विद्यार्थ्यांसाठी खास स्वातंत्र्य दिवसाविषयी घोष वाक्य, जी उपस्थितांच्या कायम लक्षात राहील

Independence Day Slogans in Marathi

Independence Day Slogans in Marathi: यावर्षी 15 ऑगस्ट रोजी भरत आपला 78 व स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला आणि देशातील जनतेने इंग्रजांच्या 150 वर्षाहून अधिक काळाच्या गुलामगिरी नंतर मोकळा श्वास घेतला. तेव्हापासून दरवर्षी देशात सर्व धर्म आणि जातीचे लॉक एकत्र येऊन अतिशय उत्साहात आणि आनंदात स्वातंत्र्यदिन साजरा करतात. स्वातंत्र दिन हा केवळ दिवस नाही तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या शतकानुशतकांच्या संघर्षाचे, बलिदानाचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे.

देशांचे पंतप्रधान दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्या वरून देशाला संबोधित करतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 11 व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांना श्रध्दांजली वाहिली जाते आणि शाळा, सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये तिरंगा ध्वज फडकवला जातो. स्वातंत्र्यदिन अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमात भाषण केली जातात आणि निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाते. तुम्ही देखील 15 ऑगस्टसाठी घोष वाक्य शोधत असाल तर येथे आम्ही तुमच्यासाठी अतिशय प्रभावी घोष वाक्य (Independence Day Slogans in Marathi) घेऊन आलो आहेत.

Independence Day Slogans in Marathi
Independence Day Slogans in Marathi

Independence Day Slogans in Marathi: स्वातंत्र्य दिवसाविषयी घोष वाक्य-

  • स्वातंत्र्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच.
  • तिरंग्याचा रंगच न्यारा, त्यातच तर आहे देश सारा.
  • जय जवान, जय किसान.
  • बळसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो.
  • देऊन आपल्या प्राणाचे बलिदान, सैनिक राखती आपल्या देशाचा अभिमान.
  • भारत माता की जय.
  • आराम हराम आहे.
  • देश प्रेम फक्त एका दिवसाकरिता मर्यादित नसावं, ते कायम आपल्या मनात असाव.
  • ठेऊन आपल्या एकीचे भान राखूया आपल्या देशाची क्षण.
  • ना कोणी मोठा ना कोणी लहान, आपला देश तर आहे विश्वात महान.
  • आकाशी असती एक असा तारा, जसा पृथ्वीवर असे देश आमचा प्यारा.
  • उंचच्या उंच तिरंगा लहरुया, देशाची शान वाढवूया.
  • माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू जिंकू किंवा मरू.
  • देवून आपल्या प्राणाचे बलिदान राखती, आपल्या देशाची शान असा आमचा वीर जवान.
  • आपले स्वातंत्र्य आपले संविधान, भारतीय असल्याचा असावा अभिमान.
  • येथे नांदती सुख, शांती आणि समृद्धी, यातूनच मिळतो देशाला गती.
  • सैनिक असती देशाची शान, ते तर राखती देशाची मान.
  • करा किंवा मरा.
  • करूया वंदन तिरंग्याला जो देशाची शान आहे. उंचच्या उंच लहरू याला जो पर्यंत देहात प्राण आहे.
  • या भारतात बंधुभाव नीती वासू दे, दे वरची असा दे.
  • हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे.
Independence Day Slogans in Marathi

