IND vs SL Squad 2024
IND vs SL Squad 2024: भारतीय संघ हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात तीन वनडे आणि तीन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडिया ची निवड झाली आहे. गौतम गंभीर कोच झाल्यानंतर हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आतातपर्यंत याबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात येणार आहे. टि-20 (IND vs SL Squad 2024) संघाचे कर्णधार पद सूर्यकुमार यादव कडे दिले गेले आहे. पण हार्दिक पांड्याचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे आता पांड्याला मोठा धक्का बसला आहे. टि-20 मालिकेसाठी पांड्याला कॅप्टनसी दिली नाही अन् व्हाईस कॅप्टनसी देखील दिली गेली नाही.
तर वनडे मालिकेत देखील हार्दिक पांड्याला नारळ मिळालाय. वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा कॅप्टन असेल, तर शुभमन गिल व्हाईस कॅप्टन असणार आहे. शुभमन गिल याला दोन्ही मालिकेत व्हाईस कॅप्टनसी देण्यात आलीय. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या चर्चाना पूर्णविराम लागलाय. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टि-20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्या नंतर भारतीय क्रिकेटमध्ये वेगाने हालचाली झाल्या. त्यात राहुल द्रविड यांच्यानंतर गौतम गंभीर यानं मुख्य कोच म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यामुळे भविष्यातील भारतीय संघाची मोट वेगळ्या पद्धतीने बाधली गेली आहे. तसेच काहीसे श्रीलंका दौऱ्यातील टीम इंडियाच्या निवडीनंतर समोर आले आहे.
पण आता मिळालेल्या वृत्तानुसार, श्रीलंका दौऱ्यातून विराट कोहली आणि जसप्रीत बूमराह यांना ब्रेक दिल जाऊ शकतो. पण समोर आलेल्या रिपोर्टनुसार, विराट कोहली आणि जसप्रीत बूमराहला दिल्या जाणाऱ्या ब्रेकमुळे गौतम गंभीर नाखुश आहे.
श्रेयश अय्यर आणि केएल राहुलचं कमबॅक
देशांतर्गत क्रिकेट न् खेळल्यामुळे श्रेयश अय्यरला बीसीसीआय च्या करारातून वगळण्यात आले होते. इंगलंडविरोधात मायदेशात झालेल्या मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक झाली होती. पण आयपीएल 2024 मध्ये त्यानं आपल्या नेतृत्वाचा कोलकाता नाइट राइडर्सला चॅम्पियन केले होते. श्रेयश अय्यर आणि गौतम गंभीर यांचे संबंधही चंगळे आहेत. कोलकात्यासाठी दोघांनी एकत्र काम केलंय. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात श्रेयश अय्यरचे कमबॅक होऊ शकते, असं अंदाज वर्तवला जातोय. केएल राहुलही मोठ्या कालावधीनंतर टीम इंडिया परतण्याची शक्यता आहे. जानेवारी 2024 मध्ये इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी मालिकेनंतर त्यानं कोणताही सामना खेळलेला नाही रिपोर्टसनुसार आता श्रीलंके विरोधात केएल राहुल संघात कमबॅक करू शकतो.
