HMPV ची चिंताजनक बातमी! भारतात या ठिकाणी सापडले पहिले 2 रुग्ण; आरोग्य विभागाची महत्वाची बैठक

HMPV Virus India

HMPV Virus India: चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असल्याचा पाश्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात आहे. एचएमपीव्ही म्हणजेच ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) (HMPV Virus India) नावाच्या विषाणूच्या संसर्गाची दोन प्रकरणं आढळली आहेत. कर्नाटकात याचे दोन रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मिडियावर दिली. त्या पाश्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झालं असून मंगळवारी त्यासंबंधी एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. जनतेने घाबरून जाऊ नये, या व्हायरस संबंधी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याची माहितीही त्यांनी दिली.

भारतातील या व्हायरस संबंधी परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये एचएमपीव्ही भारतासह जागतिक स्तरावर आधीपासून प्रसारित झाला आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांनी प्रकरणे नोंदवणी गेली आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. या संक्रमणावर लक्ष ठेवले जात असताना भारतातही याची दोन दोन प्रकरणे आढळून आली आहेत. या दोनची रुग्णांनी कुठलाही आंतराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमनांचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.

HMPV Virus India
HMPV Virus India

भारतात एचएमपीव्हीसंसर्ग हा बॅप्टिस्ट हॉस्पिटल बेंगळुरूमधील एका तीन महिन्याच्या मुलीला आणि आठ महिन्याच्या मुलाला झाल्याचे आढळून आले आहे. दोन्ही मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली होती, त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून मुलावर उपचार केले जात आहेत आणि तो बरा होत आहे.

HMPV Virus India: एचएमपीव्ही विषाणू काय आहे?

सायन्स डायरेक्टच्या माहितीनुसार, या विषाणूची उत्पत्ती 200 ते 400 वर्षापूर्वी चिमणीद्वारे झाली होती. पण तेव्हापासून या विषाणूने स्वत:मध्ये अनेक बदल केले आहेत. आता या विषाणूमुलं चिमण्यांना संसर्ग होत नाही. अमेरिका सरकारच्या सेंटर फॉर डिसीक कंट्रोल अँड प्रीव्हेशन नुसार मानवाला 2001 मध्ये याबाबत माहिती मिळाली होती. म्हणजेच याचा संसर्ग मानवाला होऊ शकतो. याची माहिती मिळाली होती.

याचा संसर्ग वाढला तर या विषाणूमुळं ब्रोन्काइटीक किंवा न्यूमोनिया देखील होऊ शकतो. या विषाणूचा इन्क्युबेशन पिरीयड सधारणपणे तीन ते सहा महीने असतो. पण आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो. संसर्ग किती गंभीर आहे, यावर ते अवलंबून असतं. एचएमपीव्ही प्रामुख्याने खोकताना आणि शिंकताना बाहेर काढलेल्या श्वसनाच्या थेंबाद्वारे पसरतो. संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातुन किंवा दूषित वातावरण संपर्कातुनदेखील या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. चीनी सीडीडी वेबसाइट सांगते की, एचएमपीव्ही साठी संसर्ग कालावधी तीन ते पाच दिवसांचा असतो. हा विषाणू हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यात जास्त प्रमाणात आढळतो.

HMPV Virus India

दरम्यान या विषाणूमुळे आपण नेहमी पाहतो तशी श्वसन संबंधी संक्रमण होऊ शकतात. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडून वेगवेगळ्या इन्फ्लूएंझा विषाणूसह RSVयासारख्या श्वसनसंबंधित संसर्गाचा डेटा गोळा केला जातो. या डेटानुसार, गेल्या महिन्यात, इन्फ्लूएंझा बी व्हिक्टोरिया वंश आणि RSV हे आढळून आलेल्या श्वसन संक्रमणाचे मुख्य कारण होते.

काय करावे:

  • खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड किंवा नाक रुमाल किंवा टिश्यु पेपरनं झाकून ठेवा.
  • साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनीटायझरने वारंवार आपले हात धुवा.
  • ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा.
  • भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
  • संसर्ग कमी करण्यासाठी बाहेरील हवेसह हवा पुरेशी खेळती राहील अशा वातावरणाची शिफारस केली आहे.

काय करू नये:

  • हस्तांदोलन, टीश्यु पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळा.
  • आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा.
  • डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे टाळा.

HMPV Virus India: एचएमपीव्ही कसा पसरतो?

खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या तुषारांतील कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि इतरांना संसर्ग होतो. हाथ मिळवणे, गळा भेट घेणे किंवा एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो. खोकला किंवा शिकल्याने एखाद्या भागावर तुषार पडले असतील आणि त्याठिकाणी स्पर्श केलेला हात आपण चेहरा, नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केला तरीही संसर्ग होऊ शकतो.

इतकी काळजी का घेतली जातेय?

आरोग्य मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी चीनमधील परिस्थितिवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त मॉनिटरिंग ग्रुप तयार केला होता. हा गट जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी चीनमधील परिस्थितीबद्दल माहिती घेत आहे. हिवळ्याच्या दिवसात जगभरातील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या श्व सनासंबंधित संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या घटना समोर येतात. असे असले तरी चीनच्या आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान संयुक्त मॉनिटरिंग गट चीनमध्ये पसरत असलेल्या या आजारासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेकडून अपडेट मागवत आहे.

HMPV Virus India

HMPV Virus India: डॉक्टरांच म्हणण काय?

दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील बाल रुग्ण विभागाचे डॉक्टरांनी पिटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा काही नवा विषाणू नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, याबाबत वीस वर्षापासून माहिती उपलब्ध आहे. हिवाळ्याच्या काळात याच्या संसर्गाची प्रकरणं समोर येतात. हा फ्लूसारखा विषाणू आहे.

डॉक्टरांच्या मते यासाठीही सामान्य सर्दीला दिली जाणारी औषधंच दिली जातात. तसंच आजारी व्यक्तिला आरामाचा सल्ला दिला जातो. बहुतांश प्रकरणात रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही दिला जात नसल्याचंही त्यांनी सांगितलं. याच रुग्णालयातील चेस्ट मेडिसीन विभागाचे वरिष्ट डॉक्टरांनी संगितले. आतापर्यंत या विषाणूच्या संसर्गाची जी प्रकरण समोर आली आहेत. त्यात अगदी किरकोळ लक्षणं दिसली. पण दरम्यान आधीच त्रास असलेले रुग्ण आणि क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव्ह पलमनरी डिसीज (सिओपीडी, ज्यात श्वास घ्यायला त्रास होतो) च्या रुग्णांना यामुळं जास्त त्रास होऊ शकतो. त्यांना श्वास घ्यायला त्रास, थकवा आणि ताप अशा समस्यांना सामना करावा लागू शकतो.

सध्या भारतात या विषाणूचा जो प्रकार आहे त्यामुळं फार गंभीर संसर्ग होत नाही. ज्याप्रकारे कोविडचा विषाणू गंभीर रुप धारण करत होता, त्यामुळे रेस्पीरेटरी फेल्योर व्हायचं. तसं यात अजून पहायला मिळालं नाही. चीनमधील या विषाणूचा स्ट्रेन कीती घटक आहे तेही काही दिवसांत समजेल.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!