Hartalika Teej 2024
Hartalika Teej 2024: भाद्रपद महिना हा सुरू झाला आहे. भाद्रपद महिना हा धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. व्रत-वैकल्यासह सण उत्सवाचा महिना म्हणून भाद्रपद ओळखला जातो. या महिन्यात गणेशोत्सवासह महत्वाचे असे हरितालिका व्रत देखील साजरे होत आहे. हरितालिका तृतीय व्रत, गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी साजरे होते. कुमारिका तसेच विवाहित महिला हे व्रत करतात. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यकरिता हरतालिकेचे व्रत करतात. तर अविवाहित महिला आपल्याला चांगला वर मिळावा, या करता याचे व्रत करतात. यंदाच्या हरतालिकेबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. यंदा हे व्रत 5 सप्टेंबरला आहे की 6 सप्टेंबरला?
वास्तविक हरतालिक भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते. जी 5 आणि 6 सप्टेंबर दोन्ही आहे. अशा स्थितीत हरतालिक नेमकी कोणती मानली जावी. याबाबत संभ्रम आहे. विवाहित स्त्रीया आणि अविवाहित मुली हे व्रत करू शकतात. चला जाणून घेऊया हरतालिका व्रत करण्याची वेळ, शुभ मुहूर्त आणि विधी. यासोबत जाणून घेऊया या व्रताची पौराणिक कथा.

Hartalika Teej 2024: हरतालिका पूजा विधी
हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर पार्वतीची पूजा करावी. शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला सुरुवात करावी. चौरंगावर रंगीत वस्त्र घाला, त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा. त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा. गणपती बप्पांचा फोटो ठेवून बप्पांची पूजा देखील करावी, उपलब्ध फळं, फूल अर्पण करावी. यावेळी शिव पार्वती मानून एका दापत्याची देखील पूजा करावी. आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा द्यावी. स्त्रियांना हळदकुंकू आणि वान दान करावे.
Hartalika Teej 2024: हरतालिकेची अशी आहे पौराणिक कथा
हरतालिका व्रतासंदर्भात अनेक पौराणिक कथा आहे. त्यापैकी प्रचलित एका कथेनुसार, माता पार्वतीने पती म्हणून महादेवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. देवी पार्वतीचे लहानपणा पासूनचे महादेवावर प्रेम होते. आणि महादेवच जीवनसाथी म्हणून त्यांना हवे होते. यासाठी त्यांनी हिमालय पर्वतातील गंगेच्या तीरावर बालपणापासूनच कठोर तपश्चर्या सुरू केली. या तपश्चर्या दरम्यान देवी पार्वतीने अन्नपाणी त्यागले होते. आणि त्या फक्त कोरड्या वनस्पतीचे पाने चावत असत. देवी पार्वतीची अशी अवस्था पाहून तिचे आई- वडील फार दु:खी झाले. एके दिवशी देवऋषि नारद विष्णुच्या वतीने पार्वतीच्या वडिलांकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले. या प्रस्तावामुळे देवी पार्वतीचे आई वडील खूप खुश झाले. त्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव देवी पार्वतीला सांगितला.

हा प्रस्ताव ऐकुन देवी पार्वती खूप दुखी झाल्या, कारण त्यांनी मनाने महादेवाला आपले पती म्हणून स्वीकारले होते. देवी पार्वतीने तिची ही समस्या तिच्या मैत्रिणीला सांगितली आणि देवी पार्वतीने विष्णुकडून आलेल्या लग्नाच्या प्रस्ताव नकारला. त्यानंतर, देवी पर्वतीने एका मैत्रिणीला सांगितले की, ती फक्त महादेवालाच आपले पती मानेल. दरम्यान, मैत्रिणीच्या सांगण्यावरून पार्वतीने घनदाट जंगलातील एका गुहेत महादेवाची पूजा केली. या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीय तिथी होती. तसेच या दिवशी हस्त नक्षत्रात पार्वतीजींनी मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा केली आणि रात्रभर जागरण केले. त्यानंतर पार्वतीच्या या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले.
मान्यतेनुसार, देवी पर्वतीने ज्याप्रमाणे कठोर तपश्चर्या करून महादेवाला पती रूपात प्राप्त केले, त्यानुसार, ज्या स्त्रीया हे व्रत विधिवत पद्धतीने पाळतात त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते आणि त्यांच्या दीर्घायुष्य लाभते. तसेच ज्या कुमारिका हे व्रत पूर्ण पाळतात. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वराची प्राप्ती होते.
Hartalika Teej 2024: हरितालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12.22 वाजता तृतीया तिथी सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी पहाटे 03:01 वाजता समाप्त होईल. 6 सप्टेंबर रोजी उद्या तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.01 ते 08.32 पर्यंत असेल.
(टीप: वरील सर्व बाबी MHTimes24 केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MHTimes24 कोणताही दावा करत नाही.)

Hartalika Teej 2024: व्रताचे नियम जाणून घेऊया
विशेषत: ज्या महिलांचे नुकतंच लग्न झालं आहे. ज्या नवविवाहित महिला आहेत. अशा महिलांसाठी हे व्रत फार महत्वाचं आहे. त्यानुसार, या व्रताचे नियम नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
- हरितालिकेचे व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला करावे.
- हे व्रत सुवासिनिंनी तसेच कुमारिकांनी करावे.
- शास्त्रानुसार , हरतालिकेचे वर्त एकदा करायला सुरुवात केल्यानंतर ते आजन्म पाळावे. ते मध्येच सोडून देऊ नये.
- दरवर्षी शास्त्रात दिलेल्या विधीनुसार हरितालिकेची पूजा करावी. तसेच पूजेच्या दरम्यान कथा वाचावी.
- शास्त्रानुसार हरितालिकेचे व्रत निर्जळी करावे. व्रताच्या दरम्यान चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नये. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे नामस्मरण करावे.
- हरितालिका व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्थान करावे. तसेच पूजा मांडावी. त्यानंतर कथा वाचून आरती करावी.
- हरितालिकेचे व्रत करत असाल तर दिवसभर रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. या दरम्यान घरातील व्यक्तिबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये.
- हरितालिकेचे व्रताचा उपवास करत असाल तर टॉ दुसऱ्या दिवशी सोडवा.
- दुसऱ्या दिवशी हरितालिकेची मांडलेली पूजा, फुले, वाळू इ. गोष्टींचे विसर्जन स्वच्छ पाण्यात करावे.
Hartalika Teej 2024: हरितालिका पूजेसाठी लागणारे साहित्य
तुम्ही जर हरितालिकेची पूजा करणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे काही वस्तूंची यादी असणं गरजेचं आहे. वाळू, बेलपत्र, शमी पत्र, आंब्याची पाने, पांढरी फुलं, वस्त्र, सौभाग्याचं साहित्य, काजळ, कुंकू, चौरंग, रांगोळी, दूध, मध, पाण्याचा कलश, तूप, टेल, चंदन, शंख, घंटा, निरांजन, वीडयाची पाने, तेलाच्या वाटी, खडीसाखर, फळं, गूळ, खोबरं, समई, पंचामृत, उदबत्ती, अक्षता, कापुर, कोरे वस्त्र, पळी, पंचपात्र, हळद, कुंकू, ताम्हण तसेच फणी आणि आरसा यांसारखं साहित्य तुम्हाला लागणार आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!