HSC Result 2024 Maharashtra Board
HSC Result 2024 Maharashtra Board: महाराष्ट्र बोर्ड 12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे इयत्ता 12 विचा निकाल आज मंगळवार 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्या नंतर तो mahresuit.nic.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध करून दिला जाईल. विद्यार्थी प्रथम येथे त्यांचे निकाल पाहू शकतील. दरवेळेप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, सचिव व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहे.
यंदा परीक्षेला बसलेल्या 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांपैकी 13 लाख 29 हजार 664 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल 93.37 टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याची टक्केवारी 2.12 टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी 2023 चा निकाल 91.35 टक्के एवढा लागला होता.
बारावी च्या परीक्षेचे दि. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत आयोजन केले होते. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत राज्यातील 3 हजार 320 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.
कोकण विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कोकण विभागचा निकाल 97.51 टक्के एवढा आहे तर सर्वाधिक कमी निकाल मुंबई 91.15 एवढा लागला आहे.
HSC Result 2024 Maharashtra Board: निकालात पुणे विभाग तिसऱ्या स्थानी
पुणे विभागात 94.44 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोल्हापूर (94.24), छत्रपती संभाजीनगर (94.04). अमरावती (93), लातूर (92.36), नागपूर (92.12)
छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनीने 100 टक्के गुण घेतले आहेत. तिला परीक्षेत 582 तर क्रिडा विषयात 18 गुण मिळाले.
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल कसा तपासायचा?
- महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होमपेजवर जा आणि निकालाच्या क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख येथे टाका.
- निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- खाली डाउनलोड वर क्लिक केल्याने मार्कशीट डेस्कटॉपवर सेव्ह होईल.
मेसेजवरून चेक करा निकाल
- मोबाईलच्या मेसेज बॉक्सवर क्लिक करा.
- येथे MH 12 टाइप करा.
- आता स्पेस देऊन तुमचा रोल नंबर टाका.
- त्यानंतर 57766 वर मॅसेज पाठवा.
- निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
उत्तीर्ण होण्यासाठी इतक्या गुणांची आवश्यकता?
महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण 33 टक्के गुण आवश्यक आहेत. कोणत्याही एक किंवा दोन विषयात किमान गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट समजले जाईल.
महाराष्ट्र HSC निकाल 2024 वर नवीनतम तपशील मिळवण्यासाठी या थेट ब्लॉगचे अनुसरण करा. विदहयार्थी बुधवार पासून गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिका छायाप्रतिसाठी 22 मे ते 5 जून पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. उत्तरपुस्तिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करण्यासाठी उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत घेणे अनिवार्य असेल. उत्तरपत्रिका मिळाल्याच्या पाच दिवसांत उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करावे.
इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट मध्ये घेतली जाणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थी सोमवार 27 मे पासून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात.
HSC Result 2024 Maharashtra Board:राज्यातील विभागांचा निकाल
- नागपूर विभागाचा 89.93 टक्के निकाल बारावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. नागपूर विभागाचा यावर्षी 89.93 टक्के निकाल लागला. अनेक विद्यार्थ्यांनी मोठे यश प्राप्त केले. नागपुरातील आंबेडकर महाविद्यालयातील सायन्स विभागाचा विद्यार्थी शेख सिपती गणी या विद्यार्थ्याने 96.82 टक्के मार्क मिळवून कॉलेज मध्ये प्रथम आला.
- छत्रपती संभाजीनगरची मुलगी राज्यात प्रथम आली आहे. तनीषा सागर बोरामणिकर असे तिचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनीने 100 टक्के गुण घेतले आहेत. तिला परीक्षेत 582 तर क्रिडा विषयात 18 गुण मिळाले. ती देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे.
- गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.
- ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.8 टक्के लागलेला आहे. तर त्यामधील तालुक्यांचा निकाल हा पुढील प्रमाणे कल्याण ग्रामीण 96.5 टक्के, अंबरनाथ 92.49%, भिवंडी 89.18%, मुरबाड 98.1%, शहापूर 92.80%, ठाणे 92.41%, नवी मुंबई 93.70%, मीरा भाईदर 93.49 टक्के, कल्याण डोंबिवली 90.12%, उल्हासनगर 90.80%, भिवंडी ग्रामीण 91.60%.
- बारावीचा निकाल नुकताच लागलाय. विद्यार्थ्यांनी धमाकेदार कामगिरी केली आहे. आता विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. ठाण्यात बारावीच्या निकालात मुलींची बाजी आज दुपारी एक वाजल्यापासूनच आपला निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी मोबाइल व लॅपटॉप वर विद्यार्थ्यांची लगबग बघायला मिळतंय. ठाण्यातही मुलीनी बाजी मारली आहे.
- बारावीच्या निकालात मुली धमाका करताना दिसल्या आहेत. मुलांपेक्षा मुलीनी तब्बल 3.27 टक्क्यांनी अधिक मारली बाजी.
- बारावीच्या निकालात बीड जिल्ह्याचा सर्वाधिक 95.70 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी परभणीचा 90.42 टक्के निकाल लागला आहे. तर संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल 94.71 टक्के लागला आहे. याही वर्षी मुलींनीच बाजी मारलेली आहे. मुलींची पास होण्याची टक्केवारी 96 टक्के तर मुलांची 92.73 टक्के आहे.
- बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलाय. यामध्ये परभणी जिल्ह्याचा निकालाचा टक्का घसरला आहे. परभणी जिल्ह्याचा निकाल 90.42 टक्के लागला आहे.
- बोर्डाच्या निकालात नाशिक विभागाने बाजी मारलीये. नाशिक विभागाचा निकाल 94.71 टक्के लागलेला आहे.
HSC Result 2024 Maharashtra Board: विद्यार्थ्यांनो मार्कशीट कशी डाउनलोड कराल जाणून घ्या.
यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. 92.60 टक्के मुले, तर 95.49 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा निकाल वाढल्याने स्पष्ट झाले आहे. विद्यार्थी पालकांना दुपारी एक वाजल्यापासून निकल ऑनलाइन पाहता येईल. विद्यार्थ्यांना mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.
गोसावी म्हणाले, की बारावीची सहा माध्यमातील 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली. अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाइन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत झाली. गैरप्रकाराची संख्या घाटली. राज्यस्तरावर 271 भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती.
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीच्या निकालात 2 टक्के वाढ
गेल्या काही वर्षामधील बारावीच्या निकालातील उत्तीर्णतेची टक्केवारी
- 2024: 91.87 टक्के (एकूण), 93.37 टक्के(फक्त नवीन विद्यार्थी)
- 2023: 91.25 टक्के
- 2022: 94.22 टक्के
- 2021: 99.63 टक्के
- 2020: 90.66 टक्के
विज्ञान शाखेतील बारावीचे विद्यार्थी: 7 लाख 60 हजार 46, वाणिज्य (कॉमर्स)शाखेतील बारावीचे परीक्षा दिलेले विद्यार्थी: 3 लाख 29 हजार 905, कला शाखेतील बारावीचे विद्यार्थ्यांची संख्या: 3 लाख 81 हजार 982
यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक विद्यार्थ्यानी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!