Independence Day Speech Marathi
Independence Day Speech Marathi: 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी जर त्यांच्या शाळेतील भाषणाची (Independence Day Speech Marathi) तयारी करत असतील तर त्यांना येथे महत्वाच्या माहिती मिळेल. या लेखात दिलेले मुद्दे व्यवस्थित वाचा. भाषणाची सुरुवात कशी करावी. भाषण करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे तसेच कोणत्या बाबींवर भर दिला पाहिजे ही माहिती जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..
हा दिवस देशाच्या स्वातंत्र्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्ष त्याग आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. 15 ऑगस्ट हा तो दिवस आहे. ज्या दिवशी इंग्रजांच्या 200 वर्षाच्या गुलामगिरीतुन भारताची सुटका झाली. 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिन भारताच्या राजकीय इतिहासात सर्वात महत्वाचा आहे. या निमित्ताने देशभरातील शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालयात स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजलि वाहिली जाते आणि तिरंगा ध्वज फडकवला जातो. तुम्हालाही स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभावी भाषण (Independence Day Speech Marathi) करून लोकांची वाह वाह मिळवायची असेल तर तुमच्यासाठी आम्ही येथे एक भाषणाचा नमूना डेट आहोत. तुम्ही ही कल्पना घेऊन किंवा हे भाषण करून लोकांची प्रशंसा मिळवू शकता.
Independence Day Speech Marathi: भाषणाची सुरुवात करण्यासाठी काही मुद्दे
1) आदरणीय माझे शिक्षक, प्रिय बंधु आणि भगिनींनी.. मी तुम्ही सर्वाना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझ्या भाषणाची सुरुवात करू इच्छितो! ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस आज आपण साजरी करत आहोत. हा दिवस खूप महत्वाचा आहे करण आपण आपल्या पूर्वजांच्या यमी महान क्रांतिकारकांचा बलिदानाचा सन्मान करतो. अशा परिस्थितीत आज आपल्याला नागरिक म्हणून एकता दाखवून प्रगतीच्या दिशेने काम करण्याची गरज आहे. आपल्या देशाच्या विकासात सकारात्मक योगदान देण्याचा संकल्प आज आपण करुयात,. आजच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा! जय हिंद!
2) माझ्या सर्व प्रियजणांना नमस्कार, आज 15 ऑगस्ट रोजी आपण भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. आपल्या लाडक्या देशाला ब्रिटिश राजवटी पासून कसे स्वातंत्र्य मिळाले हे आपल्या सर्वाना माहीत आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शौर्याने लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा आपण सर्वजण आदर करतो. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजनी नायडू आदि नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व निर्धाराने केले आणि देशाला सशक्त लोकशाहीची भेट दिली आहे.
3) तुम्हा सर्वाना शुभ सकाळ किंवा सर्वात सुप्रभात! आपण आज भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा दिवस आपल्याला आपल्या पूर्वजांच्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो. या ऐतिहासिक प्रसंगी आपण एकता, विविधता आणि प्रगतीची मूल्ये जपण्याची शपथ घेऊ. जय हिंद!
Independence Day Speech Marathi: स्वातंत्र्यदिनी कस हे प्रभावी भाषण
सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. (Independence Day Speech Marathi) आज आपण देशाचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आलो आहोत. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या जयंती उत्सवात मग्न झाला आहे. यावर्षी भारत सरकार ‘नेशन फस्ट, ऑलवेज फस्ट’ या थीमखाली स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी सरकार अनेक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. ज्यात स्वातंत्र्य चळवळीचा असा आणि संघर्षाची झलक दिसेल.
मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या देशाला 200 वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतुन स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या राजवटीत देशातील जनतेवर अनेक अत्याचार झाले. देशातील जनतेला ब्रिटिश राजवटी मुक्त करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. अशा परिस्थितीत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या त्या महान क्रांतीकारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, मंगल पांडे, राजगुरू, सुखदेव, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक यांसारख्या अनेक क्रांतीकारकांचे आणि स्वातंत्र्यसैनिकांचे देश स्वातंत्र्य करण्यात महत्वाचे योगदान आहे. हा दिवस या सर्व क्रांतीकारकांना आणि स्वातंत्र्यसैनिकांसमोर नतमस्तक होण्याचा आणि त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे.
या दिवशी देशाचा प्रत्येक भागात राष्ट्रध्वज फडकावला जातो. मात्र राष्ट्रीय स्तरावरील मुख्य कार्यक्रम दिल्लीतील लाल किल्ल्यावर होतो. स्वातंत्र्यदिनी, देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुण जनतेच्या शुभेच्छा स्वीकारतात, राष्ट्रध्वज तिरंगा फडकवतात आणि 31 तोफाची सलामी दिली जाते. यानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतात. पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी सकाळपासूनच लोक लाल किल्ल्यावर दाखल होऊ लागलात. आपल्या भाषणात पंतप्रधान भविष्यातील योजना सांगतात आणि देशाच्या उपलब्धीचीही माहिती देतात. या कार्यक्रमात लष्कराच्या जवानांकडून पंतप्रधानांना सलाम दिली जाते. या कार्यक्रमात आर्मी ब्रँडचे सुर ऐकण्यासारखे आणि मन मोहून टाकणारे असतात.
मित्रांनो! 15 ऑगस्ट हा (Independence Day Speech Marathi) दरवर्षी येतो आणि आपल्या हृदयात आणि मनात आपण स्वातंत्र्य आहोत आणि मुक्त राहू ही भावना जागृत करत राहतो. हा सर्वात मोठा राष्ट्रीय सण राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाचा स्फुरण निर्माण करतो. वर्षभरात राष्ट्राने काय गमावले आणि काय मिळवले याचा हिशोब या दिवशी सांगितले जातो. भारतमातेसाठी आणि भारताच्या स्वतंत्र सत्तेसाठी कर्तव्याची भावना या निमित्ताने जागृत होते. या खास प्रसंगी चला राष्ट्रध्वजापुढे नतमस्तक होऊ या. राष्ट्राच्या कल्याणासाठी आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करूया. देशाच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी सदैव समर्पित राहण्याची शपथ घेऊया.
रंग बलिदानाचा त्या तिरंग्याचा पहावा..
उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा..
जयघोष भारताचा असमंती गुंजारा..
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा..
जय हिंद! जय भारत! वंदे मातरम! भारत माता की जय!
असे शब्द कानावर पडले की आपोआप आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटू लागतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाचे अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, कृषि, आरोग्य, शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु त्याचबरोबर अनेक समस्या ही आपल्या देशाला बेडसावत आहे. महागाई, भ्रष्टाचार, जातीवाद , व्यसनाधीनता, अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्यासमोर उभे आहेत. अनेक अडचणीवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना समोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजे. तरच आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!