भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय 100 धावांनी मैदान मारले, विजयाची प्रमुख कारणं जाणून घ्या

IND vs ZIM 2nd T20I

IND vs ZIM 2nd T20I: टीम इंडियाने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या टि-20 सामन्यात झालेल्या पहिल्या परभवाचा बदला घेतला पहिल्या टि-20 सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. टीम इंडियाने आक्रमक फलंदाजी करत 20 षटकात 2 गाडी गमावून 234 धावांची मोठी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18.4 षटकात केवळ 134 धावाच करू शकला. ज्यामुळे भारतीय संघाने 100 धावांनी सामना जिंकला या शानदार विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल खूप आनंदी दिसत होता.

आपल्या पहिल्या टि-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते न् उघडताच पव्हेलियन मध्ये परतलेल्या अभिषेक शर्माने दुसऱ्या सामन्यात सर्व कसर भरून काढली. त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धुलाई करत 46 चेंडूत वादळी शतक झळकावळे. त्यांचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे. तो भारतासाठी टि-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावनाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. सलामिला आलेल्या अभिषेक शर्माने अवघ्या 46 बॉल मध्ये 7 चौकार आणि 8 षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर अभिषेक शर्माने रोहित शर्माचा एक खास विक्रम मोडला.

IND vs ZIM 2nd T20I
IND vs ZIM 2nd T20I

या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. भारताने अभिषेक शर्माच्या वादळी शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेचा 100 धावांनी धुव्वा उडवला या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक-ऋतुराज च्या 137 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 2 गाडी गमावून 234 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघ 18.4 षटकात 134 धावांवर गारद झाला. त्याचबरोबर मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

IND vs ZIM 2nd T20I: अभिषेक-ऋतुराजची जबरदस्त भागीदारी

अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी 137 धावांची उत्कृष्ट भागीदारी करत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. अभिषेकने 47 चेंडूत 100 धावा केल्या, तर दुसरीकडे ऋतुराज गायकवाडने 47 बॉल मध्ये 77 धावा केल्या. या शानदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या खेळात 234 धावा केल्या होत्या. यजमान झिम्बाब्वे जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा संघाला खराब सुरुवातीच्या धक्क्यातून सवरता आले नाही.

IND vs ZIM 2nd T20I

वेस्ली मधवेरेने खूप प्रयत्न केले, पण तो 39 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. 235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाला पहिल्याच षटकातच मुकेश कुमारने इनोसेट कैयाला अवघ्या 4 धावांवर क्लीन बोल्ड केल्याने मोठा धक्का बसला वेस्ली मधवेरे आणि ब्रायन बेनेट यांनी मिळून 36 धावांची भर घातली असली तरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना बेनेट मुकेशच्या गोलंदाजीवर बॅड झाला. एकेकाळी झिम्बाब्वेची धावसंख्या एक विकेटवर 40 धावा होती, पण पुढच्या 6 धावांतच संघाने 3 महत्वाच्या विकेट्स गमावल्या.

IND vs ZIM 2nd T20I: अभिषेकने मोडला रोहित शर्माचा विक्रम

झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने त्याच्या डावात 8 षटकार ठोकले. ज्यामुळे तो 2024 मध्ये टि-20 क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. यावर्षी टि-20 मध्ये रोहित शर्माने एकूण 46 षटकार मारले होते. मात्र आता अभिषेकच्या नावावर एकूण 50 षटकार झाले आऊन तो रोहित शर्माच्या पुढे गेला आहे. विराट कोहलीने 2024 मध्ये एकूण 45 षटकार मारले होते. त्याचबरोबर टि-20 क्रिकेटमध्ये शतक झळकवणारा 10 व भारतीय फलंदाज ठरला आहे.

एका पाठोपाठ विकेट्स गमावल्यामुळे झिम्बाब्वेला फटका

दुसऱ्या टि-20 सामन्यात झिम्बाब्वे ने एकाच वेळी अनेक विकेट्स गामावल्या. एका विकेटवर 40 धावांवरुण संघाची धावसंख्या 4 गाडी बॅड करून 46 अशी झाली. कर्णधार सिकंदर रझालाही केवळ 4 धावा करता आल्या झिम्बाब्वे सोबतच्या एकाच सामन्यात दुसऱ्यांदा असे घडले की संघाने 4 गडी गमावून 72 धावा केल्या होत्या. पण इथून झिम्बाब्वे ने 4 धावतच 3 विकेट्स गमावल्या एकाच वेळी बसलेल्या अनेक धक्क्यातून संघ सवरू शकला नाही.

आम्हाला आधीच माहीत होतं आज काय होणार आहे

शुभमन गिल पुढे म्हणाला माझ्या मते पहिल्या सामन्यात दबाव असणे नक्कीच चांगले होते. आम्हाला माहीत होतं की आज होणार आहे. मला अशा आहे की आगामी सामन्यांमध्ये फलंदाज अशीच कामगिरी करतील. आम्हाला अजून तीन सामने सामने IND vs ZIM 2nd T20I खेळायचे आहेत आणि आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत हरारे येथे भारताचा 100 धावांनी विजय हा टीम इंडियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर या मैदानावर झिम्बाब्वे विरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया 229/2 धावा केल्या होत्या.

IND vs ZIM 2nd T20I: दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकिपर), वेलींग्टन् मसाकाडझा, ल्युक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!