Independence Day Slogans in Marathi: भारतीय ध्वजाची विशेषता

आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजात चार प्रकारचे रंग असून त्या प्रत्येक रंगाची आपली एक विशेषता आहे. राष्ट्रध्वजा संबंधी इतिहास आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या 24 दिवस आधीच म्हणजे 22 जुलै 1947 साली राष्ट्रध्वजाला मान्यता देण्यात आली. तिरंग्याची रचना बंगालमधील मछली पट्टणम जवळ जन्मलेल्या व्येंकय्या पिंगली यांनी केली आहे. राष्ट्रध्वजात ती आडवे पट्टे असून त्यांचा रंग केशरी, पांढरा व हिरवा स्वरूपात आहे. त्यांच्या मध्यभागी निळ्या रंगाचे एक अशोक चक्र आहे. त्यावर 24 आर्य आहेत. ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे प्रमाण 2:3 या स्वरूपात आहे. ध्वज हा केवळ खादी किंवा रेशीम कापडा पासून बनविला जावा असा सरकारी नियम आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सविस्तर वर्णन केलं आहे.

तिरंग्यावरील वरच्या भागात केशरी रंग आहे. केशरी रंग हा धैयाचे प्रतीक मानला जातो.

खालील भागात पांढरा रंग असून तो रंग शांततेच प्रतीक मानला जातो या रंगातून शांती, सत्य व पावित्र्याचा बोध होतो.

ध्वजाच्या खालील भागात गर्द हिरवा रंग आहे. हा रंग निसर्गाशी व भूमिशी असलेलं आपलं नात दर्शवितो.

या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे 24 आर्य असलेलं आर्य चक्र आहे. हे चक्र गतीचे प्रतीक असून ते आपल्या देशाला गतीने पुढे जाण्याचा संदेश देते.

Independence Day Slogans in Marathi

Independence Day Slogans in Marathi: 15 ऑगस्ट दिनाचे महत्व

आपल्या भारत देशात दरवर्षी 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व म्हणजेच ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला इंग्रजांची हुकुमशाही पासून मुक्त केलेल्या त्यागांची आठवण करून देतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांपासून स्वतंत्र झाल्यानंतर, जगात भारत देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश बनला. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर भारताचे स्वातंत्र्याच्या श्वास घेतला. या दिवशी इंग्रजांच्या ध्वज उतरवून भारतीय ध्वजारोहण करण्यात आले त्यामुळे त्या दिवशी देशभरात अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला जातो. 15 ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते, आणि या दिवशी पंतप्रधान ध्वजारोहण करतात. कारण पंतप्रधान देशातील राजकीय प्रमुख असतो.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीमधील असलेला लाल किल्ल्यावर असलेले गेटच्या माथ्यावरून भारतीय ध्वजारोहण केले जाते. या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशातील नागरिकांना संबोधित करतात.

तुमच्या प्रियजणांना द्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (Independence Day Wishes WhatsApp Status in Marathi)

Independence Day Slogans in Marathi

  1. ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, माणुसकी धर्म आहे या देशाच्या, फक्त देशासाठी जगा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  2. रंग, रूप, वेश, भाषा जारी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत. 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  3. अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भष्टाचारमुक्त भारत करूया.
  4. दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. कधीच ण संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देश धर्म. Happy Independence Day
  6. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे.
  7. सूर्यनारायण जर उगवले नसते तर, आकाशाच्या रंग समजला नसता, जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरच हिंदू धर्माच्या अर्थ समजला नसता.
  8. जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थ काय.
  9. सर्वानी जपा एकमेकांचे सुख तेव्हाच सुंदर होईल आपला देश हॅपी 15 ऑगस्ट.
  10. हे सैनिका तुझ्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे, संपूर्ण जनतेला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. वंदे मातरम भारत माता की जय.
  11. सारे जहासे अच्छा हिंदुस्थान हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलसीता हमारा.
  12. सैदेव फडकत राहो तिरंगा आपुला, सर्व जगातील प्रिय देश आपुला.
  13. देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.
  14. गावात काय घेऊन बसलात आम्ही तर आमच्या वागणुकीतूनच जगाला ओळख पटवून देतो भारतमातेच्या लेकी
  15. जे देशासाठी फासावर चढले आणि छातीवर गोळ्या झेलल्या त्या शहिदांना आम्ही वंदन करतो. Happy Independence Day

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!