India VS Canada
India VS Canada: भारत आणि कॅनडाचे जवळपास वर्षभरापासून संबंध बिघडले आहेत. खलीस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताच्या कथित सहभागाबाबतच्या वादात भारत आणि कॅनडा या दोन्ही देशाच्या संबंधामध्ये तनाव निर्माण झालेला आहे. कॅनडाने भारतावर केलेले आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. यातच कॅनडाने पुन्हा एकदा या प्रकरणाचा उल्लेख करत भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांचा या प्रकरणाच्या तपासात सहभाग असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर भारताने कॅनडातील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना माघारी बोलावून घेत कॅनडाचे आरोप फेटाळून लावले होते.
या हत्येची कॅनडात (India VS Canada) असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा सहभाग होता असा आरोप कॅनडाने केल्यामुळे भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांनी संबंधित राजदूतांची हकालपट्टी केली आहे आणि या घटनेवर तीव्र स्वरूपाचं शाब्दिक युद्धही झालं आहे. या घटनाक्रमामुळे कॅनडात बहुसंख्येने असलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कॅनडामधील ब्रॅम्पटन शहरात न्यूज रिपोर्टसला बोलण्यास घाबरत आहे. आपलं नागरिकत्व किंवा व्हिसा धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटत होती. एका पत्रकार परिषेदत कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन दुडो यांनी हकालपट्टी केलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप लावले. या अधिकाऱ्यांचे हितसंबंध होते आणि कॅनडाच्या भूमीवर गुन्हेगारी कृत्यांना परोथान दिल्याचा आरोप केला.
भारताने त्याला तातडीने प्रत्युत्तर दिले. हे आरोप म्हणजे अत्यंत बिनबुडाचे असून टूडो सरकार मतांसाठी म्हणजेच शीख लोकांच्या मतासाठी राजकारण करत आहे. असा आरोप भारताने केला आहे. त्यानंतर कॅनडाच्या पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेऊन दावा केला की, भारताचा या हत्याकांडात आणि इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे पुरावे त्याच्याकडे आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टूडो यांची जी-7 परिषेदत जूनमध्ये आणि गेल्या आठवड्यात ASEAN परिषेदेत गेल्या शुक्रवारी 11 ऑक्टोबर भेट झाली होती. तसेच कॅनडाच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यानाही देश सोडण्याचे आदेश भारताने दिले.
त्यानंतर आता कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलनी जोरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारताचे उर्वरित राजनैतिक अधिकारी देखील नोटिसवर आहेत. असं मंत्री मेलानी जोळी यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. मेलानी जोली यांनी मॉन्ट्रीयल येथे पत्रकार परिषेद घेत हे भाष्य केलं.
India VS Canada: भारत आणि कॅनडा मधील तणाव
सप्टेंबर 2023 मध्ये टूडो यांनी कॅनडाच्या संसदेत भाषण करताना सांगितले की, भारताने दहशतवादी म्हणून नियुक्ती केलेल्या निज्जरच्या हत्येत भारताचा संबंध असल्याच्या आरोपांचा त्याचे सरकार तपास करीत आहे. 18 जून 2023 रोजी सरे येथील गुरुद्वाराबाहेर निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नवी दिल्लीत जी – 20 शिखर परिषेदेदरम्यान पंतप्रधान मोदींबरोबर द्विपक्षीय बैठक घेण्याच्या काही दिवस आधी टीएनचे हे वक्तव्य आले होते. कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांमुळे दोन्ही देशांत मोठा राजनैतिक वाद निर्माण झाला. त्यानंतर कॅनडाने भारताच्या आरोपांमुळे दोन्ही देशांत मोठा राजनैतिक वाद निर्माण झाला. त्यांतर कॅनडाने भारताच्या एका राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून, त्याला प्रत्युत्तर दिले त्यामुळे दोन देशांमधील तणाव आणखीनच वाढला.
