‘उल्टा चोर, कोतवाल को डांटे’ पण ही म्हण जर कोणी खरी करून दाखवली असेल तर ती आहे, “अमेरिकन शॉर्टसेलर हिंडनबर्ग”

Hindenburg Research about India

Hindenburg Research about India: हिंडनबर्ग रिसर्चचा हा रिपोर्ट (Hindenburg Research about India) अदानी समूहावर त्यांनी यापूर्वी रकशीत केलेल्या रिपोर्ट च्या जवळपास 18 महिन्यानंतर आला आहे. गेल्यावर्षी म्हणजे, जानेवारी 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टने भारतात राजकीय वादळ निर्माण केलं होत. आता नव्या रिपोर्टनही राजकीय धुरळा उडण्याची शक्यता आहे. ‘हिंडनबर्ग’ ने व्हीसलब्लोअर कागदपत्रांचा संदर्भ देत म्हटलंय की सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदानी समूहाच्या आर्थिक, अनियमिततेशी संबंधित असलेल्या ऑफशोअर कंपन्यांमध्ये भागीदारी आहे. इंडियन एक्सप्रेस आणि पिटिआयच्या वृत्तानुसार, सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती बुच यांनी हे आरोप फेटाळूओन निवेदन जारी केले आहे.

दोघांनीही संयुक्त निवेदन जारी करून या आरोपांमध्ये तथ्य नाही असं म्हंटलं आहे, तसंच आमचं आयुष्य आणि आर्थिक व्यवहार खुल्या पुस्तकासारखे आहे. ‘उल्टा चोर, कोतवाल को डांटे’ ही म्हण सर्वानाच माहीत आहे. पण ही म्हण जर कोणी खरी करून दाखवली असेल तर टि आहे अमेरिकन शॉर्टसेलर हिंडनबर्ग याने, पुन्हा एकदा हिंडनबर्गला अनफेयर ट्रेड प्रॅक्टिससह अजून काही प्रकरणात सेबीने एक नोटिस पाठवली होती. ही नोटिस दीड महिन्या पूर्वी पाठवण्यात आली.

Hindenburg Research about India
Hindenburg Research about India

या नोटिसला हिंडनबर्गने उत्तर देणे गरजेचे होते. पण ते उत्तर न् देता त्याने SEBI च्या अध्यक्ष माधबी पुरी बुच यांच्यावरच खोटे आरोप लावले आहेत.

अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चने आता शेअर बाजाराचं नियमन करणाऱ्या ‘सेबी’ च्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावर आरोप केले आहेत. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया होय.

Hindenburg Research about India: हिंडनबर्ग च्या नव्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे?

हिंडनबर्ग रिसर्चने त्यांच्या नव्या रिपोर्टमध्ये (Hindenburg Research about India) म्हंटलंय की, सेबीच्या अध्यक्षाकडे ऑफशोर कंपन्यांमध्ये भागीदारी होती, ज्यांचा वापर अदानी समूहाच्या कथित आर्थिक अनियमिततेसाठी केला गेला होता. या नव्या रिपोर्टमध्ये पुढे म्हटलंय की, आजपर्यंत सेबीने अदानीच्या इतर संशयित भागधारक कंपन्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही, ज्या इंडिया इन्फोलाईनच्या ईएम रिसर्जट फंड आणि इंडिया फोकस फंडद्वारे चालवल्या जातात. सेबीच्या अध्यक्षाच्या या हित संबंधांमुळे बाजार नियामकाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं हिंडनबर्ग नं म्हटलं आहे. सेबीच्या नेतृत्वाबाबत या रिपोर्टमध्ये चिंता व्यक्त केली गेलीय. हिंडनबर्ग रिसर्चनं म्हटलंय की, अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेत गुंतलेले ऑफशोअर फंड खूपच अस्पष्ट आहेत आणि त्यांची रचना जटिल आहे.

या नव्या रिपोर्टमध्ये माधबी पुरी बुच यांच्या वैयक्तिक हितसंबंधांवर आणि बाजार नियामक प्रमुख म्हणून त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हिंडनबर्गनं म्हटलंय की, सेबीने अदानी समूहाबाबत केलेल्या तपासाचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. हिंडनबर्ग रिसर्चने म्हंटलंय की, व्हीसलब्लोअर कडून मिळालेल्या कागदपत्रांनुसार सेबीमध्ये त्यांच्या (माधबी बुच) नियुक्तीच्या काही आठवड्यांपूर्वी, माधबी पुरी बुच यांचे पती धवल बुच यांनी मॅरिशसंस्थित फंड प्रकाशन ट्रायडेंट ट्रस्टला ईमेल केला होता. त्यात त्यांनी आणि त्यांच्या पत्नीच्या ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटीज फंडातील गुंतवणुकीचा उल्लेख केला होता.

