाची सुरुवात 21 जूनपासून नक्कीच होऊ शकते.
शालेय अभ्यासात योग विषयाचा समावेश व्हावा, हे प्रयत्न गेला काही वर्षांपासून सुरू आहेत, पण अजून त्यात यश आलेल नाही. खर तर आजवर हा निर्णय होणं अपेक्षित होत. परदेशातील अनेक शाळांमध्ये योगविषयक शिक्षण दिले जात, हे विशेष, योग विषयाला आपल्याकडे धार्मिक चष्म्यातून पहिले जाते, जे सर्वथा चूक आहे. ही बाब जर खरी असती तर मुस्लिम राष्ट्रांमध्ये योग विषयक कार्यक्रम झालेच नसते. योग हा जीवनशैलीचा भाग आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक उन्नतीसाठी योग हा सर्वोत्तम मार्ग ठरतो. सध्याच्या काळात अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून अगदी जेष्ठापर्यंत नैराश्याने ग्रासलेल्यांचा समावेश होतो.
International Yoga Day 2024: योग ही ऋषीमुनींनी दिलेली सर्वोत्तम देणगी
International Yoga Day 2024 वाढत्या आव्हानाच्या या काळात योग ही ऋषीमुनींनी दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा , ध्यान, समाधी हा चढत्या क्रमाने जाणार अष्टांग योग. यातील प्रत्येक पायरीत अजून उपप्रकारही आहेत. योग म्हणायला गेलात तर क्लिष्ट प्रकार आणि म्हंटला तर एकदम सोपा, आपण कोणत्या दृष्टीनं त्याकडे पाहतो आणि आचरणात कस आणतो, हे महत्वाचे आहे. अष्टांग यो हे अतिशय गहन शास्त्र आहे.
पतंजलि मुनींनी योग विषयाला 195 श्रोकांमध्ये सूत्रबद्ध केले पतंजलीच्या नंतरच्या काळात भारतात सुमारे 1800 प्रकारच्या वेगवेगळ्या योगकला अस्तित्वात होत्या, असेही काही संदर्भ आहेत. थोडक्यात सांगायचे तर गुरु शिष्य परंपरेत योग विषयातील एखाद्या पैलुला ध्येय मानून त्यात अधिक अभ्यास केलेल्या या वेगवेगळ्या परंपरा त्यांना म्हणता येऊ शकते. सध्याच्या काळातील सर्वोत्तम योग मार्ग म्हणजे आपल्याला जे रुचले, भावले, जमेल आणि उपयुक्त ठरेल. तो योगमार्ग निवडावा. मात्र हे करण्यासाठी जे जे योगमार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. योग दिनाची सुरुवात करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना सगळ्यांनीच यासाठी धन्यवाद द्यायला हवे, ते ही राजकीय अधिवेशन बाजूला ठेऊन.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!