भारताने राजनैतिक उपस्थितीत समानता ठेवण्याचे आवाहन केल्यामुळे कॅनडाला भारतातून आपले 40 राजनैतिक अधिकारी परत बोलवावे लागले. भारताने कॅनेडियन लोकाना व्हिसा देणे तात्पुरते स्थगित केले. भारताने उत्तर अमेरिकेन देशांतील आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकवल्याचे कारण देतकॅनडातील आपले वाणिज्य दूतावास तात्पुरते बाण केले. यापूर्वी कॅनडाच्या एका मिडिया रिपोर्टमध्ये कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेन्स सर्व्हिस (CSIS) या गुप्तचर संस्थेच्या अहवालाविषयी माहिती देण्यात आली होती. त्यात कॅनडातील 2019 आणि 2021 च्या फेरडल निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेप केला गेल्याचा आरोप भरत आणि पाकिस्तानवर करण्यात आला होता. भारताने टॉ आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळला. या आठवड्याच्या सुरुवातीला कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री मेलनिया जोली यांनी त्यांच्या देशाचे भारताबरोबर संबंध सध्या तणावपूर्ण असल्याचे वक्तव्य केले होते.
न्यूज रिपोर्ट नुसार कॅनडामध्ये निज्जरसारख्या आणखीही हत्येचा धोका असल्याचा दावा त्यांनी केला. शुक्रवारी लाओसमध्ये पत्रकारांशी बोलताना टूडो म्हणाले की, कॅनडाला व्यापारी संबंधांसह विविध लोकांशी संबंध विकसित करण्याची गरज आहे. परंतु काही वास्तविक समस्या आहेत आणि त्याचे निराकरण करणेही आवश्यक आहे. आम्ही त्यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत.
India VS Canada: दोन्ही देशांमधील गंभीर परिस्थिति
भारत आणि कॅनडा यांचे संबंध गढूळ झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या दोन दशकांत पाश्चिमात्य देशांशी भारताचे संबंध सुधारले आहेत. त्या पाश्वभूमीवर या घटनाक्रमामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारताचे जी-7 देशांबरोबर व्यापारी आणि राजकीय संबंध आहेत. कॅनडा हा जी-7 देश आहे, नाटोचा सदस्य आहे. अमेरिकेबरोबर त्याचे अगदी जवळचे आर्थिक आणि राजकीय संबंध आहेत. अमेरिकेबरोबर संबंध सुधारले आहेत. ब्रॅम्पटन मध्ये करमजीत सिंह गिल, हे 25 वर्षापूर्वी कॅनडात गेले. त्यांच्या मते फक्त विद्यार्थ्यंनाच नाही तर सामान्य नागरिकांनाही या दोन्ही देशांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका बसणार आहे.
भारत सरकारची एक वेगळी भूमिका आहे आणि कॅनडात पुढच्या निवडणुका होणार आहे. मात्र तिथल्या सांनी नागरिकांना याची फळं भोगावी लागणार आहे. असं करमजीत सिंह गिल म्हणाले.
India VS Canada: भारताची तुलना केली रशिया सोबत
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी यावेळी बोलताना भारताची तुलना रशियाशी केली. जोली यांनी म्हटलं की, कॅनडाच्या राष्ट्रीय पोलिस दलाने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना कॅनडातील हत्या. जीवे मारण्याच्या धमक्या आणि धमकावण्याशी जोडले आहे. आम्ही आमच्या इतिहासात असे कधीही पहिले नाही. आंतरराष्ट्रीय दडपशाहीचा हा स्तर कॅनडाच्या भूमीवर होऊ शकत नाही. हे आपण युरोपात इतरत्र पहिले आहे. रशियाने जर्मनी आणि ब्रिटनमध्ये हे केले आहे. हे आपण युरोपात इतरत्र पाहिले आहे. रशियाने जर्मनी आणि ब्रिटनमध्ये हे केले आहे. आपण या मुद्यावर ठाम असले पाहिजे असं त्यांनी म्हटलं इतर भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना बाहेर काढले जाईल का? असं विचारलं असता त्या म्हणाल्या ते स्पष्टपणे नोटिसवर आहेत. ओटावा येथील उच्चायुक्तांसह सहा जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आम्ही व्हीएन्ना कराराचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही मुत्सद्दीना शन करणार नाही.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!