IND vs SL Squad 2024
भारताचा टि-20 संघ | एकदिवसीय संघ |
---|---|
सूर्यकुमार यादव (कर्णधार) | रोहित शर्मा (कर्णधार) |
शुबमन गिल (उप कर्णधार) | शुबमन गिल (उप कर्णधार) |
यशस्वी जैस्वाल | विराट कोहली |
रिंकू सिंग | केएल राहुल (यष्टीरक्षक) |
रियान पराग | ऋषभ पंत (यष्टीरक्षक) |
ऋषभ पंत (यष्टीरक्षक) | शिवम दुबे |
संजू सॅमसन (यष्टीरक्षक) | कुलदीप यादव |
हार्दिक पांड्या | श्रेयश अय्यर |
शिवम दुबे | वॉशिंग्टन सुंदर |
अक्षर पटेल | अर्शदीप सिंग |
वॉशिंग्टन सुंदर | रियान पराग |
रवी बिश्नोई | अक्षर पटेल |
अर्शदीप सिंग | खलील अहमद |
खलील अहमद | हर्षित राणा |
मोहम्मद सिराज | मोहम्मद सिराज |
IND vs SL Squad 2024: रोहित कडून गिल खूप काही शिकू शकतो
गौतम गंभीर यानं कोच म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शुभमन गिल याचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. टि-20 विश्वचषकानंतर शुभमन गिल याचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. गिलच्या नेतृत्वातिल युवा टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 4-1 असं विजय मिळवला. श्रीलंका दौऱ्यासाठी गिलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात शुभमन गिल आता फक्त 24 वर्षाचा आहे, क्रिकेटमधील बारकावे शिकण्यासाठी त्याच्याकडे खूप वेळ आहे. त्यामुळे रोहित शर्मा जेव्हा क्रिकेटला रामराम करेल, तेव्हा शुभमन गिल परिपक्व झालेला असेल.
शुभमन गिल याला दोन्ही संघाचे उपकर्णधार पद
श्रीलंका दौऱ्यासाठी केएल राहुल याला राहुल याला वनडे संघाचा कर्णधार करण्यात येईल, अशा बातम्या येत होत्या. पण गौतम गंभीरच्या आग्रहानंतर रोहित शर्माने श्रीलंका दौऱ्यात वनडे खेळण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा परतल्यानंतर केएल राहुल याला उपकर्णधार केलं जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण केएल राहुल यालाही डावलण्यात आले. शुभमन गिल याने आयपीएल 2024 मध्ये गुजरातचे नेतृत्व केले होते. तिथे त्याला आशीष नेहराकडून अनेक डावपेच शिकता आले आहेत. दुर्दैवी पणे गिलच्या नेतृत्वात गुजरातला आयपीएल 2024 मध्ये आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल. पण हा कठीण काळ शुभमन गिल याला भविष्यात कामाला येऊ शकतो. श्रीलंका दौऱ्यात शुभमन गिल यांच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देऊन भविष्यातील कर्णधाराचे संकेत देण्यात आले आहेत.
टि-20 संघाचा कर्णधार बनताच सूर्याचा जुना VIDEO व्हायरल
तेव्हा सूर्या म्हणाला होता की, मि या नव्या भूमिकेचा आनंद घेत आहे. मी सर्वासोबत वेळ घळवण्याचा आनंद घेत आहे आणि आम्ही सर्वानी खूप फ्रँचायझी आणि देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे त्यांची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेणे कठीण नाही. आम्ही मैदनाबाहेर बराच वेळ घालवतो, त्यामुळे मैदानावर आमचा समन्वय चांगला असतो.
या व्हिडिओत सूर्या पुढे म्हणाला होता की, माझ्यासाठी गोष्टी सोप्या ठेवणे महत्वाचे आहे. मी प्रक्रियेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मला गोष्टी सोप्या ठेवायला आवडतात आणि मी तसा प्रयत्न करतो. त्याचबरोबर प्रत्येकाला सांगतो. की गोष्टी खरोखर सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्त काही करण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे दाखवण्यात प्रयत्न करू नका. झिम्बाब्वे विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टि-20 मालिकेत मेन इंन ब्लुचे नेतृत्व करणारा शुभमन गिल हा श्रीलंके विरुद्धच्या आगामी तीन सामन्याच्या टि-20 विश्वचषकात उपकर्णधार आहे. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात आणि यंदाच्या टि-20 विश्वचषकात उपकर्णधार असलेला अष्टपैलू हार्दिक पांड्याला नेतृत्वाच्या भूमिकेतून मुक्त करण्यात आले आहे.
भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात विश्रांती दिल्यानंतर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभपंत यांनाही श्रीलंके विरुद्धच्या टि-20 संघात बोलवण्यात आले आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!