India U-19 Women Asia Cup Champion
India U-19 Women Asia Cup Champion: नुकताच पुरुष अंडर 19 आशिया कप खेळला गेला, ज्याच्या अंतिम फेरीत बांग्लादेश संघाने टीम इंडियाचा पराभव केला. त्यानंतर 2024 मध्ये अंडर 19 महिला आशिया कपची पहिली आवृत्ती खेळली गेली. त्यामध्ये भारतीय महिला संघाने या पराभवाचा बदला घेतला आहे. महिला अंडर 19 आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी 22 डिसेंबर रोजी झाला. मलेशियातील क्वालालंपुर येथे झालेल्या या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांशी भिडले, पण यावेळी टीम इंडियाने 41 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या महिला संघाने 117 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ 76 धावांवर गडगडला. महिलांसाठी स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती.

सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीचे दोन विकेट्स, मागोमाग गमावले. पण कर्णधार निकी प्रसाद व जी त्रिशाने तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. निकी 12 धावांचे योगदान दिले, तर सलामीवीर जी त्रिशाने सामन्यात अर्धशतक ठोकले. तिने 5 चौकार व 2 षटकरांसह 47 चेंडूत 52 धावांची खेळी केली. भारताने बांग्लादेशला विजयासाठी 118 धावांचे आव्हान दिले. भारतीय फलंदाजांनी बांग्लादेशचा डाव 18.3 षटकांत अवघ्या 76 धावांवर गुंडाळला. बांग्लादेशच्या अवघ्या दोन खेळाडूंनी दुहेरी धावा केल्या. सामन्यात आयूषी शुक्लाने बांग्लादेशचे 3 विकेट्स घेतल्या. पौर्णिका सीसोडिया व सोनं यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेण्यात यश आले. तर जोशीथा व्हिजेने 1 विकेट घेता आला.
India U-19 Women Asia Cup Champion: बांग्लादेश फलंदाजांची सुरुवातच खराब
बांग्लादेश महिला संघाची सुरुवात खराब झाली. जेव्हा मोसम्मत इवा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली. बांग्लादेशचे दोनच फलंदाज असे होते जे दुहेरी आकडा गाठण्यात यशस्वी ठरले. यामध्ये फहमीदा चोया (18 धावा) आणि झुरिया फिरदौस (22 धावा) यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला चांगली फलंदाजी करता आली नाही. बांग्लादेशने 55 धावांत केवळ 4 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली.

भारतीय महिला गोलंदाजांनी चमत्कार केला
- अंतिम सामन्यात बांग्लादेश संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. मात्र भारतीय संघाचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. त्रिशाच्या 47 चेंडूत 52 धावांच्या खेळीमुळे जी संघाला 117 धावा करता आल्या. धावा वाचवण्याची जबाबदारी भारतीय गोलंदाजांवर होती, टि त्यांनी चोख बजावली. छोटी धावसंख्या वाचवताना विजो जोशिताने दुसऱ्याच षटकात पहिले यश मिळवून दिले.
- पाचव्या षटकात 24 धावांवर पारुनिका सीसोडियाने दूसरा धक्का दिला त्यानंतर बांग्लादेशीने 20 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सोनम यादवने एक विकेट घेत सामन्यातील भारताची पकड मजबूत केली. यानंतर बांग्लादेश संघाला सावरता आले नाही आणि पुढील 32 धावा करण्यासाठी उर्वरित 7 विकेट गमावल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने 8 चेंडू शिल्लक असताना 41 धावांनी सामना जिंकला.
- भारतीय सलामीवीर जी त्रिशाला अंतिम सामन्यात अर्धशतक झळकवल्याबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पहिल्या डावात जेव्हा टीम इंडियाची दमछाक झाली तेव्हा त्याने जबाबदारी घेतली. ती एका टोकाला चिकटून राहिली. इतकंच नाही तर त्रिशाला तिच्या उत्कृष्ठ कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणूनही निवडण्यात आलं. ती या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे.
- त्रिशाने 5 डावात 120 च्या स्ट्राइक रेटने आणि 53 च्या सरासरीने 59 धावा केल्या. अंतिम सामन्यात आयूषी शुक्लाने 3.3 षटकात 17 धावा देत 3 बळी घेतले आणि ती या स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. तिने 5 सामन्यात 10 विकेट घेतल्या. अंतिम फेरीत सोनम यादवने 2 पारुनिका सीसोडिया 2 आणि जोशिताने 1 बळी घेत त्यांना साथ दिली.
India U-19 Women Asia Cup Champion: दोन्ही संघाची प्लेइंग 11
बांग्लादेश संघ: सुमैया अक्तर (कर्णधार), सुश्री इवा, फाहोमीदा चोया, हबिबा इस्लाम पिंकी, जुएरिया फिरदौस, फरजाना इस्मिन, अनिसा अक्टर सोबा, सुमैया अक्तर सुबोर्णा, निशिता अक्टर निशी, जनाना मौआ, सादिया अक्तर.
भारतीय संघ: निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके, जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), ईश्वरी अवसरे, मीचीला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सीसोडिया, आयूषी शुक्ला, एमडी शबनम.

India U-19 Women Asia Cup Champion: आयूषी शुक्ला ची दमदार गोलंदाजी
भारताकडून आयूषी शुक्ला हीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्यांच्याशिवाय पुरुनिका सीसोडिया आणि सोनम यादव यांनी 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. या गोलंदाजांनी बांग्लादेशच्या फलंदाजांना एक पण संधी दिली नाही त्यामुळे बांग्लादेशचा संपूर्ण संघ 76 धावांत ऑल आउट झाला. 19 वर्षाच्या गोंगडी त्रिशा भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली. तिने 47 चेंडूत 52 धावांची खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. कर्णधार निक्की प्रसादने 12 धावा केल्या. मिथीला विनोदने 17 धावांचे योगदान दिले. या खेळाडुंमुळेच टीम इंडिया 100 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरली. दुसरीकडे बांग्लादेशकडून फरझाना इस्मिनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.