ICC Champions Trophy 2025 Schedule
ICC Champions Trophy 2025 Schedule: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हा बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी ही 19 फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून 9 मार्च रोजी त्यांचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. पण भारत आणि पाकिस्तानचे सामने, तसेच भारताचे सर्व सामने हे यूएई मधील दुबई शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. आयसीसीने याबाबतची माहिती सोशल मिडियावरून दिली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारीला (ICC Champions Trophy 2025 Schedule) दुबईत होणार आहे. तर यजमान पाकिस्तानमधील रावलपिंडी, कराची आणि लाहोर या तीन शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जाणार आहेत. पाकिस्तान मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिली नाही. यामुळे बीबीसीआय ने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्याची मागणी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डामध्ये या मुद्यावरून वाद सुरू होता. त्यामुळे स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुमारे महिनाभराचा विलंब झाला. आता स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळण्यास सहमति दिल्यानंतर आयसीसीनेही वेळापत्रकाला मान्यता दिली आहे.
पाकिस्तान विरुद्धचा सामना हा या स्पर्धेतील भारताचा दूसरा सामना असेल. हा सामना 23 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून दुबई आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर 2 मार्च 2025 रोजी भारतीय संघ तिसरा आणि शेवटचा साखळी सामना खेळेल. दरम्यान उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 मार्चला आणि अंतिम सामने 9 मार्चला होतील. भारतीय संघापले सर्व सामने दुबईत खेळणार आहे.
ICC Champions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकातील ठळक मुद्दे
- भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. जर भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला तर फायनल दुबईमध्ये होईल.
- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 9 मार्चला जर सामना खेळवला गेला नाही तर 10 मार्चला सामना होऊ शकतो.
- चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व समनेभरतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळवले जातील.

ICC Champions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक
तारीख | सामने | स्टेडियम |
---|---|---|
1) 19 फेब्रुवारी 2025 | पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड | नॅशनल स्टेडियम, कराची |
2) 20 फेब्रुवारी 2025 | बांग्लादेश विरुद्ध भारत | दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई |
3) 21 फेब्रुवारी 2025 | अफगाणिस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका | नॅशनल स्टेडियम, कराची |
4) 22 फेब्रुवारी 2025 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड | गद्दाफी स्टेडियम, लाहोर |
5) 23 फेब्रुवारी 2025 | पाकिस्तान विरुद्ध भारत | दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई |
6) 24 फेब्रुवारी 2025 | बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड | रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावलपिंडी |
7) 25 फेब्रुवारी 2025 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका | रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावलपिंडी |
8) 26 फेब्रुवारी 2025 | अफगाणिस्थान विरुद्ध इंग्लंड | गद्दाफी स्टेडियम, लाहोर |
9) 27 फेब्रुवारी 2025 | पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश | रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावलपिंडी |
10) 28 फेब्रुवारी 2025 | अफगाणिस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया | गद्दाफी स्टेडियम, लाहोर |
11) 1 मार्च 2025 | दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड | नॅशनल स्टेडियम, कराची |
12) 2 मार्च 2025 | न्यूझीलंड विरुद्ध भारत | दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई |
13) 4 मार्च 2025 | उपांत्य फेरी 1 | दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई |
14) 5 मार्च 2025 | उपांत्य फेरी 2 | गद्दाफी स्टेडियम, लाहोर |
15) 9 मार्च 2025 | फायनल | गद्दाफी स्टेडियम, लाहोर |
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकुन 8 संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडियासह एकुन 3 आशियाई संघ आहेत. टीम ए मध्ये इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. तर टीम बी मध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्थान आणि इंग्लंडचा समावेश आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सलामीचा सामना हा यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात 2 मार्चला इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत.
प्रत्येकी संघ साखळी फेरीतील 3-3 सामने खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातील पहिले 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतून 2 संघ अंतिम फेरीत पोहचवतील. तर अंतिम सामन्यानंतर विश्व विजेता ठरेल.
भारत आणि पाकिस्तानमध्ये हायब्रिड मॉडेलवर करार
भारत आणि पाकिस्तानने 2024 ते 2027 या कालावधीत होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ICC स्पर्धांसाठी संकरीत मॉडेलवर सहमती दर्शवली आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरील गतिरोध संपल्याचे म्हंटले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी भारत पाकिस्तानला जाणार नाही, तसेच भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धांमध्ये भारताबरोबर पाकिस्तानचे समानेही तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. हा करार 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या पुरुषांची चॅम्पियन्स ट्रॉफी, 2025 मध्ये भारतात होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषक आणि 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या पुरुषांच्या T20 विश्वचषकसाठी लागू होईल. असे मानले जात आहे की 2028 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या महिला टि 20 विश्वचषकालाही हे लागू होऊ शकते.

ICC Champions Trophy 2025 Schedule: भारताचे सामने दुबईत
बीसीसीआयने टीम इंडियाला सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे आयसीसीने काही दिवसांपूर्वी या स्पर्धेचे आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. टीम इंडियाचे साखळी फेरीतील तिन्ही सामने हे दुबईत होणार आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना हा दुबई तर दूसरा सामना हा लाहोरमध्ये होणार आहे. तसेच टीम इंडिया फायनलला पोहचली तरच हा सामना दुबईतच होईल अन्यथा लाहोरमध्ये महाअंतिम सामन्याचा थरार रंगेल. सर्व सामने हे डे नाइट असणार आहेत.
दरम्यान सऱ्यांचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याकडे लागून आहे. उभयसंघातील हा बहुप्रतीक्षित सामना 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुबईत होणार आहे.
अफगाणिस्थानची पहिलीच वेळ
अफगाणिस्थान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी ही पहिलीच वेळ असणार आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील अव्वल 7 संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच तिकीट मिळवलं. तर पाकिस्तानला यजमान असलेल्या संधी मिळाली आहे. तर श्रीलंका आणि विंडीजला टॉप 7 मध्ये राहण्यास अपयश आल्याने ते चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळू शकणार नसल्याचं तेव्हाच स्पष्ट झालं आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!