Hindenburg Research about India

Hindenburg Research about India: काय आहे घटनाक्रम?

या संपूर्ण प्रकरणाचा आपण एक घटनाक्रम पाहूया. म्हणजे सर्वगोष्टी या स्पष्ट होतील.

  • या प्रकरणाची सुरुवात झाली टी जानेवारी 2023 मध्ये
  • हिंडनबर्गने अदानी ग्रुपवर शेअर्स बरोबर छेडछाड केल्याचा आरोप लावला.
  • खोट्या रिपोर्टच्या माध्यमातून शेअर्स कोसळले
  • त्यानंतर FPI च्या मदतीने शॉर्टसेलिंगच्या सहाय्याने फायदा कमावला
  • सेबीने याची चौकशी केली, अदानी ग्रुपला यात क्लीनचित देण्यात आली.
  • शॉर्टसेलर चुकीचा असल्याने त्यानंतर सेबीने स्पष्ट केले
  • प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले, तिथेही अदानी ग्रुपला क्लीन चिट मिळाली
  • सेबीच्या चौकशीत शॉर्टसेलर दोषी आढळून आला.
  • 27 जूनला SEBI ने हिंडनबर्ग आणि FPI मार्क किंग्डन आणि नाथन एंडरसनला नोटिस पाठवली.
  • पण नोटिसला कोणतेही उत्तर दिले नाही, उलट सेबिवर आरोप लावले
  • आता सेबीच्या अध्यक्षांवर हीरफेरी केल्याचा आरोप केला आहे.

आता हिंडनबर्गच्या रिपोर्ट (Hindenburg Research about India) विरोधात अनेक जण पुढे येवून बोलत आहेत. आदि सेबिवर आरोप लावले गेले. त्यानंतर सेबी प्रमुखावरही आरोप केले आहेत. या विरोधात राजकीय आणि उद्योग जगतातुन प्रतिक्रिया उमटत आहेत. सेबीने 27 जूनला अमेरिकेच्या शॉर्टसेलर हिंडनबर्ग रिसर्च नाथन एंडरसन आणि मॉरिशस बेस्ट FPI मार्क किंग्डन यांना कारण दाखवा नोटिस बजावली होती. SEBI ने अदानी एन्टरप्राइजेजच्या शेअर्सच्या ट्रेडिंग नियमांच्या उल्लंघन प्रकरणी ही कारवाई केली होती. सेबीने हिंडनबर्गवर नियमांचे उल्लंघन केल्याचे ताशेरे ओढले आहेत. हिंडनबर्ग ने या सर्व प्रकरणात नफा कमावला. चुकीचा रिपोर्ट समोर आणला. याबाबत हिंडनबर्ग उत्तर देणे गरजेचे होते.

पण त्यांनी तसे न् करता सेबीच्या अध्यक्षावरच खोटे आरोप लावले आहे. दरम्यान हिंडनबर्गने लावलेले सर्व आरोप अदानी ग्रुपने फेटाळले आहेत. शिवाय हे आरोप दुर्दैवी आणि चुकीचे असल्याचेही स्पष्ट केले आहेत. शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग जारी केलेल्या नवीन अहवालावर सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माधबी पुरी बुच यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हंटले आहे. त्यांनी म्हटलं की, सेबीने हिंडनबर्ग विरुद्ध तपास करून कारवाई केली होती आणि कारने दाखव नोटिस बजावली होती. त्यावरून आता हिंडनबर्गने माझ्यावर चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. SEBI च्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी परिपत्रक जारी करून शॉर्टसेलर हिंडनबर्गने केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

या आरोपांचा सत्याशी काहीही संबंध नाही. माधबी पुरी बुच यांनी या संयुक्त निवेदनात स्पष्ट केले की, आमचे जीवन आणि आमचे व्यवहार हे एक खुले पुस्तक आहे. आम्ही वेळोवेळी सेबीला सर्व खुलासे दिले आहेत. असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोणताही अहवाल करण्यासाठी ही कंपनी काही मार्गाचा वापर करते:

  • गुंतवणुकीचा निर्णय देण्यासाठी विश्लेषणाचा आधार घेते.
  • तपासणीसाठी संशोधन करतात.
  • सूत्राद्वारे मिळालेल्या गुप्त माहितीवर संशोधन होतं.

असे तीन मार्ग कंपनीने संकेतस्थळावर सांगितले आहेत.

Hindenburg Research about India: कंपनी तपास कधी करते?

  • लेखा परीक्षणातील अनियमितता असेल तर
  • महत्वाच्या पदांवर आरोग्य व्यक्ति असेल तर
  • अघोषित देवाणघेवाण व्यवहार झाले असल्यास
  • कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार, अनैतिक व्यापार झाल्यास

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!